महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ४, अंक १४] शनिवार, एप्रिल ७, २०१८/चैत्र १७, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग
अधिसूचना
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (मे. न्युफाऊन्ड प्रॉपर्टीज् अॅण्ड लिजिंग प्रा. लि. च्या एमआयडीसी ट्रान्स-ठाणे क्रीक
इण्डस्ट्रीयल एरिया, जिल्हा ठाणे येथील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा विषयक विशेष र्आथिक क्षेत्रासाठी लागू
असलेल्या वीज वितरण परवान्याच्या विशिष्ट अटी) विनियम, २०१८.
विद्युत अधिनियम, २००३.
क्रमांक मविनिआ/तांत्रिक/परवाना अटी/एनपीएल/२०१८/०४४३.— विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १८१ च्या उप-कलम (२) च्या खंड (डी) सह कलम १६ आणि कलम १४ च्या खंड (बी) मधील अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग याद्वारे खालील विनियम करीत आहे :---
१. संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ.----(१) या विनियमांना " महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (मे. न्युफाऊन्ड प्रॉपर्टीज् अॅण्ड लिजिंग प्रा. लि. च्या एमआयडीसी ट्रान्स-ठाणे क्रीक इण्डस्ट्रीयल एरिया, जिल्हा ठाणे येथील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा विषयक विशेष र्आथिक क्षेत्रासाठी लागू असलेल्या वीज वितरण परवान्याच्या विशिष्ट अटी) विनियम, २०१८" असे म्हणावे ;
(२) हे विनियम भारत सरकार, वाणिज्यिक आणि उद्योग मंत्रालय, वाणिज्यिक विभाग (विशेष र्आथिक क्षेत्र कक्ष) यांच्या दिनांक २२ ऑगस्ट २००८ च्या अधिसूचना क्रमांक एस. ओ. २०९४ (ई) सह दिनांक ६ मार्च २०१७ च्या अधिसूचना क्रमांक एस.ओ. ८०८ (ई) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रासाठी लागू राहतील ;
(३) हे विनियम शासकीय राजपत्रात ज्या दिनांकास प्रसिद्ध होतील त्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. व्याख्या.---- २.१ या विनियमांत, संदर्भानुुसार वेगळा अर्थ अपेक्षित नसेल तर :---
(ए) " अधिनियम " म्हणजे विद्युत अधिनियम, २००३ (२००३ चा ३६) ;
(बी) " विकासक " चा अर्थ, एसईझेड अधिनियम, २००५ च्या कलम २ च्या उप-कलम (जी) अंतर्गत करण्यात आलेल्या व्याख्येप्रमाणे राहील ;
(सी) " मानीव वितरण परवानाधारक " म्हणजे मे. न्युफाऊन्ड प्रॉपर्टीज् अॅण्ड लिजिंग प्रा. लि. (एनपीएल), ज्यांना भारत सरकारने विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ च्या कलम ४९ अंतर्गत निर्गमित केलेल्या दिनांक २२ ऑगस्ट २००८ च्या अधिसूचना
(१)
भाग चार--क--२५------१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, एप्रिल ७, २०१८/चैत्र १७, शके १९४० क्रमांक एस.ओ. २०९४ (ई) सह दिनांक ६ मार्च २०१७ च्या एसईझेड अधिसूचना क्रमांक एस.ओ. ८०८ (ई) द्वारा विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १४ च्या खंड (बी) अंतर्गत, एसईझेड अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या वीज पुरवठा क्षेत्रातील ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणेचे संचालन व देखभाल करण्याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे ;
(डी) " सर्वसाधारण अटी " म्हणजे, वेळोवेळी अंमलात असलेल्या, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (वितरण परवान्याच्या सर्वसाधारण अटी) विनियम, २००६ मध्ये विर्िनदिष्ट करण्यात आलेल्या सर्वसाधारण अटी ;
(इ) " एसईझेड अधिनियम " म्हणजे विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ (२००५ चा २८) ;
(एफ) " एसइझेड नियम " म्हणजे वेळोवेळी अंमलात असलेले विशेष र्आथिक क्षेत्र नियम, २००६.
२.२ (अ) या विनियमांत वापरलेल्या आणि ज्यांची व्याख्या करण्यात आलेली नाही अशा शब्द आणि उक्तींना, विद्युत अधिनियम, २००३ आणि विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ किंवा त्याखाली करण्यात आलेले नियम आणि विनियमांनुसार, अर्थ राहील.
(ब) या विनियमांच्या मराठी अनुवादातील व इंग्रजी विनियमांमधील कोणत्याही शब्दांचा/मजकुराचा अर्थ निश्चित करताना कोणताही वाद उद्भवल्यास आणि/किंवा कोणतीही विसंगती आढळल्यास मूळ इंग्रजीतील विनियम ग्रा धरण्यात येतील.
