Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1-A Ex. Ord. (25-4-2018)

Published 25 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-25.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Reg. No. NP CITY/236/2018-20

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक २९ ] बुधवार, एप्रिल २५, २०१८/वैशाख ५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९१.

आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल.

क्रमांक मनपाना-नरवि-कलम-३७-क्र. १३९-२०१८.----

नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये शासन अधिसुचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४९६-२६४३-प्र. क्र. ३००(अ)-९७-नवि-९, दिनांक ७ जानेवारी २००० अन्वये भागश: मंजूर झाली असून ती दिनांक १ मार्च २००० पासून अमलात आली आहे. तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४००- १६२८-सी. आर.-२००-नवि-९, दिनांक १० सप्टेंबर २००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर २००१ पासून अमलात आलेली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-२४०१-८८५-प्र. क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्राअंतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेली आहे.

नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार खाली नमूद केल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे नागपूर महानगरपालिकेने ठरविले आहे.

नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत मौजा भानखेडा, सव्र्हे क्र. ८५, नगर भूमापन क्र. १३९६, १३९७ मधील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर परीसरातील १८.०० मी. रुंद (उत्तर-दक्षिण) विकास योजना रस्ता शासन अधिसूचना दिनांक १७-०४-२००८, कलम ३७ (२) अन्वये दर्शविलेला रस्ता वगळून सदर क्षेत्र सार्वजनिक/निमसार्वजनिक भागात दर्शविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे प्रस्तावित असून उक्त आरक्षणाखालील जागेच्या विकासाकरीता समुचित प्राधिकरण, महानगरपालिका, नागपूर राहील.

नागपूर महानगरपालिकेने ठराव क्र. १६९, दिनांक २०-०२-२०१८ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात कार्यालयाच्या कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, ना.-एक-अ-१ (१५५२). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल २५, २०१८/वैशाख ५, शके १९४० ही सूचना प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती

महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्तुत प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर : दिनांक २० एप्रिल २०१८.

अश्विन मुदगल, आयुक्त,

महानगरपालिका, नागपूर.

-------------------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ९२.

BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION

MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. NMC-TPD-Act-37-No. 139-2018.—

The Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 31 (1) has been partially sanctioned by the Govt. vide Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)-97-UD-9, dated the 7th January 2000 and came into force from 1st March 2000. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2400-1628-CR- 200-2000-UD-9, dated the 10th September 2001 and came into force from dated 21st September 2001. Also Nagpur Municipal Corporation has been declared as the 'Planning Authority' for Nagpur City except the areas covered under seven scheme vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27th February 2002.

In the said Revised Sanctioned Development Plan, the Municipal Corporation is desirous of making some modifi- cation u/s. 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as detailed below—

The 18.00 m. wide (North-South) D. P. Road was proposed as per MRTP Act, 37 (2) from Indira Gandhi Govt. Medical College and Hospital, Nagpur at Mz. Bhankheda, Kh. No. 85, CTS No. 1396, 1397 vide Urban Development Department GR Date 17-04-2008. This 18.00 m. wide D. P. Road is now proposed for Public/Semi-public use as per Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Nagpur Municipal Corporation is the Planning Authority for this area.

The Nagpur Municipal Corporation has passed the resolution vide Resolution No. 169, date 20-02-2018 has consented to make the aforesaid modification.

The part plan of Development Plan of Nagpur City showing the aforesaid modification are kept open at the office of the Town Planning Deptt. of Nagpur Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days. The suggestions and objections which may be received to Municipal Corporation in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice, will be heard by the Municipal Commissioner before submitting the said modification proposal to the State Government for sanction.

Nagpur :

ASHWIN MUDGAL, Dated the 20th April 2018.

Commissioner, Nagpur Municipal Corporation.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-25.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-25.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.