Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ex. 36 (April 6-2018).pmd

Published 06 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक १९] शुक्रवार, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७.--- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात पृष्ठे १-५ सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१७ हा दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रख्यापित केला होता ;

२०१७ चा महा. अध्या. २८. आणि ज्याअर्थी, दिनांक ११ डिसेंबर २०१७ रोजी राज्य विधानमंडळाचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यावर, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१७ (सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६८) हे, महाराष्ट्र विधानसभेने दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी संमत केले होते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेकडे ते पारेषित करण्यात आले होते ;

(१) भाग चार ३६---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४०

आणि ज्याअर्थी, त्यानंतर दिनांक २२ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेची सत्र समाप्ती झाल्यामुळे महाराष्ट्र विधानपरिषदेत उक्त विधेयक संमत होऊ शकले नाही ;

आणि ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३(२)(क) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे, उक्त अध्यादेश, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्याच्या दिनांकापासून सहा आठवडयानंतर म्हणजेच २१ जानेवारी २०१८ या दिनांकानंतर, अंमलात असण्याचे बंद झाले असते ;

आणि ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, उक्त अध्यादेशाच्या तरतुदी अंमलात असण्याचे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा व पुढे चालू २०१८ चा महा. अध्या. १.

ठेवणे) अध्यादेश, २०१८ (यात यापुढे ज्याचा निर्देश "पुढे चालू ठेवणे अध्यादेश" असा करण्यात आला आहे) हा प्रख्यापित केला होता ;

आणि ज्याअर्थी, उक्त पुढे चालू ठेवणे अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०१७ असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) तो, दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " २०१७ चा महा. ६.

असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३० मध्येे, पोट-कलम (४) नंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ३० ची सुधारणा. " परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतनंतर व्यवस्थापन परिषदेच्या प्रारंभीच्या मुदतीसाठी, खंड (च), (छ), (ज) व (झ) खालील प्रवगार्ंमधील उमेदवाराच्या निवडणुकीकरिता उक्त खंडांन्वये राखीव प्रवगार्र्ंचे आळीपाळीने देण्यात येणारे आरक्षण हे, कुलगुरूकडून चिठ्ठया टाकून काढलेल्या सोडतीद्वारे ठरविण्यात येईल, आणि अशा चिठ्ठयांची सोडत काढताना, प्रत्येक राखीव प्रवर्गातील व्यक्तीला व्यवस्थापन परिषदेवर प्रतिनिधित्व मिळेल, याची सुनिश्चिती करण्यात येईल. ".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ६२ मध्ये, पोट-कलम (२) नंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :----

" परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतनंतर विद्यापीठ प्राधिकरणांच्या प्रारंभिक मुदतीसाठी निवडणूक, सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ६२ ची सुधारणा. नामनिर्देशन व स्वीकृतीची प्रक्रिया ३१ मे २०१८ च्या नंतर नाही अशा मुदतीत पूर्ण करण्यात येईल. ".

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ९९ नंतर, पुढील कलम जादा दाखल करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यामध्ये नवीन कलम ९९क समाविष्ट करणे.

" ९९क. कलम ९९ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी, विद्यार्थी परिषद घटित करण्याच्या संबंधात, पुढील तरतूद लागू होईल :----

विद्यार्थी परिषद घटित करण्यासाठी तात्पुरती तरतूद.

(१) विद्याथ्यार्ंच्या कल्याणाकरिता आणि अधिक चांगल्या प्रकारच्या सामुदायिक जीवनासाठी वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांच्या पाठयेतर कार्यक्रमांचे प्रचालन करण्याकरिता व त्याबाबतीत समन्वय साधण्याकरिता,महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४० ३ पोट-कलम (४) मध्ये विर्िनदिष्ट करण्यात आल्याप्रमाणे, एक विद्यापीठ विद्यार्थी परिषद असेल, विद्यापीठाच्या विभागांसाठी एक विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद असेल आणि विद्यापीठाच्या प्रत्येक संचालित महाविद्यालयासाठी किंवा परिसंस्थेसाठी किंवा प्रत्येक संलग्न महाविद्यालयासाठी, एक विद्यार्थी परिषद असेल. या परिषदा राजकीय चळवळींमध्ये भाग घेणार नाहीत.

