Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV (Ext. 95) (4th October 2018) सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 60

Published 04 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर ४, २०१८/आश्िवन १२, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ५३] गुरूवार, ऑक्टोबर ४, २०१८/आश्िवन १२, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ९५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १--२ सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६०.----सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

. . . .

दिनांक १३ सप्टेंबर २०१८ रोजी मा. राष्ट्रपतींनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

------------------------------------------

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६०.

(मा. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार

आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ महाराष्ट्र राज्यास लागू

असताना, त्यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

२००३ चा ३४.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :--- संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य २००३ चा ३४. व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८, असे म्हणावे. (१) भाग चार---९५-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर ४, २०१८/आश्िवन १२, शके १९४० २. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ मध्ये, खंड (ङ) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल:--- सन २००३ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३ ची सुधारणा.

" (ङङ) " हुक्का बार " याचा अर्थ, अशी आस्थापना जिथे लोक एकत्र येऊन सामुदायिक हुक्का किंवा नर्ागिले (गुडगुडी) जे प्रत्येकाला दिले जाते, यातून तंबाखूचे धुम्रपान करतात, असा आहे ; ".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ४ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

सन २००३ चा अधिनियम क्रमांक ३४ यात नवीन कलम ४अ समाविष्ट करणे.

हुक्का बारवर बंदी.

" ४क. या अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, कोणतीही व्यक्ती स्वत:हून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या वतीने, खाद्यगृहाच्या जागेसह कोणत्याही जागी हुक्का बार सुरू करणार नाही किंवा चालवणार नाही.

स्पष्टीकरण.---- " खाद्यगृह " या शब्दप्रयोगास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ याच्या कलम २ १९५१ चा २२.

च्या खंड (५अ) मध्ये त्यास जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.".

४. मुख्य अधिनियमाच्या, कलम १२ मधील पोट-कलम (१) मधील,-----

(एक) खंड (ख) मध्ये, " आहे ; " या मजकुरानंतर " किंवा " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

सन २००३ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १२ ची सुधारणा.

(दोन) खंड (ख) नंतर, पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल :-----

" (ग) जिथे कोणताही हुक्का बार चालविण्यात येत आहे ; ".

५. मुख्य अधिनियमाच्या कलम १३ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

सन २००३ चा अधिनियम क्रमांक ३४ यात नवीन कलम १३अ समाविष्ट करणे.

जप्तीचा अधिकार.

" १३क. जर, राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकायास, कलम ४क च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे किंवा करण्यात येत आहे असे वाटण्यास कारण असेल तर, त्याला हुक्का बार साठीची साधने किंवा वापरलेले कोणतेही पदार्थ किंवा साहित्य जप्त करता येईल. ".

६. मुख्य अधिनियमाच्या कलम २१ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

सन २००३ चा अधिनियम क्रमांक ३४ यात नवीन कलम २१अ समाविष्ट करणे.

हुक्काबार चालविण्याकरिता शिक्षा.

" २१क. जी कोणी व्यक्ती, कलम ४क च्या तरतुदींचे उल्लंघन करील ती एका वर्षापेक्षा कमी नसेल परंतु, तीन वषार्ंपयर्ंत असू शकेल एवढया मुदतीच्या कारावासाच्या आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, एक लाख रुपयांपयर्ंत असू शकेल एवढया द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. ".

७. मुख्य अधिनियमाच्या कलम २७ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

सन २००३ चा अधिनियम क्रमांक ३४ यात नवीन कलम २७अ समाविष्ट करणे.

" २७क. कलम ४क खालील अपराध हे दखलपात्र असतील. ". कलम ४अ खालील अपराध दखलपात्र असणे. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.