Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 17) (21-3-2018))

Published 21 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक १४] बुधवार, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

नाशिक महानगरपालिका, नाशिक

राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभाग

तळमजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२ ००२

अधिसूचना

पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४.

क्रमांक नामनपा/राफेधो/कार्या-१/प्र.क्र.-३९/२०१८.---- नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे विनियमन व नियत्रंण करण्याच्या दृष्टीने, पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ याच्या कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, नाशिक महानगरपालिकेने ठराव क्रमांक १२०२ दिनांक ३ जानेवारी २०१८ अन्वये तयार केलेल्या उपविधींचा मसुदा, त्याद्वारे बाधित होण्याची शक्यता असणाया सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि अशी नोटीस देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत उक्त मसुदा संबधित कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना असतील अशा हरकती किंवा सूचना राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभाग, तळमजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२ ००२ येथे आणि नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय, नाशिक पूर्व, विभागीय कार्यालय, नाशिक पश्चिम, विभागीय कार्यालय, पंचवटी, विभागीय कार्यालय, नाशिक रोड, विभागीय कार्यालय, नवीन नाशिक, विभागीय कार्यालय, सातपूर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील. तीस दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

उपविधींचा मसुदा

प्रस्तावना :

केंद्रशासनाने पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ दिनांक १ मे २०१४ पासून लागू केला आहे. सदर अधिनियमाच्या कलम ३६ नुसार मा. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६ व अधिनियमाच्या कलम ३८ नुसार पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०१७ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात लागू करण्यात आली आहे.

(१)

भाग दोन--- १७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ आता, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५८ आणि पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे विनियमन व नियंत्रण करण्याकरिता पुढील उपविधी करीत आहे :----

प्रकरण एक

प्रारंभिक

१. (क) संक्षिप्त नाव :---या उपविधींना, पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (नाशिक महानगरपालिका) उपविधी, २०१७ असे संबोधण्यात येईल.

(ख) हे उपविधी नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू राहतील.

२. व्याख्या :---या उपविधींमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,

(क) " अधिनियम " याचा अर्थ, पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ असा आहे.

(ख) " नियम " याचा अर्थ, महाराष्ट्र पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६ असा आहे.

(ग) " योजना " याचा अर्थ, पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०१७ असा आहे.

(घ) या उपविधीमध्ये वापरलेले, परंतु विर्िनदिष्टपणे व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अधिनियमामध्ये, नियमांमध्ये, योजनामध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.

प्रकरण दोन

नाशिक महानगरपालिका हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण व नोंदणी

३. (१) नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयातंर्गत येणाया क्षेत्रांतील पथविक्रेत्यांचे विभागीय अधिकारी स्तरावर दर पाच वषार्ंनी नाशिक महानगरपालिका नगर पथ विक्रेता समिती मार्फत सर्वेक्षण करण्यात येईल.

(२) सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षणाची पद्धती, नियोजन इत्यादींबाबत पर्याप्त प्रसिद्धी देण्यात येईल.

(३) सर्वेक्षणामध्ये विभागीय अधिकारी स्तरावर पथविक्रेता (उपजिविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०१७ समवेतच्या परिशिष्ट-१ मधील नमुन्यात प्रत्येक पथविक्रेत्यांची माहिती संकलित करण्यात येईल.

(४) पथविक्रेता म्हणून नोंदणी करण्यासाठी व्यक्तीकरिता पुढीलप्रमाणे पात्रता निकष असतील :----

(i) ती भारताची नागरिक असावी.

(ii) ती महाराष्ट्रातील अधिवासी असावी.

(iii) तिचे वय सर्वेक्षणाच्या दिनांकास १४ वषार्ंपेक्षा कमी नसावे.

(iv) तिला पथ विक्री खेरीज उपजिविकेची अन्य साधने उपलब्ध असणार नाहीत.

(५) नाशिक महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकायाने नोंदणी प्रमाणपत्र, पथविक्री प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिल्याशिवाय केवळ पथविक्रेता म्हणून नोंदणी केल्यामुळे/यशस्वीरीत्या नोंदणीकृत पथविक्रेता यादीमध्ये नाव प्रसिद्ध झाल्यामुळे पथविक्री करण्याचा कोणताही हक्क प्रदान होणार नाही.

