Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 (30-8-2018 to 5-9-2018)

Published 30 August 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ३५] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

--------------------------- अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-२१

१-२

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर २-४

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त), केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०३.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक १० ऑगस्ट २०१८.

क्रमांक एचसीएन-५४१५-प्र.क्र. ६२-का. १४.-----

दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २४(१) व महाराष्ट्र विधी अधिकारी, (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार मुंंंंंंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे खालील अनुसूचित नमूद अधिवक्त्यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर शासन अधिसूचना सम क्रमांक दिनांक ११ ऑगस्ट २०१६ अन्वये १ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीस शासन अधिसूचना दिनांक १० ऑगस्ट २०१७ अन्वये, दिनांक ११ ऑगस्ट २०१७ पासून पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

ना.-एक-१ (१६४३).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० सदर नियुक्तीस दिनांक ११ ऑगस्ट २०१८ पासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पुर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्यात येत आहे.

अनुसूची

अ. क्र. नाव

पदनाम

(१) (२)

(३)

१ अॅड. सागर आशिरगडे अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २ अॅड. संजिव देशपांडे अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ३ अॅड. आनंद देशपांडे अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ४ अॅड. आनंद फुलझेले अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ५ अॅड. शिशिर उके अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ६ अॅड. केतकी जोशी अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ७ अॅड. डी. पी. ठाकरे अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता

२. सदर नियुक्त्या महाराष्ट्र विधी अधिकारी, (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिेलेल्या सेवाशर्तीच्या अधीन राहतील.

३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरूस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राख्ून ठेवीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजीव केळुसकर, अवर सचिव.

--------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०४.

अपर जिल्हाधिकारी, यांजकडून

संदर्भ :--- या कार्यालयाचे आदेश क्र. कार्या-२-अ.का. आस्था १-टे-२-सिआर १४ (१६)-कावि-४९५-२०१८, दिनांक ९ मार्च २०१८.

सुधारित आदेश

क्रमांक कार्या-२-अका आस्था-१-टे-२-सिआर-१४ (१६)-कावि-९१९-२०१८.-----

ज्याअर्थी, उपरोक्त संर्दभिय आदेशान्वये, सन २०१८ या वर्षातील गडचिरोली जिल्ह्यकरीता स्थानिक सुट्टया जाहीर करण्यास आलेल्या आहेत.

ज्याअर्थी, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असल्यामुळे दिनांक ९ ऑगस्ट २०१८ या विश्व आदिवासी दिनाकरीता स्थानिक सुटी जाहिर करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनामार्फत वारंवार करण्यात येत आहे.

त्याअर्थी, संर्दभिय आदेशामध्ये अशंत:बदल करण्यांत येऊन महाराष्ट्र शासन राजकीय आणि सेवा विभागाच्या दिनांक १६ जानेवारी १९५८ च्या शासन निर्णय क्र. पी १३-II-बी आणि ६ ऑगस्ट १९५८ च्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन सन २०१८ या वर्षाकरिता गडचिरोली जिल्ह्यकरिता खालील अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. सणाचे नाव

दिनांक दिवस स्थानिक सुटयाचे क्षेत्र (१) (२)

(३) (४) (५)

१ विश्व आदिवासी दिवस ९ ऑगस्ट २०१८ गुरुवार संपूर्ण गडचिरोली जिल्हा २ पोळा (दुसरा दिवस) १० स्प्टेंबर २०१८ सोमवार संपूर्ण गडचिरोली जिल्हा ३ सर्वपित्री दर्श अमावस्या ८ ऑक्टोबर २०१८ सोमवार संपूर्ण गडचिरोली जिल्हा उपरोक्त आदेश गडचिरोली जिल्ह्यतील दिवाणी फौजदारी न्यायालये अधिकोष (बँक) यांना लागू होणार नाही.

गडचिरोली : दिनांक ७ ऑगस्ट २०१८. अशोक चौधरी, अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० ३ भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०५.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभलिेख, यांजकडून

वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र.-आस्थापना १०९३-प्र. क्र. १९-ल-१, दिनांक १८-८-९४.

(२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. एस. व्ही. सी. आर-४३२३-स-४-९४, दिनंांक २२-९-१९९४.

(३) उपसंचालक, भूमि अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर यांचेकडील पत्र क्र. एकत्रिकरण-१६० आक्र २४६०-कावि १४७-गा.भू.यो.- २०१८-मौजा लाडाळी-२०१८, दिनांक २७-३-२०१८.

(४) उपसंचालक, भूमि अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर यांचेकडील पत्र क्र. एकत्रिकरण-१६० आक्र ५९९८-कावि ४२६-२०१८, दिनांक २२-६-२०१८.

