| RNI No. MAHBIL /2009/31745 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग | ||
| वर्ष ४, अंक ५०] शुक्रवार सप्टेंबर ७, २०१८/भाद्र १६, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.०० | ||
| असाधारण क्रमांक ५८ प्राधिकृत प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मु बई ४०० ०३२, दिनांक ७ सप्टेंबर २०१८. ं अधिसूचना क्रमांक डीआयपी-२०१८/प्र.क्र. १९०/३०.–– महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवार, दिनांक १० ऑगस्ट २०१८ रोजी अकोला येथे झालेल्या द ु :खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण क ली. े महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवार, दिनांक १० ऑगस्ट २०१८ रोजी " अकोला येथे निधन झाले. श्री. धोत्रे यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रासह विदर्भाच्या विकासासाठी झटणारा नेता राज्याने गमावला आहे. श्री. धोत्रे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३७ रोजी अकोला जिल्ह्यतील पळसो (बढे) येथे झाला. त्यांनी बी.कॉम. पदवी संपादन केली होती. सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक महवाची पदे त्यांनी भूषविली. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेचे संचालक, अकोला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९८५ मध्ये बोरगाव मंजू या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. १९८६ ते १९८८ या काळात राज्याचे वने, सहकार व रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. श्री. धोत्रे यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दु:ख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या कुटु बीयांच्या ं दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे द ु :ख सहन करण्याची ताकद क टु ु बीयांमध्ये ं येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. " महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, दिनेशकुमार जैन, शासनाचे मुख्य सचिव. | ||
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.