Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Notification from Municipal Commissioner, Jalgaon and Ahmednagar (Bye Election Result)

Published 10 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - १८ ]

मंगळवार , एप्रिल १० , २०१८ / चैत्र २० , शके १ ९ ४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक १८

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

जळगाव शहर महानगरपालिका , जळगाव

पोट-निवडणूक २०१८

क्रमांक जमपा ./पोट- निवड./३ ९/२०१८. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १ ९४ ९ , अनुसूची ' ड' , प्रकरण १ , निवडणूक नियम क्रमांक- ३९ (२) व राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. २/का-५ , दिनांक ७ मार्च २०१८ नुसार मी, किशोर राजे निंबाळकर , आयुक्त , जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ - ब च्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी होणाऱ्या पोट- निवडणुकीकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी एकच उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र.क्र. २/का-५ , दिनांक २ एप्रिल २०१८ अन्वये कळविल्याप्रमाणे खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातून महानगरपालिका सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत .

परिशिष्ट

प्रभाग

जागा

सदस्याचा पत्ता

पक्ष

शेरा क्रमांक क्रमांक

निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्याचे नाव

(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १

६

४

२

३

५

ब

भारतीय जनता सर्वसाधारण २६

श्रीमती गेही मायादेवी विजयकुमार

पार्टी.

प्लॉ. नं. ३ , निचल अपार्टमेंट , सिंधी कॉलनी , जळगाव.

किशोर राजे निंबाळकर ,

आयुक्त,

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.

जळगाव , ६ एप्रिल २०१८.

वि ( एच) २१

(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, एप्रिल १० , २०१८ / चैत्र २० , शके १ ९४० आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

पोट-निवडणूक २०१८

क्रमांक साप्रवि/पोट- निवडणूक/११६/२०१८ . अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ - ब ची पोट-निवडणूक घेण्याबाबत मा . अवर सचिव , राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा २०१८/प्र. क्र. २/का-०५ , दिनांक ७ मार्च २०१८ अन्वये पोट- निवडणूक २०१८ च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता . त्यानुसार प्रभाग क्रमांक ३२ - ब च्या जागेसाठी दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी पोट-निवडणूक घेण्यात आली.

अहमदनगर महानगरपालिका, पोट- निवडणूक २०१८ साठी प्रभाग क्रमांक ३२ - ब चा मतमोजणीचा निकाल दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ' ड' , प्रकरण १ , निवडणूक नियम ३ ९ (२) व मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ मनपा-२०१८/प्र. क्र. २/का-०५ , दिनांक ७ मार्च २०१८ च्या पोट-निवडणूक कार्यक्रमानुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्याचे नाव , राहण्याचे ठिकाण ( पत्ता) व पक्ष याबाबतची माहिती मी, घनश्याम मंगळे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पोट-निवडणूक २०१८ , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर याद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

नवनिर्वाचित सदस्याचे नाव

पत्ता

पक्ष

प्रभाग

क्रमांक

१

४

२

३

विशाल बाळासाहेब कोतकर

३२-ब

इंडियन नॅशनल काँग्रेस

एकनाथनगर , केडगाव देवी, अहमदनगर .

घनश्याम मंगळे ,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी ,

पोट-निवडणूक २०१८ , अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर .

अहमदनगर , ७ एप्रिल २०१८ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.