क्रमांक गावठाण-अधिसूचना-प. नो. १२-२५०५०-२०१८.-----

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३-प्र.क्र. १९-ल-१, दिनांक १८-०८-१९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना एस. व्ही. सी. आर-४३२२-स-४- ९४, दिनांक २३-०९-१९९४ अन्वये नागपूर विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमि अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये उप अधिक्षक, भूमि अभिलेख, चंद्रपूर यांचे अधिनस्त सजा चंद्रपूर नझुलमध्ये मौजा ताडाळी हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे सजा चंद्रपूर नझुलमध्ये मौजा ताडाळी हे गाव नव्याने उप अधिक्षक, भूमि अभिलेख, चंद्रपूर मध्ये समाविष्ट करुन त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे. तसेच सनद फी रुपये ३,००,८०२ वसूल करावी.

परिशिष्ट या कार्यालयाकडील क्र. गांवठाण-अधिसूचना-प. नो. १२-२०१८, दिनांक २७-०७-२०१८ चे अधिसूचने सोबतचे परिशिष्ट उप अधिक्षक, भूमी अभिलेख, चंद्रपूर, सजा चंद्रपूर नझुल, जि. चंद्रपूर मधील गावांचा-मिळकतींचा तपशील

जिल्हा कार्यालयाचे नाव सद्या परिरक्षणासाठी उपलब्ध परिरक्षणांस नव्याने पुनर्रचनेनंतरची स्थिती शेरा

(पुनर्रचनेपूर्वी) घ्यावयाचे गांव

------------------------------------------------- ------------------------------------- ------------------------------------------------------- सजा मोहल्ला मिळकती मोहल्ला/गांवे मिळकती सजा मोहल्ला मिळकती (१) (२) (३)

(४)

(५) (६) चंद्रपूर उप अधीक्षक, चंद्रपूर जटपुरा १ १५८९ ताडाळी ८८१ चंद्रपूर जटपुरा १ १५८९ भूमि अभलिेख, नझुल जटपुरा २ ३१०५ नझुल जटपुरा २ ३१०५ बालाजीपुरा २९६९ चंद्रपूर. बालाजीपुरा २९६९ भानापेठ ४८०२ भानापेठ ४८०२ बाबुपेठ २२४४ बाबुपेठ २२४४ सिव्हील लाईन ९२८ सिव्हील लाईन ९२८ समाधीपूरा २४५८ समाधीपूरा २४५८ दुर्गापूर १५७२ दुर्गापूर १५७२

ताडाळी ८८१ नव्याने सामिल

--------------- ------------- -----------

------------- एकूण ७ मोहल्ला .. १९६६७ १ गाव ८८१ एकूण ७ मोहल्ला . .२०५४८ ------------

--------------- ------------- ------------

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ११-०८-२०१८ पासून होणेची आहे.

पुणे : दिनांक २७ जुलै २०१८. एस. चोक्कलिंगम्, जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट ३०-सप्टेंबर ५, २०१८/भाद्रपद ८-१४, शके १९४० भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०६.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

आदेश

क्रमांक जिउनिभं-नियमन-अक्षय पत लाखनी-क-७७अ-आदेश ४३१७-२०१८.-----

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७७ अ, (ब-१), (दोन) अंतर्गत असलेली तरतूद व महाराष्ट्र शासन, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई अधिसूचना क्रमांक सीएसएल-१४९३-११६२-सीआर-४७-१५-सी, दिनांक ७ ऑगस्ट १९९३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, म. म. देशकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा अक्षय नागरी सहकारी पत संस्था मर्या. लाखनी र. नं. ११३२, ता.

लाखनी, जि. भंडारा या संस्थेवर (१) श्री. शिवराम सोनबाजी गि हेपुंजे, मु. मुरमाडी, ता. लाखनी, जि. भंडारा (२) श्री. पद्माकर लक्ष्मणराव बावनकर, मु. शिवनी, ता. लाखनी, जि. भंडारा व (३) डॉ. श्यामराव मनिराम झिंगरे, मु. पिंपळगाव, ता. लाखनी, जि. भंडारा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून ६ महिन्याचे कालावधीकरिता नियुक्त करीत आहे.

सदरहू आदेश आज दिनांक ३१-०७-२०१८ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी तात्काळ प्रभावाने पारीत करीत आहे.

भंडारा : दिनांक ३१ जुलै २०१८.

म. म. देशकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा.

-----------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०७.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

क्रमांक जिदुविअ-चंद्र.-सनि (दुग्ध)-अधिसुचना-६४०-२०१८.-----

जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, चंद्रपूर अंतर्गत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), चंद्रपूर याद्धारे, अधिसूचित करीत आहे की, बिभीषण मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती जमाती महिला बंदिस्त शेळी व मेंढी पालन सहकारी संस्था मर्यादित, हरदोना खुर्द, ता. राजुरा, जि. चंद्रपूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अंतर्गत नोंदविली असून सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक सीएचडी-एडीफ-एजीआर-ओ-१०३६-सन २०१८-१९ असा आहे.

तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ खालील नियम १० (१) अन्वये वर्गीकरण " कृषी संस्था " असून उपवर्गीकरण " अन्य कृषी संस्था " असे आहे.

चंद्रपूर : दिनांक ५ जुलै २०१८.

आर. एन. पोथारे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), चंद्रपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 August 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-08-30.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.