Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (K.D.S.) (Weekly) (Mar. 1st-7th 2018)

Published 01 March 2018

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-01.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८ / फाल्गुन १०-१६, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ४] गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८ / फाल्गुन १०-१६, शके १९३९ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

सिंधुदुर्गनगरी, दिनांक २० फेब्रुवारी २०१८

वाचले.--- (१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ६२-अ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक १६, कलम ६२-क.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ / २०१६ / प्र. क्र. २६ / का. ७, दिनांक ९ नोव्हेंबर २०१६.

(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ / जिपपंस-२०१६ / प्र. क्र. ५१ / का.७, दिनांक २ जानेवारी २०१७.

(४) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ / जिपपंस-२०१७ / प्र. क्र. ५३ / का.७, दिनांक ७ नोव्हेंबर २०१७.

(५) तहसीलदार, दोडामार्ग यांचेकडील क्र. १००-माटणे / पोट / निव / निवडणूक / खर्च / मा / २०१८, दिनांक १७ जानेवारी २०१८.

आदेश

क्रमांक GAD-3301 / 2 / 2017, COLL.-GEN.-----ज्याअर्थी, दोडामार्ग पंचायत समिती निर्वाचक गण १००-माटणे या रिक्त झालेल्या पदासाठी पोट-निवडणूक दिनांक १३ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या असून सदर निवडणुकीचा निकाल दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी जाहीर झालेला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ६२-अ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग-चार, सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, कलम ६२-अ अन्वये जिल्हा परिषदा व पंचायत समित्या निवडणूक लढविणाया उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये व विहित केलेल्या रीतीने सादर न केल्यास अशा व्यक्तीला आदेशाच्या दिनांकापासून ५ वषार्ंच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह ठरविण्याबाबत तरतूद विहित केलेली आहे;

ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील उक्त संर्दभिय क्र. ३ चे पत्रातील सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाया व्यक्तींनी निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांचे आत त्यांचे निवडणूक खर्चाचे हिशेब संबंधित प्राधिकायाकडे सादर करणे आवश्यक आहे ; (१) भाग एक--अ-(को.वि.पु.)--१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८ / फाल्गुन १०-१६, शके १९३९ २ ज्याअर्थी, निवडणूक लढविणाया उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी निवडणुकीचे हिशेब सादर केलेले नाहीत त्यांचा अहवाल उपोदघातातील अ. क्र. ५ अन्वये या कार्यालयाकडे सादर केला असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :----

अनुसूची

अ. क्र. तालुका निर्वाचक गणाचे उमेदवाराचे नाव

पत्ता राजकीय क्र. व नाव

पक्ष (१) (२) (३) (४)

(५) (६)

पंचायत समिती निर्वाचक गण

१ दोडामार्ग १०० / माटणे श्री. संतोष महादेव गावडे रा. गिरोडे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग अपक्ष उमेदवार निवडणूक खर्चाचा हिशेब संबंधित उप कोषागार अधिकारी, दोडामार्ग यांचेकडे सादर करणे आवश्यक होते. तथापि, उक्त उमेदवारांनी सदर निवडणुकीत केलेल्या खर्चाचे हिशेब सादर केलेले नसल्याचे तहसीलदार, दोडामार्ग यांचे अहवालावरून दिसून येते.

उपरोक्त उमेदवार यांना वेळोवेळी खर्चाचे हिशेब सादर करणेबाबत तहसीलदार, दोडामार्ग यांनी कळविणेत येऊन सुद्धा निवडणूक खर्चाचे हिशेब सादर केलेले नसल्याने, मा. राज्य निडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी विहित केलेल्या रीतीने खर्चाचा हिशेब सादर करण्यास कसूर केलेली असल्याने उक्त उमेदवार यांना आदेशापासून ५ वषार्ंकरिता का निरर्ह करण्यात येऊ नये याबाबत लेखी म्हणणे सादर करणेबाबत या कार्यालयाकडील GAD-3301 / 2 / 2017, COLL.-GEN, दिनांक २२ जानेवारी २०१८ व दिनांक ३० जानेवारी २०१८ अन्वये संबंधितांना कळविणेत आलेले होते. तथापि, उक्त उमेदवार दिनांक ३० जानेवारी २०१८ व दिनांक २० फेब्रुवारी २०१८ रोजी गैरहजर होते. यावरून त्यांना निवडणूक खर्चाचे हिशेब सादर करण्यास कोणतेही स्वारस्य असल्याचे दिसून येत नाही. सबब, उपरोक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ६२-अ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, कलम ६२-क मधील तरतुदीनुसार पाच वषार्ंच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह ठरविण्याबाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअथी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ६२-अ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, कलम ६२-क मधील तरतुदीनुसार मला प्राप्त असलेल्या अधिकारान्वये मी, उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या उमेदवाराला या आदेशाच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह ठरवित आहे.

अनुसूची

अ. क्र. तालुका निर्वाचक गणाचे उमेदवाराचे नाव

पत्ता राजकीय क्र. व नाव

पक्ष (१) (२) (३) (४)

(५) (६)

पंचायत समिती निर्वाचक गण

१ दोडामार्ग १०० / माटणे श्री. संतोष महादेव गावडे रा. गिरोडे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग अपक्ष सिंधुदुर्गनगरी, दिनांक २० फेब्रुवारी २०१८.

उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-01.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-01.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.