RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक १३] शुक्रवार, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
नोटीस
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६
(महाराष्ट्रा XXXVII १९६६)
क्रमांक टिसीपी(पी-२)/बीकेसी/संकीर्ण/९२४/५५१/२०१८
(१) ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४, (Maharashtra-IV of 1975) अनुसार स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (ज्याचा उल्लेख "उक्त प्राधिकरण" असा करण्यात आला आहे), महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४०(१) (सी) अनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आपल्या नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक ७ मार्च १९७७ रोजीच्या अधिसूचना क्रमांक बीकेआर - १९७७/२६२/युडी-५, अन्वये कुर्ला अधिसूचित क्षेत्रासाठी (यापुढे ज्याचा उल्लेख "वांद्रे-कुर्ला संकुल" असा करण्यात आला आहे) "विशेष नियोजन प्राधिकरण" म्हणून नेमणूक केली आहे;
(२) आणि ज्याअर्थी, "महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६" च्या कलम ४०, पोट-कलम (३) खंड (डी) अन्वये आपल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने कुर्ला संकुल अधिसूचित क्षेत्राच्या विकासासाठी प्राधिकरणाने सादर केलेल्या नियोजन प्रस्तावास तसेच त्या क्षेत्रासाठी लागू करावयाच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विकास नियंत्रण नियमावलीच्या प्रस्तावास, अधिसूचना नगरविकास व सार्वजनिक विभाग क्रमांक बीकेआर-११७७/२६२/युडी-५, दिनांक ९ एप्रिल १९७९ नुसार मान्यता दिली आहे ;
(३) आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम क्र. ४(i) मध्ये असणारी कलमे पुढे उद्घृत केल्याप्रमाणे आहेत.----
"कोणत्याही जमिनीवर मान्यताप्राप्त नियोजन प्रस्तावामध्ये दर्शवलेल्या जमीन वापरा व्यतिरिक्त दुसरा कोणताही जमीन वापर अनुज्ञेय नाही".
(४) आणि ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मधील नियम क्र. ५१ ते ५४ प्रमाणे मिश्र वापर अनुज्ञेय आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास नियंत्रण नियमावली, २०३४ मध्ये देखील असे मिश्र वापर अनुज्ञेय आहेत. असे मिश्र वापर अनुज्ञेय केल्यास या क्षेत्रात कार्यालयीन वेळेनंतर उत्साहवर्धीत व चैतन्यमय वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. सबब, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे प्राधिकरणाने दिनांक ३ जून, २०१६ रोजी झालेल्या १४० व्या बैठकीत असा ठराव पारित केला की, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या "जी" ब्लॉकमधील (अ) प्राधिकरणाच्या मालकीच्या रिकाम्या भूखंडावर मिश्र वापर अनुज्ञेय करताना वाणिज्य
(१)
भाग दोन------१६---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९ वापराच्या भूखंडावरील इमारतीत कमाल बांधकाम क्षेत्राच्या ३०% पयर्ंत रहिवासी वापर व रहिवासी वापराच्या भूखंडावरील इमारतीत तळमजला व पहिल्या मजल्यापयर्ंत वाणिज्य वापर अनुज्ञेय करावा. यासाठी प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकास नियंत्रण विनियम ४(i) मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये प्रक्रिया करून फेरबदल करावा. (ब) तसेच यापूर्वी, वाटप झालेल्या भूखंडावर मिश्र वापर अनुज्ञेय करण्याबाबत त्रिसदस्यिय समिती स्थापन करून मिश्र वापर अनुज्ञेय करताना अटी व शतर्ींबाबतचा अहवाल आगामी बैठकीत सादर करावा.
(५)(अ) आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाच्या मालकीच्या रिकाम्या भूखंडासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीतील वरील विनियम ४(i) मध्ये त्याच्या शेवटी खालीलप्रमाणे वाक्ये समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रीया पूर्ण करून पुढीलप्रमाणे प्राधिकरणाने दिनांक २३ ऑगस्ट २०१६ रोजी प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी पाठवला आहे :
"परंतु वांद्रे-कुर्ला संकुलाच्या"जी" ब्लॉकमधील प्राधिकरणाच्या मालकीच्या रिकाम्या भूखंडापैकी वाणिज्य वापराच्या भूखंडावरील
इमारतीत कमाल बांधकाम क्षेत्राच्या ३०% पयर्ंत रहिवासी वापर व रहिवासी वापराच्या सर्व भूखंडावरील इमारतीत तळमजला व पहिल्या
मजल्यापयर्ंत वाणिज्य वापर अनुज्ञेय असेल."
