महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक ४९] शनिवार, सप्टेंबर १५, २०१८/भाद्र २४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ६४
प्राधिकृत प्रकाशन
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
महानगरपालिका कार्यालय, शिवाजी चौक, कल्याण (प.)
जाहीर सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ६० अन्वये.
क्रमांक कडोंमपा/नरवि/३४३८.—ज्याअर्थी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ३ ते ७ ची विकास योजना शासनाने दिनांक ४ एप्रिल २०१२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे सारभूत स्वरूपाचे फेरबदल (E.P. Site) वगळून मंजूर केली आहे. तसेच उक्त्त विकास योजनेमधील सारभूत स्वरूपाचे फेरबदलास (E.P. Site) शासनाने दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मंजुरी प्रदान केलेली आहे. ज्याअर्थी, महापालिका क्षेत्रामधील विकास योजनेतील प्रस्तावांची प्रभावी अंमलबजावणी करणेकरिता Self Financing Mechanism द्वारे परियोजना राबविणे आवश्यक आहे. त्याधर्तीवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यानंतर "उक्त्त अधिनियम" असे उल्लेखिलेला) चे कलम ५९ ते ११२ (नगरररचना परियोजना तयार करणे) मधील तरतुदीनुसार उत्तर कल्याण विभागातील मौजे सापाड व वाडेघर या भागाचा टप्प्या-टप्प्याने सुनियोजित विकास करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
ज्याअर्थी, मौजे सापाड व वाडेघर या भागातील नगररचना परियोजना क्रमांक १ (क्षेत्र--१६३.८० हेक्टर) व २ (क्षेत्र--१३१.०० हेक्टर) (Town Planning Scheme No. I and II) (एकूण क्षेत्र--२९४.८० हेक्टर) या क्षेत्राकरिता नगररचना परियोजना (Town Planning Scheme) राबविणेचे प्रस्तावित आहे. सदर नगररचना परियोजना अंतर्गत क्षेत्रामधील जमीनधारकांना त्यांचे मालकीचे भूखंडाचे नियमित आकार करून त्यांचे मूळ क्षेत्राच्या ठराविक प्रमाणात प्रस्तावित आराखडयामधील प्लॉट हस्तांतरित करून उर्वरित क्षेत्राचा सुनियोजित विकास करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच शासनाकडून उक्त्त परियोजनेच्या मंजूर करण्यात येणाया मसुद्यानुसार चटईक्षेत्र अनुज्ञेय करण्यात येणार असून त्यायोगे महापालिकेस विविध सोयी-सुविधाकरिता भूखंड प्राप्त होणार आहेत तसेच पायाभूत सुविधा पुरविणेकामी अधिमूल्य (Premium) स्वीकारून जमीनमालकांना वाढीव चटईक्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर क्षेत्राकरिता स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली बनविण्याचे प्रस्तावित आहे. उक्त्त नगररचना परियोजना तयार करण्याचा इरादा घोषित करणेस्तव उक्त्त अधिनियमाचे कलम ६० अन्वये नियोजन प्राधिकरण म्हणून मा. महासभेने दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी ठराव क्र. ६३ नुसार मान्यता दिलेली आहे.
त्याअर्थी, महापालिका क्षेत्रामधील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, उक्त्त अधिनियमाचे कलम ६० अन्वये प्रस्तावित प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक १ व २ (Town Planning Scheme No. I and II) मध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व इतर तपशील सहायक संचालक, नगररचना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचे कार्यालयामध्ये निरीक्षणाकरिता उपलब्ध करण्यात आलेला आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १५, २०१८/भाद्रपद २४, शके १९४० KALYAN-DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION, KALYANCorporation Office, Shivaji Chowk, Kalyan (W.)
Notice
AS PER THE SECTION 60 OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
Whereas, the Government of Maharashtra has sanctioned the Development Plan of Sector 3 to 7 of Kalyan-Dombivli Municipal Corporation Vide Notification date 4th April 2012, excluding the E. P. Sites. Also Government of Maharashtra has sanctioned the E. P. Sites of Sector 3 to 7 Vide Notification date 4th August 2016.
Whereas, it is found necessary to prepare the Self Financing Machanism for effective implementation of proposals of Development Plan. Accordingly the Northern part of Kalyan, comprising of village Sapad and Vadeghar is proposed to be developed in planned manner by preparing 'Town Planning Scheme' for this area, as per section 59 to 112 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act").
Whereas, 'Town Planning Scheme' is proposed to be implemented on 294.80 hectare area of the Northern part of Kalyan, comprising of village Sapad and Vadeghar as Town Planning Scheme No. I (Area 163.80 Hec.) and II (Area 131.00 Hec.). The land owners in the area of 'Town Planning Scheme' will be allotted regular shaped plots in proportion to their original holdings, and the balance area will be utilised for various public amenities and roads etc. It is also proposed to prepare Development Control regulations for 'Town Planning Scheme' area and the F.S.I. will be allotted as per the sanction of Government of Maharashtra.
And whereas, the Hon. General Body of Kalyan-Dombivli Municipal Corporation has passed the Resolution No. 63, dated 10th September 2018 for declaring intention as per section 60 of the said Act, to prepare 'Town Planning Scheme' on 294.80 hectare area (T.P. Scheme No. I and II) of the Northern part of Kalyan, comprising of village Sapad and Vadeghar.
All the Citizens are hereby informed that, the plan showing the boundary of the proposed Town Planning Scheme No. I and II area is displayed in the Office of Assistant Director of Town Planning, Kalyan-Dombivli Municipal Corporation, for inspection of the general public.
GOVIND BODKE,
Commissioner, Kalyan, dated 15th September 2018. Kalyan-Dombivli Municipal Corporation.