Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

To publish the names of Special Executive Officers of Sangli District.

Published 22 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ३ ]

गुरुवार , मार्च २२ , २०१८ / चैत्र १ , शके १९ ४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

परिशिष्ट- ' ४'

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५ , दिनांक ३१ डिसेंबर २०१५ संदर्भ ( १ ) शासन निर्णय , सा.प्र.वि.क्र . विकाअ-१७०४/१०९ २/प्र . क्र. १८५/२००४/५ , दिनांक २ एप्रिल २००५ .

(२) शासन निर्णय , सा.प्र.वि.क्र . विकाअ-४१०२/ ०२/प्र . क्र. ३७/२००२/५ , दिनांक २१ एप्रिल २००५ .

(३ ) शासन निर्णय क्र. सा.प्र.वि.क्र.विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/२००७/५ , दिनांक २५ जुलै २००७ .

(४ ) शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शा.नि.क्र . विकाअ-२००७/३६६/०७/५ , दिनांक २४ मार्च २००८ .

( ५ ) शासन सामान्य प्रशासन विभाग शुद्धीपत्रक क्रमांक विकाअ-२००७/प्र . क्र. ३८९/ ५ , दिनांक १ ऑगस्ट २००८ (६) शासन सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र . क्र . २७६/५ , दिनांक २४ जुलै २००८ .

(७ ) शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-२००६/२ ९ ८/प्र . क्र. ६/०७/५ , दिनांक ७ एप्रिल २००७.

( ८ ) शासन सामान्य प्रशासन विभागाकडील पत्र क्रमांक विकाअ-१११७/२७८/प्र . क्र. १११/५ , दिनांक ६ सप्टेंबर २०१७ .

क्रमांक गृह-१/कार्या-६/पोल-१/विकाअ/आरआर-६ /१८ , दिनांक मार्च २०१८ संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, वि. ना . काळम , जिल्हाधिकारी , सांगली सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होणेपूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तत्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची राहील .

तसेच ज्या पदामुळे ( नगरसेवक/ जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य इत्यादी) विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती , ते पद संपुष्टात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल .

(१)

एच - ९ १८ , भाग एक-असा. ( पु. वि. पु. ) ३ २

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी , मार्च २२ , २०१८ / चैत्र १ , शके १९ ४० २. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना (परिशिष्ट-४) -

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन /वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/ दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत .

नये. (चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू (पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देऊ नये .

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तत्काळ परत करावे. अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील . नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल .

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहील व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल . सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्ह्याची नोंद आढळल्यास , त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास , त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

अनुसूची

जिल्हा सांगली , तालुका पलूस

अ.

निवासस्थानाचा पत्ता

विशेष कार्यकारी अधिकारी यांचे नाव

क्र.

संबंधित पोलीस स्टेशन ४ १

२

३

१

भिलवडी संजय बापूसो चौगुले

मु. पो. अंकलखोप , तालुका पलूस , जिल्हा सांगली

संजय नागेश जोशी

भिलवडी २

मु. पो. औदुंबर (अंकलखोप) , तालुका पलूस , जिल्हा सांगली

भिलवडी किरण हौसेराव बनसोडे

३

मु. पो. नागठाणे, तालुका पलूस , जिल्हा सांगली

४

पलूस

मु. पो. पलूस , मारुती चौक, तालुका पलूस , जिल्हा सांगली

श्रीमती शबाना सरदार मुजावर

५

पलूस राहूल कृष्णा साळुंखे

मु. पो. पलूस , इनाम पट्टा, तालुका पलूस , जिल्हा सांगली

६

निवृत्ती राजाराम देवळे

पलूस

मु. पो . पलूस , जुने विठ्ठल मंदिराजवळ , तालुका पलूस , जिल्हा सांगली.

७

राहूल शांताराम जगताप

पलूस

मु. पो . पलूस , महादेव मंदिराजवळ , पलूस, तालुका पलूस , जिल्हा सांगली.

८

संदीप तुकाराम बकरे

पलूस

मु. पो . आंधळी रोड, पलूस , तालुका पलूस , जिल्हासांगली.

प्रदीप विलास सांडगे

९

पलूस

मु. पो . पलूस , जुना एस.टी. स्टॅण्डजवळ , तालुका पलूस , जिल्हा सांगली.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी , मार्च २२ , २०१८ / चैत्र १ , शके १ ९ ४०

अनुसूची--चालू

१

४

३

२

१०

प्रभाकर संतराम पाटील

पलूस

मु. पो. पलूस , कृषीनगर, तालुका पलूस , जिल्हा सांगली

११

श्रीमती पदमा दिपक माळी

पलूस

मु. पो. पलूस , कृषीनगर, तालुका पलूस , जिल्हा सांगली

उत्तम शंकर मोहिते

१२

पलूस

मु.. पो . पलूस , मोरे आडाजवळ, तालुका पलूस , जिल्हा सांगली

१३

सुनिल नामदेव उगळे

पलूस

मु. पो. विठ्ठलवाडी, तालुका पलूस , जिल्हा सांगली

१४

पलूस शिवाजी आनंदा तातुगडे

मु. पो . आमणापूर , तालुका पलूस , जिल्हा सांगली

संतोष लालासो राडे

१५

पलूस

मु. पो . आमणापूर बोरजाईनगर , राडे मळा , तालुका पलूस , जिल्हा सांगली.

१६

रविंद्र नारायण पाटील

भिलवडी

मु. पो. तावदरवाडी, तालुका पलूस , जिल्हा सांगली

१७

भिलवडी श्रीमती जयश्री दत्तात्रय जठार

मु. पो. नागठाणे, तालुका पलूस , जिल्हा सांगली

१८

कुंडल

मु. पो. कुंडल , तालुका पलूस , जिल्हा सांगली

सुनिल आप्पा ऐडके

वि. ना. काळम ,

जिल्हाधिकारी , सांगली .

सांगली, १६ मार्च २०१८ .

VAIDYA , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-22.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.