Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ext. 298)(Aug. 14th 2018)(महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999)

Published 14 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४०

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक १०६] मंगळवार, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २९८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग दुसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ ऑगस्ट २०१८.

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय.०३१८/प्र.क्र.२४४/पोल-१२.—ज्याअर्थी, एफ. एक्स. कॅपीटल कंपनी (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे.) या वित्तीय संस्थेचे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे, शिवाजीनगर, जि. नांदेड येथे गु.र.नं.१०८/२०१५ भा.दं.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचित विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१), कलम ५ व कलम ८ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे,-----

(१)

भाग चार--ब--२९८---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४० (क) अनुसूचित विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

(ख) उक्त वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, नांदेड यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिका-यास आवश्यक ते सहाय्य करतील.

अनुसूची

एफ. एक्स. कॅपीटल कंपनी या वित्तीय संस्थेचे संचालक, सदस्य व त्यांचे कुटुंबीय/ नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सूची खालीलप्रमाणे आहे :----

स्थावर मालमत्ता

अ. क्र. मालमत्ताधारकाचे नाव

(१) (२)

मालमत्तेचे विवरण (३)

१ सौ. प्रेमला अशोक जाधव

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील सि.स.नं. ६२०३, शिट नं. १०५, म.न.पा.क्र.१-११-४७, एकूण क्षेत्रफळ ८६.९६ चौ.मी. आरसीसी बांधकाम केलेले घर, दयानंदनगर, नांदेड.

२ श्री. विजय एकनाथ ऊर्फ नामदेव बोरसे(पाटील) मौजे धनगरवाडी ता. जि. नांदेड गट नं. ९ व ११४ मधील जानकीनगर येथील

३ प्लॉट नं. ७३, २८, २३ एकूण क्षेत्रफळ ३६० चौ.मी.

३ श्री. जितेंद्रसिंग दर्शनसिंग मोटारवाले व मौजे धनगरवाडी ता. जि. नांदेड येथील गट नं. ११४ मधील शेत एकूण क्षेत्रफळ श्री. गणपतराव जयवंतराव मुंडे. २ हेक्टर ४५ आर पैकी श्री.अशोक जाधव यांच्या हिश्याची परंतु हस्तांतरित केलेली

शेतजमीन.

४ सौ. प्रेमला अशोक जाधव मौजे धनगरवाडी ता. जि. नांदेड गट नं. ९ व ११४ च्या एकत्रित लेआऊट पैकी गट नं. ११४ त्यापैकी जानकीनगर येथील ३ प्लॉट नं. ६९, ३२, १९ एकूण क्षेत्रफळ ४१६.४ चौ.मी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

युवराज अजेटराव, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट १४, २०१८/श्रावण २३, शके १९४०

HOME DEPARTMENT

Second Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Square, Mantralaya, Mumbai 400 032, dated 13th August 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI.0318/CR.244/Pol-12.—Whereas, complaints have been received from number of depositors against F. X. Capital Company (hereinafter referred to "as the said Financial Establishment") and so also Directors of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity ;

And whereas, an offence has been registered against the accused at Shivajinagar Police Station, Dist. Nanded vide C.R. No. 108/2015 u/s 420, 467, 468, 471, 34 of Indian Penal Code r/w section 3, 4, 5 and 6 of Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors ;

And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section(1) of section 4, sub-section (1) of section 5 and section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby,––

(a) attaches the properties of the said Financial Establishment and in the name of its Directors and their relatives as specified in the Schedule; and

(b) appoints the Sub Divisional Officer, Nanded, Dist. Nanded to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

Schedule

F. X. Capital Company its Directors and their Family members and Relative the said property list as under :—

Immovable Property

Sr. No. Name of the Property owner Description of Property

(1) (2)

(3)

1 Premala Ashok Jadhav Nanded-Waghala Municipal Corporation City limits Survey No. 6203, Sheet No. 105, Municipal Corporation No.1-11-47, Area 86.96 Sq.M. Dhayanand Nagar, Nanded.

2 Vijay Eknath alias Mauje Dhangarwadi Tah. Dist. Nanded Gut No. 9 and 114, Namdev Borse (Patil). Plot No.73, 28, 23 Total area 360 Sq. M.

3 Jitendrashing Darshanshing Mauje Dhangarwadi Tah. Dist. Nanded Gut No. 114, 1/3 of Motorwale and Ganpat Jaywantrao Total Area 2 Ha. 45 R., Land belonging to Ashok D. Jadhav Mundhe.

but transferred.

4 Premala Ashok Jadhav Mauje Dhangarwadi Tah. Dist. Nanded Gut No. 9 and 114,

Plot No.69,32,19 Total area 416.4 Sq. M.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YUVRAJ AJETRAO, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.