RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक ४५] मंगळवार, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० एप्रिल २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९.
क्रमांक बीपीए ०७१६/प्र.क्र. १५०/राउशु-२.-----ज्याअर्थी, "" मुंबई दारूबंदी (मोहफुले) (वजनाची मर्यादा विहित करणे) नियम, १९६३"" मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम तात्काळ अंमलात आणण्यात यावेत आणि म्हणून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (१९४९ चा मुंबई २५) (त्यात ज्याचा उल्लेख "" उक्त अधिनियम "" असा करण्यात आला आहे) त्याचा कलम १४३ च्या पोट-कलम (३) च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीशिवाय हे नियम करण्यात यावेत, असे महाराष्ट्र शासनास वाटते ;
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम १४३ च्या पोट-कलम (२) च्या खंड (ल) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे मुंबई दारूबंदी (मोहफुले) (वजनाची मर्यादा विहित करणे) नियम, १९६३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :----
१. या नियमांना, मुंबई दारूबंदी (मोहफुले) (वजनाची मर्यादा विहित करणे) सुधारणा २०१८, असे म्हणावे.
२. "" मुंबई दारूबंदी (मोहफुले) (वजनाची मर्यादा विहित करणे) नियम, १९६३ "" याच्या नियम २ मधील विद्यमान दोन्ही परंतुकांऐवजी खालील परंतुक समाविष्ट करण्यात येत आहे :----
(१)
भाग चार--ब--१०३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४० "" परंतु, या सोबत जोडलेल्या अनुसूचीतील स्तंभ (२) मधील आदिवासी क्षेत्रात राहणारे आदिवासी जे मोहफुलापासून उध्र्वपातन करून किंवा उकळून स्वत: पारंपरिक पेय तयार करतात, त्यांना अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या वापरासाठी, आहुतीसाठी किंवा खाजगी आणि सामाजिक प्रयोजनासाठी, मात्र, व्यावसायिक कारणासाठी नव्हे, मद्याचे वितरण आपसातील व्यवस्थेनुसार होत असल्यास, त्यासाठी कितीही परिमाणातील मोहफुले गोळा करणे, त्याची वाहतूक करणे, विक्री करणे किंवा जवळ बाळगणे यासाठी कोणतीही अनुज्ञप्ती, परवाना अथवा पास आवश्यक असणार नाही.""
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पु. हि वागदे, शासनाचे सहसचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४०HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 10th April 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA PROHIBITION ACT, 1949.
No. BPA 0716/150/EXC-2.— Whereas the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Bombay Prohibition (Mhowra Flowers) ( Prescribed Limit in Weight ) Rules, 1963 should be brought into force at once, and therefore the rule should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949) ( herein referred to as " the said Act ");
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (l) of sub-section (2) of section 143 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Prohibition (Mhowra Flowers) (Prescribed Limit in Weight) Rules,1963, as follows, namely :—
1. These rules may be called as The Bombay Prohibition ( Mhowra Flowers) ( Prescribed Limit in Weight ) Rules , 2018.
2. In rule 2 of the Bombay Prohibition (Mhowra Flowers) ( Prescribed Limit in Weight ) Rules , 1963, for the existing two provisos, the following proviso shall be substituted :-
" Provided that, in respect of tribal residing in tribal areas of the State specified in column (2) of the Schedule hereto annexed and who distil or brew their own local traditional drinks from Mhowra flowers, specified in column (3) thereof, for the purpose of consumption, use of offering, or distribution of liquor for mutual accommodation for personal and social purposes but not for commercial purpose, no license, permit or pass shall be necessary for the collection purpose, transport, sale or possession of any quantity of Mhowra flowers."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. H. WAGDE,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.