(ब) आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाने नेमलेल्या त्रिसदस्यिय समितीने यापूर्वी वाटप झालेल्या भूखंडावर मिश्र वापर अनुज्ञेय करण्याबाबतचा अहवाल दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी सादर केला असून तो प्राधिकरणाच्या दिनांक १२ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या १४४ व्या बैठकीत ठेवला असता प्राधिकरणाने ठराव क्र. १४३६ अन्वये असा ठराव पारित केला की, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या "जी" ब्लॉकमधील प्राधिकरणातर्फे वाटप झालेल्या व ज्यावर बांधकाम सुरू आहे किंवा सुरू व्हायचे आहे अशा भूखंडावर मिश्र वापर अनुज्ञेय करताना वाणिज्य वापराच्या सर्व भूखंडावरील इमारतीत कमाल बांधकाम क्षेत्राच्या ३०% पयर्ंत रहिवासी वापर अनुज्ञेय करावा. यासाठी प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकास नियंत्रण विनियम ४(i) मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये प्रक्रिया करून फेरबदल करावा.
(६) आणि त्याअर्थी, आता "महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६" च्या कलम ४०(३) (डी) सह मुंबई सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १९०४ च्या कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत सहाय्यभूत ठरतील अशा इतर सर्व अधिकारांचा वापर करून हे प्राधिकरण याद्वारे "महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६" च्या कलम ३७ अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीतील वरील विनियम क्र. ४(i) पुढीलप्रमाणे फेरबदल त्याच्या शेवटी खालील वाक्ये समाविष्ट करण्यासाठी नोटीस देत आहे :----
"परंतु वांद्रे-कुर्ला संकुलाच्या "जी" ब्लॉकमधील प्राधिकरणातर्फे वाटप झालेल्या व ज्यावर बांधकाम सुरू आहे किंवा
सुरू व्हायचे आहे अशा वाणिज्य वापराच्या भूखंडावरील इमारतीत कमाल बांधकाम क्षेत्राच्या ३०% पयर्ंत रहिवासी वापर
अनुज्ञेय असेल."
(७) प्रस्तावित फेरबदलांबाबत कोणत्याही सूचना आणि / किंवा आक्षेप असल्यास त्या मागविण्यासाठी ही नोटीस देण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत अशा सूचना आणि / किंवा आक्षेप लेखी स्वरुपात प्रमुख, नगर व क्षेत्र नियोजन विभाग, तीसरा मजला, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, प्लॉट क्र. आर-५, ६ आणि १२, "ई" ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांना लेखी कळविण्यात याव्यात.
यू. पी. एस. मदान,
ठिकाण : मुंबई, दिनांक : १६ मार्च २०१८.
महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९ ३MUMBAI METRTOPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notice
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
(Maharashtra XXXVII of 1966)
No. TCP(P-2)/BKC/Misc/924/551/2018
WHEREAS, the Government of Maharashtra has appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to by its acronym "MMRDA") established under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975) to be the Special Planning Authority (hereinafter referred to as "Authority") for the Notified Area of Bandra-Kurla Complex (hereinafter referred to by its acronym "BKC") by the State Government in Urban Development and Public Health Department Notification No. BKR-1177/262/UD-5, dated 7th March 1977 promulgated in exercise of its powers conferred by Clause (c) of sub-section (1) of Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
2. AND WHEREAS, in exercise of its powers under clause (d) of sub-section (3) of Section 40 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, the Government of Maharashtra in Urban Development Department and Public Health Department by its Notification No.BKR- 1177/262/UD-5, dated 9th April 1979 approved the Planning Proposals submitted by the Authority for the development of lands in the said Bandra-Kurla Complex Notified Area together with the MMRDA's Development Control Regulations, 1979 for Bandra-Kurla Notified Area.
3. AND WHEREAS, regulation No. 4 (i) of the said MMRDA's Development Control Regulations, 1979 for Bandra-Kurla Notified Area reads as under :—
"No land shall be used otherwise than for the purpose allocated to it by the Planning Proposals".