(२) (क) विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेत पुढील सदस्यांचा समावेश असेल :----

(एक) कुलगुरू---अध्यक्ष ;

(दोन) विद्यार्थी विकास संचालक---सभापती ;

(तीन) संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण ;

(चार) संचालक, राष्ट्रीय सेवा योजना ;

(पाच) मागील पदवी परीक्षेत ज्याने विद्याविषयक गुणवत्ता दर्शविली आहे आणि जो एखाद्या विद्यापीठात, परिसंस्थेत किंवा विभागात किंवा संचालित महाविद्यालयात पूर्ण वेळ अभ्यासक्रम पार पाडीत आहे असा, कुलगुरूने नामनिर्देशित केलेला प्रत्येक विद्यापीठ विभागातील एक विद्यार्थी ;

(सहा) प्र-कुलगुरूने नामनिर्देशित केलेल्या दोन विद्यर्ाथिनी आणि जर प्र-कुलगुरू नसेल तर, कुलगुरू दोन विद्यर्ाथिनींना नामनिर्देशित करील.

(ख) प्रत्येक परिसंस्थेच्या, संचालित महाविद्यालयाच्या किंवा संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेत पुढील सदस्यांचा समावेश असेल :----

(एक) प्राचार्य---सभापती ;

(दोन) प्राचार्याने नामनिर्देशित केलेला एक अधिव्याख्याता ;

(तीन) राष्ट्रीय छात्र सेनेचा प्रभारी अध्यापक ;

(चार) राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी ;

(पाच) मागील वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्याने विद्याविषयक गुणवत्ता दर्शविली आहे आणि महाविद्यालयात जो पूर्ण वेळ अभ्यासक्रम पार पाडीत आहे असा, प्राचार्याने नामनिर्देशित केलेला प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी ;

(सहा) संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, कोणताही असल्यास ; (सात) ज्याने लक्षणीय यश मिळविले आहे असा, प्राचार्याने नामनिर्देशित केलेला पुढील क्षेत्रातील प्रत्येकी एक विद्यार्थी :----

(१) क्रीडा ; (२) राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रौढ शिक्षण ; (३) राष्ट्रीय छात्र सेना ;

(४) सांस्कृतिक कार्ये ;

(आठ) प्राचार्याने नामनिर्देशित केलेल्या दोन विद्यर्ाथिनी :

परंतु, प्रवर्ग (सात) व (आठ) मधील दोन विद्यार्थी, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यांमधील असतील.

(३) या दोन्ही परिषदांचे विद्यार्थी सदस्य आपल्यामधूनच संबंधित परिषदेचा सचिव निवडतील.

(४) (क) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी अंमलात असलेल्या परिनियमांद्वारे विहित करण्यात आल्याप्रमाणे पोट-कलम (३) खालील संबंधित परिषदांच्या सचिवांमधून निवड करून त्याद्वारे नामनिर्देशित करण्यात आलेल्या पंधराहून अधिक नसतील अशा व्यक्तींचा समावेश असलेली एक विद्यापीठ विद्यार्थी परिषद असेल :

भाग चार ३६---२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४०

परंतु, यापैकी प्रत्येकी किमान एक जागा पुढील वर्गातील विद्याथ्यार्ंसाठी राखून ठेवण्यात येईल :----

(एक) अनुसूचित जाती ; (दोन) अनुसूचित जमाती ; (तीन) विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती ; (चार) इतर मागासवर्ग ; आणि (पाच) एक जागा विद्यार्थीनींसाठी,

उरलेल्या जागांचे जिल्हानिहाय वाटप करण्यात येईल :

परंतु आणखी असे की, निवड करून त्याद्वारे नामनिर्देशित करण्याकरिता, शैक्षणिक कामगिरी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना व प्रौढ शिक्षण, सांस्कृतिक कार्य किंवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी अंमलात असलेल्या परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील अशी इतर कार्ये यांमधील सहभाग यासंबंधातील तपशील विचारात घेण्यात येईल.

