Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 356 (8th Oct. 2018) महाराष्ट्र जमीण महसूल संहिता, 1966

Published 08 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर ८, २०१८/आशि्वन १६, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक १२८] सोमवार, ऑक्टोबर ८, २०१८/आशि्वन १६, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३५६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ ऑक्टोबर २०१८.

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक जमीन. २०१५/प्र.क्र.५५/ज-१.—महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) याच्या कलम ३२८, च्या पोट- कलम (१) आणि पोट-कलम (२) च्या खंड (चार),(दहा), (चौदा) आणि (त्रेसष्ठ) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१" यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे, हे नियम उक्त संहितेच्या कलम ३२९ च्या, पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

१. या नियमांना, " महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (तिसरी सुधारणा) नियम, २०१८" असे म्हणावे. २. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम १९७१ च्या नियम ६ च्या पोट-नियम (३) मध्ये,—

(i) खंड (ब) मधील " विभागास महसूल मुक्त व सारामाफीने " या शब्दानंतर " किंवा शासनाने अन्यथा विवक्षितपणे विर्िनदिष्ट केलेले असल्यास त्यानुसार " हे शब्द समाविष्ट करण्यात येत आहेत;

(ii) खंड (ब) खाली पुढीलप्रमाणे परंतुक समाविष्ट करण्यात येत आहे :—

" तथापि, अशा प्रकल्पास रितसर प्रशासकीय मान्यता प्रदान करताना किंवा अन्यथा, जर शासनाने शासकीय जमीन प्रदान करण्याकरिता शासकीय यंत्रणा नामनिर्देशित केली असेल, व त्याकरिता शासकीय जमीन प्रदानाच्या काही विवक्षित अटी व शर्ती विहित केल्या असतील, तर अशा जमिनीचे भोगवटामुल्य कितीही असले तरी, जिल्हाधिकारी अशा अटी व शर्तीप्रमाणे अशी शासकीय जमीन राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या शासकीय यंत्रणेस संबंधित प्रकल्पासाठी प्रदान करण्यास सक्षम असतील."

(१)

भाग चार--ब--३५६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर ८, २०१८/आशि्वन १६, शके १९४० ३. या मुख्य नियमांच्या सोबत जोडलेल्या नमुना एक-अ मध्ये,—

(i) शिर्षकामध्ये " समुचित प्राधिकरण " या शब्दानंतर " किंवा शासकीय यंत्रणा " या शब्दांचा समावेश करण्यात यावा. (ii) दुसया परिच्छेदातील " समुचित प्राधिकरण " या शब्दानंतर " किंवा शासकीय यंत्रणा " या शब्दांंचा समावेश करण्यात यावा. (iii) चौथ्या परिच्छेदातील " राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागास " या शब्दानंतर " किंवा शासकीय यंत्रणा यांना शासनाने अन्यथा विवक्षितपणे विनिर्दीष्ट केलेले असल्यास .......................... * .......................... (याठिकाणी ज्या आदेशात जमीन प्रदानविषयक अटी व शर्ती नमूद केलेल्या असतील त्या आदेशाचा तपशील देण्यात यावा.) त्यानुसार" या शब्दांचा समावेश करण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजेंद्र क्षीरसागर, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर ८, २०१८/आशि्वन १६, शके १९४० ३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mumbai 400 032, dated 8th October 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. Jamin-2015/C.R.55 /J-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (iv),(x),(xiv), (lxiii) of sub-section (2) of section 328 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 ( Mah. XLI of 1966) and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules, further to amend the Maharashtra Land Revenue (Disposal of Government Lands) Rules, 1971, the same having been published previously as required by sub-section (1) of section 329 of the said Code, namely:—

1. These rules may be called the Maharashtra Land Revenue (Disposal of Government Lands) (Third Amendment) Rules, 2018.

2. In rule 6 of the Maharashtra Land Revenue (Disposal of Government Lands) Rules, 1971,(hereinafter referred to as "the Principal Rules"), in sub-rule (3),—

(i) in clause (b), after the words "free of land revenue", in the words "Or on such terms, if any, as specified by the Government." shall be inserted;

(ii) after the clause (b) the following proviso shall be inserted, namely:—

" Provided that, if at the time of grant of administrative approval to such project or otherwise, any government agency has been designated by the Government for grant of government land for such projects and terms and conditions of such grant of land have been specified by it, the Collector shall be competent to grant government land for such project to such designated government agency on such terms and conditions as specified by the Government, irrespective of the market value of such land."

3. In Form I-A appended to the Principal Rules,—(i) in the Heading, after the words " State Government " the words "/Government Agency " shall be inserted;

(ii) in second paragraph, after the words "State Government" the words "/Government Agency" shall be inserted;

(iii) in fourth paragraph, after the words " State Government Department " the words and brackets "/ on the terms and conditions specified by the Government in .....................*..................... (here specify the details of the document containing terms and conditions of grant of land)" shall be inserted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAJENDRA KSHIRSAGAR,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.