( 6 ) Ê ´ É ¦ É É M É Ò ª É E ò É ª É É Ç± É ª É Ê x É ½ þÉ ª É º É ´ É Ç { É l É Ê ´ É G äò i ª É É ÆS É Ò ¨ É É Ê ½ þi É Ò (Database) ठेवण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ ३

प्रकरण तीन

निबर्ंधमुक्त विक्री प्रक्षेत्रे, निबर्ंधित विक्री प्रक्षेत्रे आणि विशिष्ट प्रयोजनासाठी

सर्मपित केलेल्या विक्री प्रक्षेत्रात पथविक्रीचे विनियमन आणि पद्धती

४. (क) विक्री प्रक्षेत्रात विक्री प्रमाणपत्र दिलेल्या विक्रेत्यासच व्यवसाय करता येईल.

(ख्) एका स्थिर पथविक्रेत्यासाठी १ मीटर × १ मीटर जागेचा विचार करणेत येईल. मात्र जो व्यवसाय या भागाच्या जागेत होऊ शकत नाहीत, (उदा. उसाच्या रसाची विक्री) अशा व्यवसायासाठी १ मीटर × १ मीटर किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार त्या पटीत जागेचा विचार करण्यात येईल.

(ग) पथविक्रेत्यास, त्यास नेमून दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा लागेल, त्यापेक्षा अधिक जागा वापरता येणार नाही.

(घ) पादचायांना/वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळा होईल अशा रितीने व्यवसाय करता येणार नाही.

(ङ़) विक्री प्रक्षेत्राच्या धारण क्षमतेपेक्षा अधिक विक्रेत्यांना संबंधित विक्री प्रक्षेत्रात विक्री प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत. पथविक्री प्रक्षेत्रात सार्वजनिक उपयोगाच्या कामासाठी पुरेशी जागा सोडणे आवश्यक राहील.

(च) निबर्ंधित विक्री प्रक्षेत्रात नेमून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करावा लागेल. वेळ संपल्यानंतर विक्रेत्याने आपले सर्व साहित्य काढुन घेऊन जागा रिकामी करून घ्यावी लागेल.

(छ) फळे, भाजीपाला, फुले, अन्न, मासे, कृषी उत्पन्न बाजार इत्यादी विशिष्ट प्रयोजनासाठी निश्चित केलेल्या प्रक्षेत्रांमध्ये त्या-त्या संबंधित वस्तू विक्रेत्यांशिवाय अन्य विक्रेत्यांना व्यवसाय करता येणार नाही.

(ज) पथविक्रेत्यांना पथविक्रीचे ठिकाणी अन्न पदार्थ तयार करून किंवा शिजवून विक्री करता येणार नाही.

(झ) जी प्रक्षेत्रे आठवडे बाजार म्हणून निश्चित केली आहेत. अशा प्रक्षेत्राच्या धारण क्षमतेनुसार प्रथम येणायास प्रथम प्रधान्य या तवावर आठवडे बाजार भरविला जाईल.

(ञ) सण किंवा उत्सवाचे वेळी तात्पुरत्या कालावधीसाठी निर्माण केलेल्या पथविक्री प्रक्षेत्रात तात्पुरता विक्री परवाना असल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही. तात्पुरत्या परवान्याची मुदत संपल्यानंतर त्वरित जागा खाली करून द्यावी लागेल.

(ट) पथविक्रेत्याने योजनेत तरतूद केल्यानुसार मुदतीत विक्री प्रमाणपत्राचे नुतनीकरण न केल्यास त्यास विक्री प्रक्षेत्रातून निष्काशित करणेत येईल.

(ठ) पथविक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागेची सार्वजनिक प्रयोजनासाठी नाशिक महानगरपालिकेस आवश्यकता असल्यास अधिनियमाच्या कलम १८ मधील तरतुदींनुसार जागा खाली करून घेण्यात येईल आणि त्याठिकाणच्या पथविक्रेत्याची अन्य विक्री प्रक्षेत्रात व्यवस्था करण्यात येईल.

