महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक ४८] शनिवार, एप्रिल २१, २०१८ / वैशाख १, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९.
क्रमांक भानिका-२०१६/प्र.क्र.४३/(भाग-१)/गृनिधो-१.---- महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ (२००० चा १८) याच्या कलम ५७ च्या पोट-कलम (१) आणि पोट-कलम (२) च्या खंड (ग) व कलम ४० याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, जे उक्त अधिनियमाच्या कलम ५७ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र भाडे नियंत्रण सक्षम प्राधिकारी, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :---
१. या नियमांना, महाराष्ट्र भाडे नियंत्रण सक्षम प्राधिकारी, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१८, असे म्हणावे.
२. महाराष्ट्र भाडे नियंत्रण सक्षम प्राधिकारी, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१७ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "मुख्य नियम" असा करण्यात आला आहे) याच्या उद्देशिकेनंतर "नियमांचा मसुदा" हा मजकूर वगळण्यात येईल.
३. मुख्य नियमांच्या नियम ३ मध्ये, खंड (क) मधील "दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर" या मजकुराऐवजी "दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल २१, २०१८ / वैशाख १, शके १९४० HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th April 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA RENT CONTROL ACT, 1999.
No. BHANIKA-2016/C.R.43/(Part-1)/GND-1.— In exercise of the powers conferred by sub- section (1) and clause (g) of sub-section (2) of section 57 read with section 40 of the Maharashtra Rent Control Act, 1999 (XVIII of 2000), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules to amend the Maharashtra Rent Control Competent Authority, Officers and Employees (Appointment and Service Conditions) Rules, 2017 the same having been previously published as required by sub-section (1) of section 57 of the said Act, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Rent Control Competent Authority, Officers and Employees (Appointment and Service Conditions) (First Amendment) Rules, 2018.
2. After the preamble of the Maharashtra Rent Control Competent Authority, Officers and Employees (Appointment and Service Conditions) Rules, 2017 (hereinafter referred to as the "Principal Rules"), the words "Draft Rules" shall be deleted.
3. In rule 3 of the Principal Rules, in clause (a), for the words "Civil Judge, Senior Division" the words "Civil Judge, Junior Division" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. TUMBARE,
Deputy Secretary to Government.