4. AND WHEREAS, Mix user is permissible in Regulation No. 51 to 54 of Municipal Corporation of Greater Mumbai's (hereinafter referred as "MCGM") Development Control Regulations, 1991 and Mix user is also permissible in MCGM's Draft Development Control Regulations, 2034. By allowing such Mix user this area shall be more vibrant and lively after office hours. Therefore in accordance to MCGM's Development Control Regulations, MMRDA Authority in its 140th meeting held on 3rd June 2016 has resolved (a) to allow mix user for the vacant plots owned by the MMRDA in 'G' Block of BKC by allowing 30% of the Residential use in buildings on Commercial Plots and allowing Commercial use on Ground and First Floor in the buildings on Residential plots by following due procedure under Section 37 of the MR & TP Act 1966 for carrying out modifications in Regulations 4 (i) of MMRDA's Development Control Regulations, 1979 for Bandra-Kurla Complex Notified Area. (b) to appoint a three member committee, which shall give a report about the terms & conditions for allowing mix user on already allotted plots, which shall be submitted in the next Authority.
5.(a) AND WHEREAS, under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act – 1966 MMRDA has completed the procedure for allowing mix user on vacant plots owned by MMRDA by inserting following text at the end of Regulation 4(i) as given below and forwarded the proposal on 23rd August 2016 to Government for approval :—
"….Except for the vacant plots owned by the MMRDA in 'G' Block of BKC, Residential use upto 30% of the total BUA is permissible in buildings on Commercial Plots and Commercial use is permissible on Ground and First Floor in the buildings on Residential plots." (b) AND WHEREAS, the three member committee appointed by Authority had given its report on 8th December 2017 about permitting mix user on already allotted plots which is submitted to the 144th Authority meeting held on 12th January 2018 and Authority vide Resolution भाग दोन-------१६--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९ 1436 has resolved as follows :- to allow mix user for the vacant plots allotted by the MMRDA in ' G ' Block of BKC which are under construction or on which the construction is yet to commence by allowing 30% of the Residential use in buildings on Commercial Plots and following due procedure under Section 37 of the MR and TP Act, 1966 for carrying out modifications in Regulations 4 (i) of MMRDA's Development Control Regulations, 1979 for Bandra-Kurla Complex Notified Area.
6. NOW THEREFORE, in exercise powers conferred by Clauses(d) of sub-section (3) Section 4 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, read with Section 21 of the Mumbai General Clauses Act, 1904 and all other powers enabling it in this behalf, the MMRDA gives notice under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, announcing its intention to make the following modification to the MMRDA's Development Control Regulations, 1979 by inserting the following text at the end of Regulation 4(i) as given below :—
"….Except for the plots allotted by the MMRDA in ' G ' Block of BKC which are under construction or on which the construction is yet to commence, Residential use upto 30% of the total built up area is permissible in buildings on Commercial Plots."
7. Notice is being given to invite suggestions and / or objections, if any, to the proposed modification. These suggestions and / or objections should be communicated in writing within one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette to the Chief, Town and Country Planning Division, 3rd Floor, Mumbai Metropolitan Region Development Authority, (MMRDA), New Office Building, Plot Nos. are 5, 6 and 12, ' E ' Block, Bandra-Kurla Complex, Near Drive-in Theatre, Bandra (East), Mumbai 400 051.
U. P. S. MADAN, Metropolitan Commissioner, Place : Mumbai, Date : 16th March 2018. MMRDA.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९ ५मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
नोटीस
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टिसीपी (पी-२)/वभात/निप्र/२/५५२/२०१८
ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (Maharashtra-IV of १९७५) अनुसार स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त प्राधिकरण" असा करण्यात आला आहे), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ४०(१)(सी) अनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आपल्या नगरविकास विभागाच्या दिनांक ३ डिसेंबर २००५ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टिपीबी-४३०५/सीआर-३१८/०५/ नवि-११, अन्वये वडाळा अधिसूचित क्षेत्रासाठी (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिसूचित क्षेत्र" असा करण्यात आला आहे) 'विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, या अधिसूचित क्षेत्रातून माथाडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेला वाटप केलेले क्षेत्र महाराष्ट्र शासनाने आपल्या नगरविकास विभागाच्या दिनांक १३ फेब्रुवारी २००८ रोजीच्या अधिसूचने अन्वये वगळण्यात आले होते ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४०(३) (डी) अन्वये आपल्या अधिकारांचा वापर करून संचालक, नगररचना यांनी उक्त अधिसूचित क्षेत्राच्या विकासासाठी अशा क्षेत्राला लागू करावयाच्या नियोजन प्रस्तावास प्राधिकरणाने सादर केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीसह अनुक्रमे दिनांक १६ नोव्हेंबर २०१० तसेच दिनांक १० जानेवारी २०११ रोजीच्या अधिसूचने अन्वये मंजुरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने आपल्या नगरविकास विभागाच्या दिनांक १० ऑगस्ट २०११ रोजीच्या अधिसूचने अन्वये सी.एस. क्र. ८(पै) [जुना सी.एस. क्र. ६(पै) आणि ९(पै)], मौजे आणिक वडाळा येथील माथाडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेस वितरित केलेली जमीन ही उक्त अधिसूचित क्षेत्रामध्ये पुन्हा समाविष्ट केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११५(३) अन्वये संचालक, नगररचना, महाराष्ट्र शासन यांनी नव्याने समाविष्ट केलेल्या माथाडी कामागार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या जमिनीचे नियोजन प्रस्तावास दिनांक २५ एप्रिल २०१३ रोजीच्या अधिसूचने अन्वये मंजुरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ५ जून २०१० रोजी झालेल्या शक्ती प्रदान समितीच्या (Empowered Committee) बैठकीत असा निर्णय झाला की, वडाळा येथील भारवाहक तळ हे इतरत्र हलवावे व सदर क्षेत्र वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर वाणिज्यिक केंद्र म्हणून विकसित करावे ;
आणि ज्याअर्थी, वडाळा येथील अधिसूचित क्षेत्रात अस्तित्वात असलेली मोनोरेल स्थानके व त्यांचे डेपो, प्रस्तावित मेट्रो रेल व त्यांची स्थानके अशा सर्व वाहतुकीच्या सुविधांचा विचार करून "वाहतूक आधारित विकास" (Transit Oriented Development - TOD) या संकल्पनेवर वडाळा अधिसूचित क्षेत्राचा विकास करण्याचे उक्त प्राधिकरणाने प्रस्तावित केले आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरणाने दिनांक १२ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या १४४ व्या बैठकीत पारित केलेला ठराव क्र. १४३४ अनुसार, उक्त अधिसूचित क्षेत्रासाठी तयार केलेल्या फेरबदलाचा नियोजन प्रस्ताव व विकास नियंत्रण नियमावलीस उक्त अधिनियमाच्या कलम ४० (३) (डी) अन्वये प्राप्त झालेल्या आणि याबाबतीत सहाय्यभूत ठरतील अशा इतर सर्व अधिकारांचा वापर करून मान्यता दिली असून याबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याची नोटीस प्रसिद्ध करण्यास महानगर आयुक्त यांना प्राधिकृत केले आहे.
म्हणून, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ४०(३) (डी) अन्वये, प्राप्त झालेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत सहाय्यभूत ठरतील अशा इतर सर्व अधिकारांचा वापर करून हे प्राधिकरण उक्त अधिनियमाचे कलम ३७(१) कलम ११५ सोबत वाचले असता उक्त अधिसूचित क्षेत्रासाठी तयार केलेल्या मंजूर नियोजन प्रस्ताव व विकास नियंत्रण नियमावलीमध्ये प्रस्तावित बदल करण्यास ही नोटीस प्रसिद्ध करीत आहे आणि जनतेकडून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत सूचना व आक्षेप मागवित आहे. ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याचा आत काही सूचना आणि / किंवा आक्षेप असल्यास प्रमुख, नगर व क्षेत्र नियोजन विभाग, ३ रा मजला, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, प्लॉट क्र. सी-१४ व सी-१५, "ई" ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल करावेत ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९उक्त अधिसूचित क्षेत्राकरिता तयार केलेला फेरबदलाचा नियोजन प्रस्तावाचा अहवाल, प्रस्तावित फेरबदलाचा भू-वापर नकाशा आणि विकास नियंत्रण नियमावलीची प्रत, प्रमुख, नगर व क्षेत्र नियोजन विभाग, ३ रा मजला, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, प्लॉट क्र.आर-५, ६ व १२, "ई" ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत लोकांना पहावयास मिळतील. त्याचप्रमाणे सदर प्रारुप नियोजन प्रस्तावाच्या प्रती खालील कार्यालयात देखील जनतेला पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत :----
(१) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१,
(२) जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई ४०० ००१,
(३) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, १० वा मजला, प्रशासकीय इमारत, चेतना कॉलेजजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१,
(४) उप संचालक, नगररचना, बृहन्मुंबई, ENSA हटमेंट्स, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१.
सदर प्रती त्यावर नमूद केलेल्या किमतीस जनतेला प्रमुख, नगर व क्षेत्र नियोजन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांच्या वर नमूद केलेल्या पयावरील कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदर प्रती प्राधिकरणाच्या www.mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
ठिकाण : मुंबई, दिनांक : १६ मार्च २०१८.