(ड) महानगरपालिका आयुक्त तथा अध्यक्ष, नगर पथ विक्रेता समिती यांना आवश्यकतेनुसार वेळोवेळी फेरीवाला क्षेत्राची जागा बदल करण्याचा अधिकार असेल.

५. फिरत्या पथ विक्रेत्यांचे विनियमन :---

(१) फिरत्या पथविक्रीचा परवाना असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस ढकलगाडी, पायी दारोदार फिरून, कोणत्याही वाहनाच्या वापराद्वारे, डोकओझी किंवा अन्य अशाप्रकारच्या कोणत्याही पद्धतीने पथविक्रीचा व्यवसाय करता येणार नाही.

(२) फिरते पथविक्रेत्याने त्यास नेमून दिलेल्या हद्दीतच फिरून व्यवसाय करावा. कोणत्याही रस्त्यावर किंवा चौकात एकाच जागेवर थांबून व्यवसाय करता येणार नाही.

(३) फिरता फेरीवाला वाहन अगर हातगाडीचा वापर व्यवसायासाठी करणार असल्यास हद्दीनुसार ठरवून दिलेला रंग आपल्या व्यवसाय हातगाडीस/वाहनास लाऊन तदनंतरच व्यवसाय चालू करता येईल.

भाग दोन--- १७--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ (४) फिरत्या पथविक्रेत्यास नेमून दिलेल्या हद्दीच्या बाहेरून हातगाडीवर/वाहनावर व्यवसायाचा माल आणणे आवश्यक असल्यास बाहेरील हद्दीमधुन नेमून दिलेल्या हद्दीमध्ये येईपयर्ंत हातगाडीवरील माल कापडाने किंवा ताडपत्रीने झाकून आणणे आवश्यक राहील. नेमून दिलेल्या हद्दीमध्ये आल्यानंतरच मालाची विक्री करता येईल.

(५) फिरत्या पथविक्रेत्याने त्याला दिलेले ओळखपत्र सहज दिसेल अशा पद्धतीने व्यवसाय करते वेळी दर्शनी भागात लावणे आवश्यक राहील.

(६) पथविक्रेता ओळखपत्र किंवा विक्री प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचे आढळल्यास ओळखपत्र/विक्रीप्रमाणपत्र रद्द किंवा निलंबित करून कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

(७) फिरत्या पथविक्रेत्यास नेमून दिलेल्या हद्दीच्या वर्गीकरणानुसार नाशिक महानगरपालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार दैनंदिन/ मासिक जागा लायसेन्स फी महानगरपालिकेस अदा करणे बंधनकारक राहील.

(८) फिरत्या पथविक्रेत्यास देण्यात आलेले ओळखपत्र किंवा विक्री परवान्याचे हस्तांतरण करता येणार नाही किंवा विक्री अथवा भाडेपट्टयाने देता येणार नाही.

प्रकरण चार

विक्री प्रक्षेत्रांत नागरी सोयी-सुविधा पुरविणे

६. (१) महानगरपालिका विक्री प्रक्षेत्रांत वीज, पिण्याचे पाणी, दैनंदिन साफसफाई यासारख्या मूलभूत सुविधा पुरविल.

(२) काही विशिष्ट विक्री क्षेत्रात अन्य काही सुविधा पुरविण्याची आवश्यकता भासल्यास अशा सुविधा मनपाच्या सक्षम प्राधिकायाच्या मंजुरीने पुरविणेत येतील.(उदा.कोल्ड स्टोरेज इत्यादी).

(३) संबधित पथविक्रेत्यास नाशिक महानगरपालिका वेळोवेळी निश्चित करील त्या दराने मासिक देखभाल आकार (मेन्टेनन्स चार्जेस) दरमहाचे १० तारखेपयर्ंत महानगरपालिकेमध्ये भरावे लागतील.

