महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ४, अंक १८] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० [पृष्ठे ३ किंमत : रुपये ९.००ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ सप्टेंबर २०१८.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक टीआरएन. ०३१७/प्र.क्र. १८/सीपीटीपी.----भारताचे संविधान याच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाया राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट " अ " आणि गट " ब " (राजपत्रित) या पदावर निवड होऊन, सरळसेवेने नियुक्त होणाया व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेणाया उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे] नियम, २०१५ मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत :---
१. संक्षिप्त नाव, प्रारंभ व प्रयुक्ती.----(१) या नियमांना महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाया राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट " अ " आणि गट " ब " (राजपत्रित) या पदाकरिता निवड होऊन, सरळसेवेने नियुक्त होणाया व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेणाया उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे](सुधारणा) नियम, २०१८ असे म्हणावे.
(२) हे नियम दिनांक १ ऑगस्ट, २०१७ रोजी म्हणजेच एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाची चौथी तुकडी सुरु होण्याच्या दिनांकास अंमलात येतील.
२. महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाया राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट " अ " आणि गट " ब " (राजपत्रित) या पदावर निवड होऊन, सरळसेवेने नियुक्त होणाया व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाया उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे ] नियम, २०१५ मधील नियम ४ मधील खंड (ख) खालील परंतुकाऐवजी, पुढील परंतुक अंतभर्ूत करण्यात येईल, ते याप्रमाणे :----
" परंतु, जोडपत्रात नमूद केलेल्या गृह विभागाच्या संवर्गापैकी पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता ही---
(एक) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्य नागरी सेवा परीक्षा (मुख्य) आणि मुलाखत यात उमेदवाराला मिळालेले गुण आणि,
(दोन) एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान यशदा, पुणे या प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण व महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक या संस्थेतील प्रशिक्षण यामध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे ९०० गुणांच्या प्रमाणात रुपांतर केल्यानंतर येणारे गुण----
यांची बेरीज करून उमेदवाराला मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
भाग चार-अ-----१
(१)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० २ [स्पष्टीकरण.-----उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे उपच्छेद (२) मधील ९०० गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी यशदा, पुणे येथील प्रशिक्षणाचे १०० गुण व महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथील प्रशिक्षणाचे २१०० गुण मिळून एकूण २२०० गुणांचे रुपांतर ९०० गुणांमध्ये करण्यात येईल.] परंतु आणखी असे की, एकाच संवर्गातील एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाले असतील तर त्यांची परस्पर सेवाज्येष्ठता त्यांच्या जन्मतारखेच्या आधारे निश्चित करण्यात येईल. आणि ज्येष्ठता निर्धारित करण्याच्या प्रयोजनार्थ वयाने ज्येष्ठ असणारी व्यक्ती ज्येष्ठ असल्याचे मानण्यात येईल."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सीताराम कंुटे, शासनाचे अपर मुख्य सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४०क्रमांक टीआरएन. ०३१७/प्र.क्र. १८/सीपीटीपी. सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : ७ सप्टेंबर २०१८.
प्रतिलिपी,
१) राज्यपालांचे सचिव,
२) मुख्यमंयांचे प्रधान सचिव,
३) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
४) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालयीन विभाग,
५) सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
६) *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
७) *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
८) *मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
९) *मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
१०) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
११) *सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
१२) *सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
१३) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१४) *आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
१५) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१६) महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोेधिनी (यशदा), पुणे,
१७) संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर,
१८) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती)
१९) सर्व मंत्रालयीन विभाग,
२०) सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालयीन प्रमुख,
२१) सर्व विधिमंडळ सदस्य,
२२) विधिमंडळ ग्रंथालय, विधानभवन, मुंबई (१० प्रती),
२३) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
२४) निवडनस्ती.