यू. पी. एस. मदान, महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९ ७MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notice
Maharashtra Regional and Town Planning Act,1966 (Maharashtra XXXVIII of 1966) No. TCP (P-2) / WNA / PP / 02 / 552 / 2018
WHEREAS, the Government of Maharashtra has appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to by its acronym "MMRDA"), established under MMRDA Act,1974 (Maharashtra IV of 1975) to be the Special Planning Authority (hereinafter referred to as the "Authority") for the Wadala Notified Area (hereinafter referred as the "said Notified Area") by the State Government in Urban Development Department Notification No. TPB-4305/CR-318/05/UD-11, dated 3rd December 2005 promulgated in exercise of its powers conferred by Clause (c) of Sub-Section (1) of Section 40 of Maharashtra Regional and Town Planning Act,1966 (hereinafter referred as the "said Act") ;
AND WHEREAS, certain area of land bearing C.S.No.6(pt) & 9(pt) of village Anik, Wadala allotted to Mathadi Kamgar Co-op Housing Society was deleted from the said Notified Area vide Government in Urban Development Department's Notification dated 13th February 2008 ;
AND WHEREAS, in exercise of its powers under Section 40(3)(d) of the said Act, the Director of Town Planning, Maharashtra State, vide Notification dated 16th November 2010 and 10th January 2011 sanctioned the Planning Proposals alongwith Development Control Regulations respectively, submitted by the Authority for the development of lands in the said Notified Area excluding C.S. No. 6 (pt) & 9 (pt) of village Anik, Wadala.
AND WHEREAS, thereafter area of land bearing C.S. No.8 (pt) [old No.6(pt) & 9 (pt)] of village Anik, Wadala allotted to Mathadi Kamgar Co-op Housing Society was included in the boundaries of the said Notified Area vide Government in Urban Development Department's Notification, dated 10th August 2011 ;
AND WHEREAS, Planning Proposals for the newly added land of Mathadi Kamgar Co-op Housing Society was sanctioned by the Director of Town Planning, Maharashtra State under Section 115(3) of the said Act vide its Notification dated 25th April 2013 ;
AND WHEREAS, an Empowered Committee meeting was held under the Chairmanship of Chief Secretary, Government of Maharashtra, on 5th June 2010 wherein it was decided that Truck Terminal located at Wadala shall be shifted elsewhere and that this area shall be developed as a commercial centre on the lines of Bandra-Kurla Complex ;
AND WHEREAS, Considering the fact that there are transport facilities like existing Monorail stations & its Depot and proposed Metro rail stations, the said Notified Area is proposed to be developed on the basis of Transit Oriented Development by MMRDA ;
AND WHEREAS, the MMRDA in exercise of the powers under Section 40(3)(d) of the said act and all other powers enabling it in this behalf by Resolution No. 1434, passed in its 144th meeting held on 12th January 2018 has approved the modifications to the Planning Proposals of the said Notified Area and for this purpose has authorised the Metropolitan Commissioner to publish this notice for inviting suggestions and objections from the public ;
NOW THEREFORE, in exercise of the powers conferred by Section 40 (3)(d) of the said Act, and all other powers enabling it in this behalf, MMRDA publishes this notice under Section 37(1) read along with Section 115 of the said act, to make modifications to the Planning Proposals and Development Control Regulations of the said Notified Area and invites suggestions and objections from the public within one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette. The suggestions and/or objections, if any, should be communicated in writing within one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette to the Chief, Town & Country Planning Division, 3rd Floor, Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), New Office Building, Plot Nos.R-5, 6 and 12, 'E' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 ;
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९A copy of the report of the proposed modifications to Planning Proposals, proposed modified Land Use Plan and proposed modified Development Control Regulations of the said Notified Area is available for inspection to the public at the office of Chief, Town and Country Planning Division, 3rd Floor, Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), New Office Building, Plot Nos. R-5, 6 and 12, 'E' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 during office hours on all working days. The said copies are also available for inspection to the public at the following offices :—
(1) The Municipal Commissioner, Municipal Corporation of Greater Mumbai, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001,
(2) The Collector of Mumbai City District, Old Custom House, Fort, Mumbai 400 001, (3) The Collector, Mumbai Suburban District,10th Floor, Administrative Building, Near Chetna College, Government Colony, Bandra (East), Mumbai 400 051,
(4) The Dy. Director of Town Planning, Greater Mumbai, ENSA Hutments, Mahapalika Marg, Mumbai 400 001.
The said copies are available for sale to the public at a price indicated thereon in the office of the Chief, Town and Country Planning Division, MMRDA, on the above address during office hours on all working days.The same are also available on MMRDA's website www.mmrda.maharashtra.gov.in.
U. P. S. MADAN, Place : Mumbai, Metropolitan Commissioner, Date : 16th March 2018. MMRDA.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.