३. व्याप्ती.----' एनपीएल ' च्या संदर्भातील या विशिष्ट अटी आणि वितरण परवान्याच्या सर्वसाधारण अटी या ' एनपीएल ' च्या वीज वितरण परवान्याच्या अटी म्हणून मानण्यात येतील आणि त्या येथे विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रामध्ये त्यांच्या विजेचे वितरण आणि किरकोळ पुरवठयाच्या कार्याचे नियमन करतील.
४. " वितरणाचे क्षेत्र " किंवा " पुरवठयाचे क्षेत्र ".---- ४.१ मानीव वितरण परवानाधारकाने विजेचा पुरवठा करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले वीज पुरवठयाचे क्षेत्र हे भारत सरकारच्या वाणिज्यिक आणि उद्योग मंत्रालय (वाणिज्यिक विभाग) यांनी, विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ च्या कलम ४ अंतर्गत निर्गमित केलेल्या दिनांक २२ ऑगस्ट २००८ च्या विशेष र्आथिक क्षेत्र (एसईझेड) अधिसूचना क्रमांक एस.ओ. २०९४ (ई) सह दिनांक ६ मार्च २०१७ च्या एसईझेड अधिसूचना क्रमांक एस.ओ. ८०८ (ई) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सदर अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या अशा अटी आणि वगळण्यात आलेल्या बाबी यांच्या अधीन राहून, एमआयडीसी ट्रान्स-ठाणे क्रीक इण्डस्ट्रीयल एरिया, जिल्हा ठाणे येथील १९.५० हेक्ट्र्सचे संपूर्ण क्षेत्र राहील. हे क्षेत्र सोबतच्या अनुसूची १ मधील नकाशामध्ये आरेखित करण्यात आले आहे.
४.२ भारत सरकारच्या वाणिज्यिक आणि उद्योग मंत्रालयाकडून मानीव वितरण परवानाधारकासाठी भविष्यात कोणतीही एसईझेड अधिसूचना किंवा निरधिसूचना काढण्यात आल्याने, एसईझेड, क्षेत्रामध्ये बदल झाला तर, मानीव वितरण परवानाधारक कोणतीही १५ दिवसांच्या आत या विशिष्ट अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोगाशी संपर्क साधेल.
४.३ निरधिसूचना काढण्यात आल्यास, मानीव वितरण परवानाधारक निरधिसूचित क्षेत्रातील ग्राहकांना वीज पुरवठयाची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईपयर्ंत एसईझेड क्षेत्रातील ग्राहकांना विजेचा पुरवठा चालू ठेवील.
५. परवान्याची मुदत.----सदर परवाना, अधिनिमातील तरतुदींच्या अधीन राहून, दिनांक २२ ऑगस्ट २००८ पासून (म्हणजेच एसईझेड अधिसूचनेचा दिनांकापासून) दिनांक २१ ऑगस्ट २०३३ पयर्ंतच्या पंचवीस (२५) वषार्ंच्या कालावधीकरिता किंवा असा परवाना रद्द करण्यात येत नाही तोपयर्ंत, यापैकी जे आधी घडेल, त्या कालावधीकरिता अंमलात राहील.
६. विशिष्ट अटी आणि परवान्याची पाहणी.----हे विनियम प्रसिद्ध झाल्यानंतर मानीव वितरण परवानाधारक या विशिष्ट अटी व त्याचा परवाना, मंजुया किंवा मान्यता जनतेला पाहण्यासाठी पुरविण्याची व्यवस्था करील.
७. अखंडित विजेचा पुरवठा.----मानीव वितरण परवानाधारक त्याच्या पुरवठयाच्या क्षेत्रात चोवीस (२४) तास अखंडित विजेचा पुरवठा करण्यासाठी व्यवस्था करील.
८. दुरुस्ती करण्याचे अधिकार.----आयोग, कोणत्याही वेळी, या विनियमांतील कोणत्याही तरतुदीमध्ये बदल, फेरफार, अल्प-बदल आणि सुधारणा करू शकेल.
९. अडचणी दूर करण्याचे अधिकार.----या विनियमांतील तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण आली तर आयोगाला सर्वसाधारण किंवा विशिष्ट आदेशाने, विद्युत अधिनियमातील तरतुदींशी विसंगत नसतील अशा परंतु अडचण दूर करण्यासाठी आवश्यक अशा तरतुदी करता येतील.
अश्वनी कुमार सिन्हा,
मुंबई, दिनांक ६ एप्रिल २०१८.
सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, एप्रिल ७, २०१८/चैत्र १७, शके १९४० ३अनुसूची--१
भाग चार--क--२५------२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, एप्रिल ७, २०१८/चैत्र १७, शके १९४०
MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION
Maharashtra Electricity Regulatory Commission (Specific Conditions of Distribution Licence
applicable to M/s. Newfound Properties and Leasing Pvt. Ltd. for IT and ITES SEZ at MIDC Trans-
Thane Creek Industrial Area, District Thane), Regulations, 2018.
ELECTRICITY ACT, 2003.
