RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४, अंक ३३] मंगळवार, मे १५, २०१८/वैशाख २५, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ६४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-४ सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३९.--- महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम. . . . .
दिनांक १५ मे २०१८ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
–––––––––––––
सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३९.
(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक १५ मे २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२
यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.
२०१३ चा महा. १.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, आता, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---
संक्षिप्त नाव.
१. या अधिनियमास, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०१७, असे म्हणावे.
भाग चार-६४-१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे १५, २०१८/वैशाख २५, शके १९४० २ २. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ (यात यापुढे ज्याचा २०१३ चा महा. १.
निर्देश " मुख्य अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम २ मध्ये,---
(१) खंड (क) पूर्वी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---- सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम २ ची सुधारणा." (१-क) " प्राधिकारी " याचा अर्थ, अधिनियमाच्या कलम ६ च्या पोट-कलम (१) अन्वये नियुक्त केलेले राज्यस्तरीय प्राधिकारी व क्षेत्रस्तरीय प्राधिकारी, असा आहे ; ";
(२) खंड (छ) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----
" (छ-१) " नोंदणीकृत कंपनी " याचा अर्थ, कंपनी अधिनियम, २०१३ याच्या कलम ८ च्या तरतुदीन्वये २०१३ चा १८.
नोंदणी केलेली कंपनी, असा आहे ; ";
(३) खंड (ड) वगळण्यात येईल.
३. मुख्य अधिनियमाच्या कलम ३ मध्ये,----
(१) पोट-कलम (१) ऐवजी, पुढील पोट-कलमे दाखल करण्यात येतील :----
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ ची सुधारणा.
" (१) प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा यांसारखी एखादी नवीन शाळा स्थापन करण्याची किंवा, यथास्थिति, विद्यमान शाळेचा, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत दर्जावाढ करण्याची इच्छा असलेली कोणतीही नोंदणीकृत कंपनी किंवा नोंदणीकृत न्यास किंवा नोंदणीकृत संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण, अनुसूची क मध्ये देण्यात आलेल्या नमुन्यात, अनुसूची ख मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कागदपत्रांसह, ऑनलाईन अर्ज सादर करील. राज्य शासन, वेळोवेळी, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करील अशा शुल्कासह अर्ज सादर करील.
(१क) पोट-कलम (१) अन्वये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही संपूर्ण वर्षभर सतत उपलब्ध राहील. "; (२) पोट-कलम (५) मधील, " कोणत्याही नोंदणीकृत न्यासाने " या मजकुराऐवजी, " कोणत्याही नोंदणीकृत कंपनीने किंवा नोंदणीकृत न्यासाने " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(३) पोट-कलम (५) चे परंतुक वगळण्यात येईल.
४. मुख्य अधिनियमाच्या कलम ४ मध्ये,----
(१) पोट-कलम १ मधील, " कोणत्याही नोंदणीकृत न्यासास " या मजकुराऐवजी, " कोणत्याही नोंदणीकृत कंपनीस किंवा कोणत्याही नोंदणीकृत न्यासास " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ४ ची सुधारणा.
(२) पोट-कलम (१) चे परंतुक वगळण्यात येईल.
५. मुख्य अधिनियमाच्या कलम ५ मधील, पोट-कलम (१) मध्ये, " नोंदणीकृत न्यास " या मजकुराऐवजी, " नोंदणीकृत कंपनी किंवा नोंदणीकृत न्यास " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ५ ची सुधारणा.
६. मुख्य अधिनियमाच्या कलम ६ ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल :----
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ ची सुधारणा.
" ६. (१) राज्य शासन, अर्ज स्वीकारण्यासाठी आणि त्यांची छाननी करण्यासाठी आवश्यक वाटतील असे राज्यस्तरीय प्राधिकारी आणि क्षेत्रस्तरीय प्राधिकारी यांची नियुक्ती करील.
(२) राज्यस्तरीय प्राधिकारी आणि क्षेत्रस्तरीय प्राधिकारी नियुक्ती करण्याची कार्यपद्धती ही विहित राज्यस्तरीय प्राधिकारी आणि क्षेत्रस्तरीय प्राधिकारी यांची नियुक्ती.
करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
(३) राज्यस्तरीय प्राधिकारी व क्षेत्रस्तरीय प्राधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये आणि त्यांचे कामकाज चालवण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती ही विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल. ".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे १५, २०१८/वैशाख २५, शके १९४० ३७. मुख्य अधिनियमाच्या कलम ७ मध्ये, पोट-कलम (१) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ७ ची सुधारणा.