* पत्राद्वारे
वि. रा. ठाकूर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० ३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th September 2018NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. TRN. 0317 / C.R. 18 / CPTP.—In exercise of the powers conferred by the proviso to Article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Civil Services [ Fixation of seniority of the candidates recruited directly by selection for the posts of Group "A" and Group "B" (Gazetted) through State Civil Service Examination conducted by the Maharashtra Public Service Commission and undergoing Combined Probationary Training Programme] Rules, 2015, namely :—
1. Short title, commencement and application.— (1) These rules may be called as the Maharashtra Civil Services [ Fixation of seniority of the candidates recruited directly by selection for the posts of Group "A" and Group "B" (Gazetted) through State Civil Service Examination conducted by the Maharashtra Public Service Commission and undergoing Combined Probationary Training Programme ] Ammendment Rules, 2018.
(2) They shall come into force with effect from 1st August 2017 i.e. the date on which the 4th Batch of Combined Probationary Training Programme (CPTP-4) is started.
2. In rule 4 of the Maharashtra Civil Services [Fixation of seniority of the candidates recruited directly by selection for the posts of Group "A" and "B" (Gazetted) through State Civil Service Examination conducted by the Maharashtra Public Service Commission and undergoing Combined Probationary Training Programme ] Rules, 2015, in sub-rule (1), the proviso after Clause b is omitted and following proviso shall be added namely :—
" Provided that the seniority of the candidates selected for the post of Deputy Superintendent of Police or the Assistant Commissioner of Police Group "A" cadre of the Home Department mentioned in the Annexe shall be fixed on the basis of cumulative total of :—
(i) The marks obtained by the candidates in the State Civil Service Examination (Main) and the interview conducted by the Maharashtra Public Service Commission; and
(ii) The marks obtained by the candidates in their assessment in the training programme conducted at YASHADA, Pune and Maharashtra Police Academy, Nashik after converting these marks into the ratio of 900 marks.
Explanation.—For converting the marks into ratio of 900 marks, the marks obtained by the candidates in their assessment for 100 marks during training at YASHADA, Pune and assessment for 2100 marks during training at Maharashtra Police Academy i.e. total marks 2200 will be converted into 900 marks :
Provided further that, if the cumulative total of marks obtained by more than one candidate of the same cadre, is equal, then their inter-se seniority shall be fixed on the basis of their dates of birth and the person senior in age shall be considered as senior for the purpose of determining the seniority.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Additional Chief Secretary to Government. भाग चार-अ-----२
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३-१९, २०१८/भाद्रपद २२-२८, शके १९४० No. TRN. 0317/C.R .18 /CPTP. GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,Dated the 7th September 2018.
Copy forwarded to—
(1) The Secretary to Governor,
(2) The Principal Secretary to the Chief Minister,
(3) The Chief Secretary to Government,
(4) All Additional Chief Secretaries / All Principal Secretaries / All Secretaries to Government, (5) All Private Secretaries / Personal Assistants to Ministers and Ministers of State, (6) *Registrar, High Court (Original Side), Mumbai,
(7) *Registrar, High Court (Appellate Side), Mumbai,
(8) *Registrar, Office of the Lok Ayukta and Upa Lok Ayukta, Mumbai,
(9) *Secretary, Maharashtra Legislative Assembly, Secretariate, Mumbai,
(10) *Secretary, Maharashtra Legislative Council, Secretariate, Mumbai,
(11) *Hon. Chairman, Mahahrashtra Legislative Council, Mumbai,
(12) *Hon. Speaker, Mahahrashtra Legislative Assembly, Mumbai ,
(13) *Secretary, Mhaharashtra Public Service Commission, Mumbai,
(14) *Commissioner, State Election Commission, Mumbai,
(15) Director General of Police, Mhahrashtra, Mumbai,
(16) Director General, Yashwantrao Chavan Academy of Development Administration, (YASHADA) Pune,
(17) Director, Vasantrao Naik Agriculture Extension Management Training Institute (Vanamati), Nagpur,
(18) All Departments of Mantralaya,
(19) All Heads of Departments and Heads of Offices under the Several Departments of the Mantralaya,
(20) Director General, Directorate of Information and Public Relation, Mumbai, (5 Copies), (21) All Members of Legislature,
(22) Legislature Library, Vidhan Bhavan, Mumbai (10 Copies),
(23) All desks in the General Administration Department,
(24) Select File.
*By letter.
V. R. THAKUR,
Deputy Secretary to Government.