(ख) अशाप्रकारे रचना करण्यात आलेली विद्यापीठ विद्यार्थी परिषद, स्वत:च आपला सभापती व सचिव निवडील.

(ग) विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या प्रत्येक बैठकीमध्ये कुलगुरू हा, अध्यक्षस्थानी असेल व विहित करण्यात येतील असे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.

(५) कोणताही विद्यार्थी त्याची पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून नावनोंदणी झाली असेल तरच कोणत्याही विद्यार्थी परिषदेचा सदस्य असण्यास किंवा सदस्य म्हणून चालू राहण्यास पात्र असेल.

(६) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सदस्यांचे नामनिर्देशन, व्यवस्थापन परिषदेने निश्चित केल्या जाणाया दिनांकास, करण्यात येईल. नामनिर्देशित विद्यार्थी सदस्यांचा पदावधी हा नामनिर्देशनाच्या दिनांकापासून सुरू होईल आणि तो पदावधी, दरम्यानच्या कालावधीत अधिनियमाद्वारे किंवा तद्न्वये विर्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही निरर्हता त्यांनी आपल्यावर ओढवून घेतलेल्या नसतील तर, शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिनांकापयर्ंत अंमलात असेल, आणि त्यानंतर तो समाप्त होईल.

(७) परिषदेच्या एक-तृतीयांश सदस्य मिळून बैठकीची गणपूर्ती होईल. बैठकीचे कामकाज चालविण्यासंबंधीचे नियम व कार्यपद्धती आणि अशा इतर बाबी विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील. परिषदेची दर तीन महिन्यांमध्ये किमान एक बैठक होईल. ".

५. मुख्य अधिनियमाच्या कलम १०९ च्या, पोट-कलम (३) मध्ये, खंड (घ) मधील, विद्यमान परंतुकानंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :---

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १०९ ची सुधारणा.

" परंतु आणखी असे की, विद्यापीठास नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी मागणाया अजार्ंवर निर्णय घेणे सोयीचे व्हावे यासाठी, या अधिनियमाच्या, प्रारंभाच्या लगतनंतरच्या पहिल्या शैक्षणिक वर्षासाठी यासोबतच्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (३) च्या खंड (क), (ग) आणि (घ) यांमध्ये निर्देशिलेले दिनांक हे उक्त तक्त्यामध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे वाचण्यात येतील :----

तक्ता

खंड विद्यमान तरतुदीमधील दिनांक २०१७-१८ या शैक्षणिक

(१) (२)

वर्षाकरिता दिनांक (३)

(क) वर्षाच्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस १५ डिसेंबर २०१७

(ग) वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी १५ जानेवारी २०१८ पूर्वी

(घ) लगेच पुढच्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी २८ फेब्रुवारी २०१८ पूर्वी ".

किंवा त्यापूर्वी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४० ५

६. मुख्य अधिनियमाच्या कलम १४६ मध्ये, पोट-कलम (१) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल

करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १४६ ची सुधारणा.

" (१) विद्यमान विद्यापीठाचे प्रत्येक प्राधिकरण हे, व्यवहार्य असेल तेथवर, परंतु ३१ मे २०१८ नंतर नाही, अशा मुदतीच्या आत या अधिनियमाच्या तरतुदींनुसार पुनर्घटित करण्यात येईल. असे प्रत्येक प्राधिकरण हे, कुलगुरू अधिसूचनेद्वारे, वेळोवेळी विर्िनदिष्ट करील अशा दिनांकापासून पुनर्घटित करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल. ".

७. (१) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, २०१८ हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०१८ चा महा. अध्या. १.

सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ याचे निरसन व व्यावृत्ती.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरीही, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.