महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक २१] गुरुवार, मे ३, २०१८/वैशाख १३, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ मे २०१८
आदेश
क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. २५/का.-०५.----मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १९(१) (बी), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ मुंबई अधिनियम क्रमांक ५९) मधील कलम ७-अ तसेच जिल्हापरिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २१ मे, २०१८ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या, या सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तसेच राज्यातील इतर महानगरपालिकेतील व जिल्हापरिषद पंचायत समिती मधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील, असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
नि. ज. वागळे,
अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.