Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Ext. No. 41 (April 23, 2018)

Published 23 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल २३, २०१८/वैशाख ३, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक ३०] सोमवार, एप्रिल २३, २०१८/वैशाख ३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ४१

प्राधिकृत प्रकाशन

अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

जाहीर नोटीस

(महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलमान्वये)

क्र. अं.न.प./नरवि/२०१८-१९/८४

ज्याअर्थी, अंबरनाथ नगरपरिषद ही " अ " वर्ग नगरपालिका असून अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्राकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या विकास योजनेस विकास नियंत्रण नियमावलीसह शासनाने अधिसूचना क्र. TPS. १२०४/९४१/CR-१६३/०४/ UD-१२, दिनांक २५ जुलै २००५ अन्वये भागश: मंजुरी दिली असून त्यामधील काही भागातील EP, दिनांक ११ ऑगस्ट २००८ रोजी मंजुरी दिली आहे. मंजूर EP सह दिनांक १ सप्टेंबर २००८ पासून अंमलात आली आहे.

आणि ज्याअर्थी, मंजूर विकास योजनेनुसार अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील मौजे कोहोजखुंटवली, ता. अंबरनाथ न.भू.क्र. ३२८५ या भूखंडावरील आरक्षण क्र. ९८, " पब्लिक फॅसिलीटी सेंटर " एकूण क्षेत्र ७४०३.५० चौ.मी. या ठिकाणी नाटयगृह बांधण्याचे प्रस्तावित असून सदर इमारतीचा नकाशा मंजुरीसाठी मा. सहायक संचालक, नगररचना, ठाणे यांना मंजुरीस्तव सादर करण्यात आला असता प्रस्तावित नाटयगृहाच्या भूखंडाच्या पूर्व व उत्तर बाजूस असणारे दोन्ही १२.०० मी. रुंदीचे डी. पी. रस्ते अनुक्रमे १८.०० मी व १५.०० मी. करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अंबरनाथ रेल्वेस्टेशन ते डी.एम.सी. कॅन्टीन समोरून जाणारा रस्ता देखील १२.०० मी. ऐवजी १८.०० मी.

रुंदीचा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर रस्ते रुंद केल्यास वाहतूक सुरळीतपणे होण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने तसेच प्रस्तावित बाब तेथील नाटयगृहाच्या उभारणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याअनुषंगाने अंबरनाथ नगरपरिषदेच्या दिनांक ९ मार्च २०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ९९ अन्वये सदर वरीलप्रमाणे नियोजन करण्याचे ठरले आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १७३(१)(ख) अन्वये कोणताही सार्वजनिक रस्ता रुंद करणे, खुला करणे, वाढवणे किंवा अन्य प्रकारे सुधारणे किंवा सार्वजनिक रस्त्याला आनुषंगिक असे कोणतेही बांधकाम करणेबाबतची तरतूद नमूद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ चे कलम १७४(३) अन्वयेअशाप्रकारे रस्ता रुंद करताना आवश्यक असलेली जमीन नगरपरिषदेस संपादन करता येईल याबाबत तरतूद नमूद असून त्यानुसार कार्यवाही होणे अभिप्रेत आहे. भाग दोन-----४१--१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल २३, २०१८/वैशाख ३, शके १९४० त्याअर्थी, मौजे कोहोजखुंटवली, ता. अंबरनाथ न.भू.क्र. ३२८५ या भूखंडाच्या पूर्व बाजूस असणारा के. बी. रोड ते सर्कस ग्राऊंडच्या पूर्व हद्दीलगतचा रस्ता १८.०० मी. रुंदीचा व उत्तर बाजूस असणारा रस्ता छाया हॉस्पिटल जवळील चौकापयर्ंत १५.०० मी. त्याचप्रमाणे अंबरनाथ रेल्वेस्टेशन ते डी.एम.सी. कॅन्टीन समोरून जाणारा रस्ता देखील १२.०० मी. ऐवजी १८.०० मी. रुंदीचा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी याबाबत संबंधितास काही म्हणणे मांडावयाचे असल्यास त्यांच्याकडील असलेल्या मालकी हक्काच्या महसुली पुराव्यासह त्यांचे म्हणणे ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत कामकाजाच्या दिवसांत कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेकडे सादर करण्यात यावे. सदरची बाब ही शहरातील नागरिकांच्या हितासाठी व सार्वजनिक सुविधा उलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने राबविण्याची असल्याने विहित कालावधीनंतर सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

अंबरनाथ, दिनांक १३ एप्रिल २०१८.

देवीदास पवार, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.