(४) महानगरपालिकेतर्फे देखभाल आकार (मासिक मेन्टेनन्स) दरात दर तीन वषार्ंनी १०% वाढ करणेत येईल. अशी करण्यात येणारी दरवाढ पथविक्रेत्यावर बंधनकारक असेल.

(५) वरील (३) व (४) मध्ये नमूद केलेले मेन्टेनन्स चार्जेस हे पथविक्रेत्यास भराव्या लागणाया पथविक्री शुल्कापेक्षा (दैनंदिन/मासिक जागा लायसेन्स फी) वेगळे असतील.

प्रकरण पाच

दंड आकारणी

७. (१) अधिनियमाच्या कलम १८ (४) नुसार पथविक्रेता पथविक्री प्रक्षेत्रातील जागा रिकामी करून देण्यास असमर्थ ठरल्यास अधिनियमाच्या कलम १८ (५) मधील तरतुदीनुसार त्या पथविक्रेत्यास नोटीसचा कालावधी संपल्यानंतर दर दिवसासाठी रुपये २५० पयर्ंतचा दंड आकारणेत येईल.

(२) मात्र अशा दंडाची एकूण रक्कम जप्त केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षा अधिक होणार नाही.

(३) जर पथविक्रेता;

(अ) पथविक्री प्रमाणपत्राशिवाय पथविक्रीचा व्यवसाय असेल;

(ब) पथविक्री प्रमाणपत्राच्या अटी-शर्ती भंग करीत असेल किंवा

(क) पथविक्री अधिनियम, नियम किंवा योजनेतील तरतुदींचा भंग करीत असेल,

तर दंड आकारणारा प्राधिकारी अशा प्रत्येक प्रकरणी रुपये दोन हजार पयर्ंत कसूरदारास दंड करील. परंतु दंड आकारणारा प्राधिकारी पथविक्रेत्याला त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देईल.

(४) विक्री प्रमाणपत्राचे विहित कालावधीत नुतनीकरण न केल्यास विलंब कालावधीसाठी रुपये १५ प्रतिदिन इतका दंड आकारण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ ५

प्रकरण सहा

पथविक्री क्षेत्रातील कर आणि फी च्या वसुलीचे विनियमन

८. (१) महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकायाने वेळोवेळी निश्चित केलेले जागा लायसेन्स फी चे दराने प्रत्येक पथविक्रेत्याकडून दैनंदिन/मासिक जागा लायसेन्स फी वसूल करणेत येईल.

(२) मासिक जागा लायसेन्स फी चे बाबतीत प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपयर्ंत पथविक्रेत्याने फी भरली पाहिजे.

(३) पथविक्रेत्यास जागा नेमून दिल्यानंतर एक महिन्याची जागा लायसेन्स फी आगाऊ भरणे बंधनकारक राहील.

(४) पथविक्रेत्याच्या विक्री प्रक्षेत्रात बदल झाल्यास नवीन विक्री प्रक्षेत्रास लागू असलेल्या जागा लायसेन्स फी च्या दराने फी वसूल करण्यात येईल.

(५) सण-उत्सव कालावधीतील तात्पुरत्या विक्री परवाना धारकांनी संबंधित कालावधीची जागा लायसेन्स फी आगाऊ भरणे बंधनकारक राहील.

(६) आठवडे बाजार, सण-उत्सव बाजार या ठिकाणी विक्री प्रक्षेत्रासाठी विहित केलेल्या वर्गीकरणानुसारच दैनंदिन जागा लायसेन्स फी चे दर लागू राहतील.

(७) ज्या बाबींसाठी पथविक्रेत्यास शासकीय कर भरणे आवश्यक असल्यास असे कर जागा लायसेन्स फी चे व्यतिरिक्त असतील.

(८) पथविक्री प्रक्षेत्रात पुरविण्यात येणाया नागरी सोयी सुविधांसाठी अधिनियमाचे कलम १७ अन्वये आकारणी करण्यात येणारे देखभाल आकार जागा लायसेन्स फी चे व्यतिरिक्त असतील.

