महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १२५] गुरूवार, ऑक्टोबर ४, २०१८/आशि्वन १२, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३५१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक मूवक-१५१८/प्र.क्र. १०१/कराधान-१.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ९ च्या उप-कलम (१) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची ' ख ' मध्ये, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ पासून खालील प्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :----
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ मधील, अनुसूची ' ख ' मधील, नोंद १० मध्ये,
(क) खंड (क) च्या, उप-खंड (एक) आणि उप-खंड (दोन) च्या स्तंभ (३) मधील " २६% + प्रती लिटर नऊ रुपये " या अंक, चिन्हे आणि शब्दांऐवजी " २६% + प्रती लिटर सात रुपये बारा पैसे " हे अंक, चिन्हे आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत ;
(ख) खंड (ख) च्या, स्तंभ (३) मधील, " २५% + प्रती लिटर नऊ रुपये " या अंक, चिन्हे आणि शब्दांऐवजी " २५% + प्रती लिटर सात रुपये बारा पैसे " हे अंक, चिन्हे आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. वि. दिपटे,
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर ४, २०१८/आशि्वन १२, शके १९४० FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th October 2018NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. VAT-1518/CR-101/Taxation-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra, hereby amends SCHEDULE 'B' appended to the said Act, with effect from the 5th October 2018 as follows :—
In the Maharashtra Value Added Tax Act, 2002,
In Schedule ' B ' in entry 10,
(a) in sub-entry (a), against clauses (i ) and (ii), in column (3), for the figures, signs and words " 26%+ Nine rupees per litre ", the figures, signs and words, " 26%+ Seven rupees and twelve paise per litre" shall be substituted;
(b) in sub-entry (b), in column (3), for the figures, signs and words, " 25%+ Nine rupees per litre ", the figures, signs and words " 25%+ Seven rupees and twelve paise per litre " shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. V. DIPTE,
Deputy Secretary to Government.