Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 313 dated 29th August 2018 महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती)विनियमन अधिनियम, 1977. क्रमांक वेतन 1014/प्र.क्र.214/14/टीएनटी-3.

Published 29 August 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २९, २०१८/भाद्रपद ७, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक १११(२)] बुधवार, ऑगस्ट २९, २०१८/भाद्रपद ७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३१३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ ऑगस्ट २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.

क्रमांक वेतन १०१४/प्र.क्र.२१४/१४/टीएनटी-३.—महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ (१९७८ चा महा. ३) याच्या कलम १६ चे पोट-कलम (१), पोट-कलम (२) चा खंड (ब) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांचा पुढील मसुदा, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल.

२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती व सूचना अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी येतील त्यावर शासन विचार करेल.

नियमांचा मसुदा

१. या नियमांना, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१८, असे म्हणावे. २. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील परिशिष्टातील अनसूची " क " मधील वेतनश्रेणी या नावात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे :—

" वेतनश्रेणी (दिनांक १ जानेवारी २००६ पासून लागू.)"

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,वन्दना कृष्णा, शासनाचे अपर मुख्य सचिव. (१) भाग चार--ब--३१३---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २९, २०१८/भाद्रपद ७, शके १९४० SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT Mantralaya Annexe, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 29th August 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS (CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT, 1977.

No. Pay 1014/C.R.214/14/TNT-3.—The following draft of rules to amend the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Rules, 1981, in exercise of the powers conferred by sub-section (1) and Clause (b) of sub-section (2) of the section 16 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Regulation Act, 1977 (Mah. III of 1978) and of all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by the said sub-section (3) of section 16, for information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft rules will be taken into consideration by the Government of Maharashtra on or before the 1st day of October 2018.

2. Any objections or suggestion which will be received by the Additional Chief Secretary, School Education and Sports Department, Mantralaya Annexe, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032 from any person with respect to the said draft on or before the aforesaid date, will be considered by the Government.

DRAFT RULES

1. These rules may be called the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) (First Amendment) Rules, 2018.

2. In Schedule 'C' of the Maharashtra Employees of Private School (Conditions of Service) Rules, 1981, for the heading "Pay Scales" the following heading shall be substituted, namely :—

"Pay Scales

(with effect from the 1st January 2006 onwards.)"

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VANDANA KRISHNA,

Additional Chief Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.