(९) दैनंदिन/मासिक जागा लायसेन्स फी अथवा इतर दंड आकार इ. महानगरपालिकेच्या कर्मचायांमार्फत प्रत्यक्षपणे किंवा राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत किंवा अन्य साधनाद्वारे वसूल करण्याची व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

प्रकरण सात

विक्री प्रक्षेत्रात जनतेला पुरविणेत येणाया वस्तू आणि सेवांच्या दर्जा आणि सार्वजनिक आरोग्य

९. (१) पथविक्रेता जनतेला पुरविणेत येणाया वस्तू व सेवांचा दर्जा निर्धारीत मानकांनुसार असल्याची सुनिश्चिती करेल.

(२) पथविक्रेता पथविक्री व्यवसायातून निर्माण होणाया कचयाची एकत्रितपणे विल्हेवाट लावण्यासाठी योगदान देईल. विक्री व्यवसायातून निर्माण होणाया कचयाची रोजचे रोज नाशिक महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेद्वारे विल्हेवाट लावेल. (उदा. घंटागाडी, कचराकुंडी इत्यादी)

(३) पथविक्रेता पथविक्री क्षेत्रात खुल्या जागेत, रस्त्याच्या कडेला किंवा गटारात अनाधिकृतपणे कचरा रचून ठेवणार नाही. पथविक्री प्रक्षेत्रात संपूर्ण वेळ स्वच्छता राहील यासाठी पथविक्रेता योगदान देईल.

(४) पथविक्रेता जनतेचे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता यासाठी उपद्रवी, धोकादायक व प्रदुषणकारी जलदगतीने विकल्या जाणाया वस्तू विकणार नाही.

(५) पथविक्रेत्यास पथविक्री प्रक्षेत्रात स्वयंपाक करण्यास किंवा अन्न पदार्थ तयार करण्यास परवानगी असणार नाही.

(६) पथविक्री प्रक्षेत्रात निर्माण होणारा कचरा जाळण्यास परवानगी असणार नाही.

प्रकरण आठ

संकीर्ण

१०. (१) कोणत्याही जुन्या योजनेअंतर्गत अथवा विशेष मंजुरीने पथविक्रीची परवानगी दिली आहे अशा सर्व व्यक्तींना या उपविधीच्या तरतुदी लागू होतील.

(२) या पूर्वीच्या कोणत्याही परवानगीने वाटप झालेल्या जागेवर विक्रेत्याने कोणतीही स्थिर संरचना/बांधकाम केलेले असल्यास विक्रेत्याने ते निष्कासित करून जागा पूर्णता मोकळी करणे आवश्यक आहे.

(३) भोगवटादाराच्या अपात्रतेमुळे रिकाम्या झालेल्या जागा त्या-त्या पथविक्री प्रक्षेत्रांसाठी असलेल्या प्रतिक्षा यादीतील नोंदणीकृत व्यक्तींना वाटप करण्यासाठी विचारात घेण्यात येतील.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९

(४) पथविक्रेते व इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्याशी विचारविनिमय करून विक्री प्रक्षेत्रांतील शौचालये, कचरा विल्हेवाट सुविधा, प्रकाश योजना, मालवाहतुक करणाया विशिष्ट प्रकारच्या हातगाडया, वाहनतळ सुविधा या सारख्या सेवांच्या सुधारणेसाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत सहाय्य करण्यात येईल.

(५) पथविक्रेत्यांचे हक्क व जबाबदाया, त्यांच्याशी संबंधित धोरणे, कायदे व योजना, अन्न सुरक्षा, आरोग्य राखणे, कचयाची विल्हेवाट यांसारख्या बाबींवर पथविक्रेत्यांचे दिशा निर्देशन करण्याच्या हेतुने पथविक्रेत्यांसाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येईल.

(६) फेरीवाला धोरण उपविधी मधील काही कलमामध्ये वेळोवेळी अंशता अथवा पुर्णत: बदल करणेचा तसेच वेळोवेळी नवीन कलम समाविष्ट करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना असेल.

नाशिक, दिनांक २१ मार्च २०१८.

तुकाराम मुंढे, (भा.प्र.से.) आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.