Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KDS) Ext. 25 (April 2nd 2018)

Published 02 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २, २०१८/चैत्र १२, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक १६(३)] सोमवार, एप्रिल २, २०१८/चैत्र १२, शके १९४० [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

संदर्भ.--- सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ. १११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

आदेश

क्रमांक गृह ३६०१/१३/विकाअ/पं.स./नाम/२०१७.---- संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, उदय चौधरी, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, या निर्णयाद्वारे सिंधुदुर्र्ग जिल्ह्यतील, वैभववाडी या पंचायत समितीमधून नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत त्यापूर्वीच संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकारी यांची राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.

(एक) साक्षांकनाचे काम.------ विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहिणे.

३. विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.

४. या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

५. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. (१) भाग एक (को.वि.पु.)--२५---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २, २०१८/चैत्र १२, शके १९४० ६. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये. अनुसूची

अ.क्र. सदस्याचे नाव (१) (२)

पत्ता (३)

पंचायत समितीचे नाव (४)

१ खानविलकर दुर्वा उदय रा. नेर्ले, ता. वैभववाडी वैभववाडी पंचायत समिती २ रावराणे अरविंद भास्कर रा. सोनाळी, ता. वैभववाडी वैभववाडी पंचायत समिती

उदय चौधरी, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्गनगरी, दिनांक ८ मार्च २०१८.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.