महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ४४] मंगळवार, सप्टेंबर ११, २०१८/भाद्रपद २०, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ८६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ सप्टेंबर २०१८.
शुद्धीपत्र
क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र.क्र. १०/का-६.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ११ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक २१ जून, २०१८ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या, या अधिनियमा अंतर्गत असलेल्या नगरपरिषदा/नगरपंचायती यांच्या माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०१८ मध्ये होणाया सार्वत्रिक/पोट-निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील. असे अधिसुचित करण्यात आले आहे. सदर आदेशात सुधारणा करण्यात येत असून आता दिनांक २१ जून २०१८ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या या अधिनियमा अंतर्गत असलेल्या नगरपरिषदा/नगरपंचायती यांच्या माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर, २०१८ मध्ये होणाया सार्वत्रिक/पोट निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील, असे अधिसुचित करण्यात येत आहे असे वाचण्यात यावे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
नि. ज. वागळे, प्रभारी उप सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.