Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C (Weekly) (Mar. 15-21, 2018)

Published 15 March 2018

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक ९] गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ [पृष्ठे २

किंमत : रुपये ६.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक साखर- १११७/प्र.क्र. ११६/नापु-१९.----भारत सरकार, ग्राहक बाबी, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक बाबी विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून असाधारण राजपत्र, भाग-२, खंड-३, उप खंड (i) मध्ये दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेली अधिसूचना खालीलप्रमाणे पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे :-----

ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय

(अन्न व सार्वजनिक वितरण विभाग)

नवी दिल्ली, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

आदेश

जी.एस.आर.(ई).----जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ (१९५५ चा १०) च्या विभाग ३ मधील तसेच साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ च्या कलम ५ मधील दिलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र शासन असे निदेश देते की, कोणताही साखर उत्पादक साखरेचा कोणत्याही प्रकारचा साठा पुढील मर्यादेपेक्षा जास्तीचा साठा खालील दिलेल्या महिन्यांच्या अखेरपयर्ंत ठेवणार नाही :---

(अ) फेब्रुवारी, २०१८ अखेर उत्पादकांकडे जानेवारी, २०१८ अखेर उपलब्ध असलेल्या एकूण साठयाच्या ८३% पेक्षा कमी नसेल इतका + फेब्रुवारी, २०१८ अखेर उत्पादित झालेला साखर साठा--फेब्रुवारी, २०१८ मध्ये निर्यात केलेला एकूण साखर साठा.

(ब) मार्च, २०१८ अखेर उत्पादकांकडे फेब्रुवारी, २०१८ अखेर उपलब्ध असलेला एकूण साठयाच्या ८६% पेक्षा कमी नसेल इतका + मार्च, २०१८ अखेर उत्पादित झालेला एकूण साखर साठा--मार्च, २०१८ मध्ये निर्यात साखर साठा.

(क) प्रत्येक वैयक्तिक साखर उत्पादकाकडील एकूण साखरेच्या साठयाची गणना खालीलप्रमाणे करण्यात येईल :---- " महिन्याच्या १ तारखेच्या सुरूवातीचा साठा + त्या महिन्यामधील साखरेचे एकूण उत्पादन त्याच महिन्यात कारखान्यातून विकलेली एकूण साखर--त्याच महिन्यात निर्यात केलेली एकूण साखर " भाग चार-क-----१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ ३. तसेच, साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ मधील कलम १५ मधील अधिकारांचा वापर करून केंद्र सरकार वरील साठा मर्यादेच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार व केंद्राशासित प्रदेशांना प्राधिकृत केले आहे.

४. हा आदेश राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून लागू होईल.

[ एफनं. १(६)/२०१६-एस.पी.-i]

सुभाषिश पांडा,

सह सचिव.

भा. बा. पाटील,

उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.