No. MERC/TEC/Licence Conditions/NPL/2018/0443.—In exercise of the powers under clause (d) of sub-section (2) of section 181 read with section 16 and clause (b) of section 14 of the Electricity Act, 2003, the Maharashtra Electricity Regulatory Commission hereby makes the following Regulations, namely :––
1. Short Title, Extent and Commencement.—(1) These Regulations may be called the Maharashtra Electricity Regulatory Commission (Specific Conditions of Distribution Licence applicable to M/s. Newfound Properties and Leasing Pvt. Ltd. for IT and ITES SEZ at MIDC Trans-Thane Creek Industrial Area, District Thane), Regulations, 2018.
(2) These Regulations shall extend to the area specified in the notification No. S.O. 2094 (E), dated the 22nd August 2008 read with Notification No. S.O. 808 (E), dated the 6th March 2017 issued by Government of India, Ministry of Commerce and Industry, Department of Commerce (SEZ Section).
(3) These Regulations shall come into force from the date of their publication in the Official Gazette.
2. Definitions.––2.1— In these Regulations, unless the context otherwise requires ,
–– (a) "Act" means the Electricity Act, 2003 (36 of 2003) ;
(b) "Developer" shall have the same meaning as defined under sub-section (g) of section 2 of the (SEZ) Special Economic Zones Act, 2005 ;
(c) "Deemed Distribution Licensee" means M/s. Newfound Properties and Leasing Pvt. Ltd. (NPL) which is authorized under clause (b) of section 14 of the Act by virtue of Notification No. SO. 2094(E), dated the 22nd August 2008 read with Notification No. S.O. 808(E), dated the 6th March 2017 issued by the Government of India under section 49 of the SEZ Act, 2005 to operate and maintain a power distribution system for supplying electricity to consumers in the area of supply as specified in the SEZ notifications ;
(d) "General Conditions" means the General Conditions as specified in the Maharashtra Electricity Regulatory Commission (General Conditions of Distribution Licence), Regulations, 2006, as in force from time to time ;
(e) "SEZ Act" means the Special Economic Zones Act, 2005 (28 of 2005) ;
(f) "SEZ Rules" means the Special Economic Zones Rules, 2006 as in force from time to time.
2.2 Words and expressions used in these Regulations and not defined shall have the meanings assigned to them in the Electricity Act, 2003 and SEZ Act, 2005 or rules and regulations made thereunder.
3. Applicability.—These Specific Conditions with respect to NPL and the General Conditions of Distribution Licence shall be deemed to be the conditions of licence of NPL and shall govern its operations of distribution and retail supply of electricity in the area specified herein.
4. "Area of Distribution" or "Area of Supply". ––4.1— The Area of Supply within which the Deemed Distribution Licensee is authorized to supply electricity shall be the whole of the area of 19.50 Hectares at Trans-Thane Creek Industrial Area, MIDC, District Thane, as stated in the Special Economic Zone (SEZ), Notification No. SO. 2094(E), dated the 22nd August 2008 read with S.O. 808(E), dated the 6th March 2017 issued by Ministry of Commerce and Industry (Department of Commerce), Government of India under section 4 of the SEZ Act, 2005, subject to such conditions and exclusions as specified in the said notification and as delineated in the Map. annexed as Schedule 1.
4.2 In the event of any future SEZ notifications or de-notifications by the Ministry of Commerce and Industry, Government of India, resulting in change in the SEZ area, the Deemed Distribution Licensee shall, within 15 days approach the Commission for amendment of these Specific Conditions.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, एप्रिल ७, २०१८/चैत्र १७, शके १९४० ५4.3 In the event of de-notification, the Deemed Distribution Licensee shall continue to supply the consumers within the SEZ area till alternative arrangement of supply is made available to consumers in the de-notified area.
5. Term of Licence. ––Subject to the provisions of the Act, the Licence shall remain in force for a period of twenty-five years from 22nd August 2008 (i.e. the date of notification of the SEZ), till 21st August 2033 or until and unless such Licence is revoked, whichever is earlier.
6. Inspection of Specific Conditions and Licence. ––The Deemed Distribution Licensee shall provide for public inspection of these Specific Conditions and its Licence, clearance or approval, upon Publication of these Regulations.
7. Un-interrupted power supply. ––The Deemed Distribution Licensee shall make provisions for un interrupted power supply for twenty-four hours a day within the area of supply.
8. Power to amend .––The Commission may, at any time, vary, alter, modify or amend any provisions of these Regulations.
9. Power to remove difficulties .––If any difficulty arises in giving effect to the provisions of these Regulations, the Commission may, by general or specific order, make such provisions not inconsistent with the provisions of the Act as may appear to be necessary for removing the difficulty.
ASHWANI KUMAR SINHA,
Secretary,
Mumbai, dated the 6th April 2018. Maharashtra Electricity Regulatory Commission.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, एप्रिल ७, २०१८/चैत्र १७, शके १९४०Schedule 1
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.