Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V Ext. 19 (26th March 2018)

Published 26 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ४, अंक १०] सोमवार, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

-------------------------------

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २३ मार्च २०१८ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

L. A. BILL No. XVIII OF 2018.

A BILL

FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL

CORPORATION ACT.

सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८.

मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

१८८८ चा ३.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्त्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१८, असे म्हणावे.

२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश ''मुंबई महानगरपालिका अधिनियम'' १८८८ चा ३. असा करण्यात आला आहे) कलम ३९८ मधील, पोट-कलम (२) मध्ये,-----

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३९८ ची सुधारणा.

१९७२ चा ५९.

(क) '' तसेच महानगरपालिकेला, अनुसूची ''जज'' मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाची '' या मजकुरानंतर, '', जनावरांची, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(१)

भाग पाच------१९----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४० १९७२ चा ५९.

(ख) '' विर्िनदिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाच्या '' या मजकुरानंतर, ", जनावरांच्या, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांच्या आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांच्या (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१९७२ चा ५९.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४०१ ची सुधारणा.

३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०१ मधील, पोट-कलम (१) मध्ये, "कोणतेही जनावर'' या मजकुरानंतर, ", शोभिवंत किंवा विदेशी पक्षी आणि शोभिवंत किंवा विदेशी मासे (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१९७२ चा ५९.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४०६ ची सुधारणा.

४. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०६ मधील, खंड (फ) मध्ये, "कृषी उत्पन्नाच्या'' या मजकुरानंतर, ", जनावरांच्या, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांच्या आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांच्या (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१९७२ चा ५९.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४६१ ची सुधारणा.

५. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४६१ मधील, खंड (मअ) मध्ये, "कृषी उत्पन्नाची'' या मजकुरानंतर, ", जनावरांची, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)'' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४० ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या कलम ३९८ च्या पोट-कलम (२) मध्ये, अशी तरतूद आहे की, उक्त अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची जज मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कृषि उत्पन्नाची खरेदी व विक्री करण्यासाठी किंवा त्याचा व्यापार करण्यासाठी, नगरपालिकेला बाजार देखील स्थापन करता येतील. तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ४०१ च्या पोट-कलम (१) मध्ये, कोणतीही व्यक्ती, आयुक्ताने दिलेल्या लायसनवाचून कोणतेही जनावर किंवा वस्तू कोणत्याही महानगरपालिका बाजारात विकणार नाही किंवा विक्रीसाठी ठेवणार नाही, अशी तरतूद आहे. जनावरे, शोभिवंत किंवा विदेशी पक्षी आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून) खरेदी व विक्री करण्यासाठी किंवा त्यांचा व्यापार करण्यासाठी महानगरपालिकेचे बाजार स्थापन करण्याच्या, उक्त अधिनियमामध्ये कोणत्याही तरतुदी अंतभर्ूत नाहीत. अधिनियमाच्या कलम ३९८ मध्ये, राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने, अनुसूची जज मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या केवळ कृषी उत्पन्नाच्या बाबींमध्ये कोणतीही बाब जादा दाखल करण्यासाठी, त्यांत सुधारणा करण्यासाठी किंवा ती रद्द करण्यासाठी अधिसूचना काढण्याचे अधिकार महानगरपालिकेस प्रदान केले आहेत. म्हणून, उक्त अधिनियमाची कलमे ३९८, ४०१, ४०६ व ४६१ यांमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; जेणेकरून, महानगरपालिका बाजारांत जनावरे, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत व विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ या अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून) खरेदी व विक्री करण्यासाठी किंवा त्यांचा व्यापार करण्यासाठी तरतूद करणे शक्य होईल.

२. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई, दिनांक २१ मार्च २०१८.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

विधान भवन :

डॉ. अनंत कळसे,

मुंबई,

प्रधान सचिव,

दिनांक २३ मार्च २०१८.

महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.