Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 42 (April 11th 2018)

Published 11 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक २२] बुधवार, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ४२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे सचिव कार्यालय

राजभवन, मलबार हिल, मुंबई ४०० ०३५, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६.

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक आरबी/टीसी/ई-१३०१६ (६) (२०१४)/अधिसूचना-पोलीस पाटील पदे/१५१४.---- ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या पाचव्या अनुसूचीच्या परिच्छेद ५ च्या उपपरिच्छेद (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, काढलेली अधिसूचना क्रमांक आरबीटीसी/ई-१३०१३ (४)/अधिसूचना-१/४७४/२०१४, दिनांक ९ जून २०१४ (यात यापुढे जिचा निर्देश ""उक्त अधिसूचना"" असा करण्यात आला आहे) द्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी असा निदेश दिला आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांच्याकरिता आरक्षण) अधिनियम, २००१ (२००४ चा महा. ८) याचे कलम ४ आणि या संबंधात केलेले अन्य नियम किंवा आदेश हे, त्यासंबंधात त्या-त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यात किंवा नियमात किंवा आदेशात काहीही अंतभर्ूत असले तरी, उक्त अधिसूचनेच्या परिशिष्टात विर्िनदिष्ट केलेल्या पदांना, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रे असलेल्या जिल्ह्यंच्या अनुसूचित क्षेत्रांकरिता सरळसेवेने भरावयाची आहेत अशी उक्त पदे आवश्यक अर्हता असणाया केवळ स्थानिक अनुसूचित जमातींच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील असा फेरबदल करण्याच्या अधीन राहून, लागू होतील ;

आणि ज्याअर्थी, राज्यातील ज्या जिल्ह्यंना अनुसूचित क्षेत्रे आहेत त्या जिल्ह्यंच्या अनुसूचित क्षेत्राकरिता गृह विभागाच्या अखत्यारीतील पोलीस पाटलांची जी पदे सरळसेवेने भरावयाची आहेत त्याबाबतीत, तत्सम निदेश देणे इष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रयोजनासाठी उक्त अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; (१) भाग चार ४२---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४० त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या पाचव्या अनुसूचीच्या परिच्छेद ५ च्या उपपरिच्छेद (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :----

उक्त अधिसूचनेच्या परिशिष्टात शेवटी पुढील नोंद, जादा दाखल करण्यात येईल :----

""१७. पोलीस पाटील-गृह विभाग "".

चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.