Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 Ex. Ord. (6-4-2018)

Published 06 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक १३] शुक्रवार, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश. ---------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २४.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३. अन्वये कलम ११ (१).

क्रमांक अ.का.-उजि(भू)-पी.पी. १-नाग-कावि-१०९-२०१८.----

ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) ंयाच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (झेड-अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिका यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. ज्याचे स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये असे अधिसूचीत करण्यात येते की, उक्त जमीनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची गरज आहे;

आणि ज्याअर्थी, सदरहु प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेले आहे;

ना-एक--१ (१५१९).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४० आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूची मध्ये तपशील नमूद करावा);

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतेही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुर:सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), पेंच प्रकल्प क्रमांक १, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक जमिनीचे वर्णन भू. सं. प्र. क्र. ५-अ-६५-२०१७-२०१८ गाव गांगनेर, तालुका मौदा, जिल्हा नागपूर, प. ह. नं. ५२.

अ. क्र. भूमापन किंवा गट क्रमांक क्षेत्र

(१) (२) (३)

हे. आर १ ११० ० १८ २ १११ ० ११ ३ ११५ ० ०५

-------------------------

एकूण . . ० ३४

------------------------

अनुसूची --दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव : कालव्याचे बांधकाम

प्रकल्प कार्याचे वर्णन : कन्हान पुच्छी सा. क्र. २२५० मी. वरुन निघणा या गांगनेर लघु कालव्याचे पुच्छीकरणाचे बांधकाम.

समाजाला मिळणारे लाभ : प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पुच्छ भागातील शेतक यांना सिंचनाचा लाभ मिळण्याकरिता. (र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)

अनुसूची --तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन विस्थापित होत नाही. करण्यास भाग पाडणारी कारणे :---

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ६, २०१८/चैत्र १६, शके १९४० ३

अनुसूची --चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा : भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क सारांश. अधिनियम, २०१३ चे कलम १० (क) व त्या अनुषंगाने महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांची (सामाजिक प्रभाव निर्धारण अधिसूचना, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सामाजिक प्रभाव निर्धारणातून सूट. अभ्यास करणा या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची --पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका याचे पदनाम :--- निरंक

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :-- निरंक.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापुर्वी भरावे) :--- निरंक

टीप :-- उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादीत जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), पेंच प्रकल्प क्रमांक १, नागपूर या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

नागपूर : दिनांक १६ मार्च २०१८.

(अवाच्य), उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), पेंच प्रकल्प क्रमांक १, नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.