Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cent. (Ext. 19) (Mar. 19th 2018)

Published 19 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १९, २०१८/फाल्गुन २८, शके १९३९ १

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक १४] सोमवार, मार्च १९, २०१८/फाल्गुन २८, शके १९३९ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा

अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

४ था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ मार्च २०१८ उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयुएन २०१७/प्र.क्र.३२५/नवि १८.------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे सालेकसा नगरपंचायतीची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या ; इतर सर्व अधिकारांचा वापर करून अनुसूची "अ" मध्ये नमुद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करून उद्घोषणा काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा सोबत जोडला आहे.

२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीत मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक एमयुएन २०१७/प्र.क्र.३२५/नवि १८.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार व त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयुएन २०१७/प्र.क्र.३२५/ नवि १८, दिनांक १९ मार्च २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ मध्य उप विभाग, दिनांक १९ मार्च २०१८ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यतील सालेकसा या नगरपंचायतीची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) याअन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत :

(१)

भाग एक-अ (म.उ.वि.)----१९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १९, २०१८/फाल्गुन २८, शके १९३९ आणि ज्याअर्थी उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून सालेकसा नगरपंचायतीच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) मध्ये अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून सालेकसा नगरपंचायतीच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. सालेकसा नगरपंचायतीच्या सुधारित सीमा अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची "अ"

सालेकसा नगरपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील

आमगाव (खुर्द) ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र

अनुसूची "ब"

अनुसूची "अ" मध्ये नमुद केलेले स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर सालेकसा नगरपंचायतीच्या सुधारित सीमा

विद्यमान सालेकसा नगरपंचायतीच्या क्षेत्राची हद्द आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा ३) अन्वये स्थापन केलेल्या आमगाव (खुर्द) या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १९, २०१८/फाल्गुन २८, शके १९३९ ३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated 19th March 2018.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUN-2017/C.R. 325/UD-18.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section 3 of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act") the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section(1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), with a view to alter the limits of the Municipal area of the Salekasa Nagarpanchayat in Gondia District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' the draft of which is appended hereto ;

2. Any person who entertains any objection to the said Proclamation is hereby required to submit the same, in writing, with the reasons therefor, to the Collector, District Gondia within period of 30 days, from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUN-2017/C.R.325/UD18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2017/C.R.325/UD18, dated 19th March, 2018 Maharashtra Government Gazette, extraordinary Part 1-A Central Sub-Division, dated19th March, 2018, issued in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 6 read with sub-section 3 of Section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has invited the objections to its proposal to issue a notification under clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, to alter the limits of the Municipal area of the Salekasa Nagarpanchayat in Gondia District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended to the said Proclamation ;

And whereas, the Government has considered the objections and suggestions so received by the Collector, Gondia District pursuant to the said Proclamation received within the period specified therein ;

And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra consideres it expedient to alter the limits of the Salekasa Nagarpanchayat in Gondia District so as to include therein the areas specified in Schedule "A" appended hereto.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a), sub-section (1) of section 6 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, hereby alters the limits of the Municipal area of the Salekasa Nagarpanchayat in Gondia District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended hereto and declares that the revised boundaries of the Salekasa Nagarpanchayats so altered shall be such as shown in Schedule "B" appended hereto.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १९, २०१८/फाल्गुन २८, शके १९३९

Schedule "A"

Description of the local area to be included in the limits of the Municipal area of the

Salekasa Nagarpanchayat

The whole area of the Village Panchayat of Amgaon (Khurd)

Schedule "B"

Revised boundries of the Salekasa Nagarpanchayat after inclusion of the local area

specified in Schedule "A"

Boundries of the area of the existing Salekasa Nagarpanchayat and boundries of the area of the Village Panchayat of Amgaon (Khurd) constituted under the Maharashtra Village Panchayats Act, (III) of 1959.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH MOGHE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.