RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४, अंक १४] मंगळवार, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १---४ सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.---- मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
दिनांक २० मार्च २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर '' महाराष्ट्र शासन राजपत्रात '' दिनांक २० मार्च २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र
नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा
करण्यासाठी अधिनियम.
१८८८ चा ३. १९४९ चा ५९. १९६५ चा महा. ४०.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :------
(१)
भाग चार----२९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९
प्रकरण एक
प्रारंभिक
संक्षिप्त नाव.
1 . या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८, असे म्हणावे.
प्रकरण दोन
मुंबई महानगरपालिका अधिनियम याच्या सुधारणा.
२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुंबई महानगरपालिका अधिनियम " १८८८ चा ३.
असा करण्यात आला आहे) कलम ५ब मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-----
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ब ची सुधारणा.
२०१८ चा महा. २१.
" परंतु, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, सार्वत्रिक किंवा पोट- निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरु होणाया आणि ३० जून २०१९ रोजी संपणाया कालावधी दरम्यानचा असेल, त्याबाबतीत, जिने नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी, आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत,----
(एक) वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि (दोन) ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र,
सादर करील : ".
३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७ मधील पोट-कलम (२अ) मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :----
२०१८ चा महा. २१.
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३७ ची सुधारणा.
"परंतु, महापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरु होणाया आणि ३० जून २०१९ रोजी संपणाया कालावधी दरम्यानचा असेल, त्याबाबतीत, जिने नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी, आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत,----
(एक) वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि (दोन) ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र,
सादर करील : ".
प्रकरण तीन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्या सुधारणा.
१९४९ चा ५९.
४. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम" असा करण्यात आला आहे) कलम ५ ब मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :---
सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ब ची सुधारणा.
२०१८ चा महा. २१.
" परंतु, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, सार्वत्रिक किंवा पोट- निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९ दिनांकापासून सुरू होणाया आणि ३० जून २०१९ रोजी संपणाया कालावधी दरम्यानचा असेल, त्याबाबतीत, जिने नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी, आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत,---
(एक) वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि
(दोन) ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र,
सादर करील : ''.
५. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ मधील, पोट-कलम (१ब) मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :---
सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम १९ ची सुधारणा.
२०१८ चा महा. २१.
"परंतु, महापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरु होणाया आणि ३० जून २०१९ रोजी संपणाच्या कालावधी दरम्यानचा असेल, त्याबाबतीत, जिने नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी, आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत,-
(एक) वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि
(दोन) ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र,
सादर करील : ''.
प्रकरण चार
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याच्या सुधारणा.
१९६५ चा महा.४०.
६. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५, (यात यापुढे ज्याचा निर्देश " नगरपरिषदा अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ९अ मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :-
सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ९अ ची सुधारणा.
२०१८ चा महा. २१.
" परंतु, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, सार्वत्रिक किंवा पोट- निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरु होणाया आणि ३० जून २०१९ रोजी संपणाया कालावधी दरम्यानचा असेल, त्याबाबतीत, जिने नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी, आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत,---
(एक) वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि (दोन) ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र,
सादर करील : ''.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९७. नगरपरिषदा अधिनियमाच्या कलम ५१-१ब मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल:-
२०१८ चा महा. २१.
सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ५१-१ब ची सुधारणा.
"परंतु, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरु होणाया आणि ३० जून २०१९ रोजी संपणाया कालावधी दरम्यानचा असेल, त्याबाबतीत, जिने नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी, आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत,-----
(एक) वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि (दोन) ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र,
सादर करील : ''.
८. नगरपरिषदा अधिनियमाच्या कलम ३४१ब मध्ये, पोट-कलम (४) मध्ये,-----
(क) " कलमे ९ '' या मजकुरानंतर, ", ९अ '' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;
(ख) " कलम ५१-१क '' या मजकुराऐवजी, " कलमे ५१-१क व ५१-१ब '' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३४१ब ची सुधारणा.