" (१) राज्य शासनास, राज्यस्तरीय प्राधिकायाच्या अहवालाच्या आधारे किंवा अन्यथा, जिच्यासाठी अर्ज केलेला असेल अशी नवीन शाळा सुरू करण्यास किंवा अशा विद्यमान शाळेचा दर्जावाढ कऱण्यास परवानगी देता येईल किंवा ती परवानगी नाकारता येईल. ".
८. मुख्य अधिनियमाच्या कलम ८ मध्ये, पोट-कलम (१) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----
" (१) कलम ३ च्या संदर्भातील अर्जाबाबत परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय अर्जदाराला
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ८ ची सुधारणा.
कळविण्याची कार्यपद्धती ही, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल. ".
९. मुख्य अधिनियमाच्या कलम ९ मध्ये, " इंग्रजी वगळता " हा मजकूर वगळण्यात येईल.
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ९ ची सुधारणा.
१०. मुख्य अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (१) मध्ये, " कोणतेही नोंदणीकृत न्यास " या मजकुराऐवजी, " कोणतीही नोंदणीकृत कंपनी किंवा नोंदणीकृत न्यास " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १२ ची सुधारणा.
११. मुख्य अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (२) मध्ये, " असा न्यास " या मजकुराऐवजी, " अशी कंपनी किंवा असा न्यास " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १४ ची सुधारणा.
१२. मुख्य अधिनियमाच्या कलम १५ मध्ये,----
(१) पोट-कलम (१) मधील,----
(क) " असा कोणताही नोंदणीकृत न्यास " या मजकुराऐवजी, "अशी कोणतीही नोंदणीकृत
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १५ ची सुधारणा.
कंपनी किंवा असा नोंदणीकृत न्यास " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) " सदर न्यासाचा " या मजकुराऐवजी, " सदर कंपनीच्या, न्यासाच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(२) पोट-कलम (३) मधील, " नोंदणीकृत न्यास " या मजकुराऐवजी, " कोणतीही नोंदणीकृत कंपनी किंवा नोंदणीकृत न्यास " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
१३. मुख्य अधिनियमाच्या कलम १६ मध्ये, " कोणत्याही नोंदणीकृत न्यासास " या मजकुराऐवजी, " कोणत्याही नोंदणीकृत कंपनीस किंवा नोंदणीकृत न्यासास " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १६ ची सुधारणा.
१४. मुख्य अधिनियमास जोडलेल्या अनुसूची क मध्ये,----
(१) नोंद (१) ऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :----
" (१) अर्जदाराचे नाव----नोंदणीकृत कंपनी किंवा नोंदणीकृत न्यास किंवा नोंदणीकृत संस्था
सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या अनुसूची- क ची सुधारणा.
किंवा स्थानिक प्राधिकरण : ";
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे १५, २०१८/वैशाख २५, शके १९४० ४ (२) नोंद (९) ऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :----" (९) कंपनी किंवा न्यास किंवा संस्था यांच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत किंवा स्थानिक प्राधिकरणाचा तपशील : ";
(३) नोंद (१०) ऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :----
" (१०) (क) संस्थापन समयलेख किंवा न्यास विलेख किंवा योजना यांची प्रत : ;
(ख) कंपनीचे संचालक, विश्वस्त, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य यांचे विषयीचा तपशील आणि त्यांचे पत्ते : ";
(४) नोंद (११) मधील, उप-नोंदी (क) आणि (ख) यांऐवजी, पुढील उप-नोंदी दाखल करण्यात येतील :----
" (क) कंपनीच्या किंवा न्यासाच्या किंवा संस्थेच्या नावे असलेली नोंदणीकृत जमीन :
(ख) कंपनी किंवा न्यास किंवा संस्था यांच्या नावे असलेला, तीस किंवा त्याहून अधिक वषार्ंचा नोंदणीकृत भाडेपट्टा विलेख किंवा नोंदणीकृत करारनामा : ";
(५) नोंद (१२) ऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :----
" (१२) उपलब्ध जमिनीचे क्षेत्रफळ----
(क) सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आणि राज्यातील सर्व ' अ ' वर्गाच्या नगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये, किमान ५०० चौरस मीटर :
(ख) उर्वरित सर्व क्षेत्रांमध्ये किमान एक एकर : ".
१५. मुख्य अधिनियमास जोडलेल्या अनुसूची ख मध्ये, नोंद (२) ऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :----
" (२) कंपनी किंवा न्यास किंवा, यथास्थिति, संस्था यांच्या बाबतीत, संस्थापन समयलेख किंवा न्यास सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या अनुसूची ख ची सुधारणा.
विलेख किंवा योजना यांची प्रत : ".
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.