RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १३०] बुधवार, ऑक्टोबर १०, २०१८/आशि्वन १८, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३५८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६.
क्रमांक परिनि-२०१८/प्र.क्र.८२/विशि-२.--- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६) याच्या कलम २३ च्या पोट-कलम (२) च्या खंड (क) तसेच कलम ७२ च्या पोट-कलम (१०) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, संचालक, विद्यार्थी विकास याच्या वित्तलब्धी, पदावधी आणि सेवेच्या अटी व शर्ती यांच्याशी संबंधित पुढीलप्रमाणे एकरूप परिनियम विहित करीत आहे :----
२०१८ चा एकरूप परिनियम क्रमांक १.
१. संक्षिप्त नाव.----या परिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (संचालक, विद्यार्थी विकास, याच्या वित्तलब्धी, पदावधी आणि सेवेच्या अटी व शर्ती) एकरूप परिनियम, २०१८, असे म्हणावे.
२. नामनिर्देशन प्रक्रिया.----कुलगुरू, पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवील आणि त्यांच्यामधून एका योग्य व्यक्तीला, संचालक, विद्यार्थी विकास म्हणून तीन वषार्ंच्या पदावधीकरिता, जो आणखी एका मुदतीसाठी नवीकृत करता येईल---नामनिर्देशित करील. याबाबत मूळ महाविद्यालय किंवा मूळ मान्यताप्राप्त परिसंस्था किंवा मूळ विद्यापीठ सदर पदावर प्रतिनियुक्त झालेल्या व्यक्ितच्या जागी दुसया व्यक्ितची नेमणूक त्या त्या वेळी अस्तित्वात असलेल्या निकषानुसार करू शकेल.
३. वित्तलब्धी.----संचालक, विद्यार्थी विकास म्हणून नामनिर्देशित केलेली व्यक्ती, संचालक, विद्यार्थी विकास म्हणून तिचे नामनिर्देशन केल्याच्या दिनांकास तिच्या पूर्वीच्या सेवेत असताना तिला जितकी वित्तलब्धी व वेतनमान मिळत असेल तितकी वित्तलब्धी व वेतनमान मूळ महाविद्यालय किंवा मूळ मान्यताप्राप्त परिसंस्था किंवा मूळ विद्यापीठ याकडून मिळण्यास हक्कदार असेल.
भाग चार--ब--३५८----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १०, २०१८/आशि्वन १८, शके १९४० ४. वय.----संचालक, विद्यार्थी विकास या पदाच्या नामनिर्देशनासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय हे नामनिर्देशनाच्या वेळेस ५० वषार्ंपेक्षा जास्त असणार नाही.
५. सेवेच्या अटी व शर्ती.----(१) संचालक, विद्यार्थी विकास याच्या सेवेच्या अटी व शर्ती ह्य, त्याच्या मूळ पदाच्या अटी व शतर्ींप्रमाणेच असतील आणि संचालक, विद्यार्थी विकास म्हणून त्याच्या पदावधीदरम्यान त्याला अहितकारक होईल अशा प्रकारे त्या बदलता येणार नाहीत.
(२) संचालक, विद्यार्थी विकास म्हणून नामनिर्देशन झाल्यावर, त्याच्या मूळ कायम पदावर त्याने घेतलेले अंतिम वेतन संरक्षित केले जाईल.
(३) संचालक, विद्यार्थी विकास म्हणून नामनिर्देशित झालेल्या व्यक्तीचा, नामनिर्देशनापूर्वी तिने धारण केलेल्या कायम पदावर धारणाधिकार असेल आणि त्या पदाच्या सेवेच्या अटी व शतर्ींनुसार ती तिच्या मूळ पदावरून सेवानिवृत्त झाल्याप्रमाणे असेल.
(४) संचालक, विद्यार्थी विकास हा, थेट कुलगुरूंच्या पर्यवेक्षणाखाली व नियंत्रणाखाली काम करील.
(५) संचालक, विद्यार्थी विकास यास, कुलगुरूला उद्देशून, एक महिन्याची नोटीस देऊन, आपल्या पदाचा लेखी स्वरूपात त्याच्या स्वाक्षरीने राजीनामा देता येईल आणि कुलगुरूने त्याचा राजीनामा स्वीकारल्यावर किंवा उक्त नोटिशीचा कालावधी समाप्त झाल्याच्या दिनांकापासून, यांपैकी जे अगोदर घडेल तेव्हापासून, त्याचे पद धारण करण्याचे बंद होईल.
(६) संचालक, विद्यार्थी विकास यास, कुलगुरूकडून एक महिन्याची लेखी नोटीस देऊन त्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सिद्धार्थ खरात,
शासनाचे सहसचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १०, २०१८/आशि्वन १८, शके १९४०HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th October 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA PUBLIC UNIVERSITIES ACT, 2016.
No. Parini-2018/C.R. 82/Vishi-2.—In exercise of the powers conferred by sub-section (10) of section 72, read with clause (a) sub-section (2) of section 23 of the Maharashtra Public Universities Act, 2016 (Mah. Act. No. VI of 2017), the Government of Maharashtra hereby, prescribes the following Uniform Statute relating to emoluments, tenure and terms and conditions of service of the Director of Students' Development, namely :—
UNIFORM STATUTE NO. 1 OF 2018.
1. Short title.—This Statute may be called the Maharashtra Public Universities (Emoluments, Tenure and Terms and Conditions of Service of the Director of Students' Development) Uniform Statute, 2018.
2. Procedure for Nomination.—The Vice-Chancellor shall invite applications from the eligible aspiring candidates and shall nominate a suitable person as the Director of Students' Development from amongst them for a tenure of 3 years, which may be Renewed for one more term.The parent college or parent recognized institution or the parent university, in such case, shall be eligible to appoint the substitute person during the deputation period as per the prevailing norms.
3. Emoluments.—The person nominated as the Director of Students' Development shall be entitled to receive the parent college or parent recognized institution or the parent university the same emolument and pay-scale which he was drawing in his previous service on the date of nomination as the Director of Students' Development.
4. Age.—Age of the candidate aspiring the nomination to the post of Director of Students' Development at the time of nomination shall not be more than 50 years.
5. Terms and Conditions of Service.—(1) Terms and conditions of service of the Director of Students' Development shall be the same as the terms and conditions of service of his original post and shall not be altered to his disadvantage during his tenure as the Director of Students' Development.
(2) On nomination as the Director of Students' Development, the pay last drawn by him on his original substantive post shall be protected.
(3) The person nominated as the Director of Students' Development shall hold a lien on the substantive post held by him prior to the nomination and he shall stand retired from his original post in accordance with the terms and conditions of service of that post.
(4) The Director of Students' Development shall work directly under the supervision and control of the Vice-Chancellor.
(5) The Director of Students' Development may, by writing under his signature addressed to the Vice-Chancellor, after giving one month's notice resign from his office and shall cease to hold his office on the acceptance of his resignation by the Vice-Chancellor or from the date of expiry of the said notice period, whichever is earlier.
(6) The Director of Students' Development may be relieved from his office by the Vice-Chancellor by giving one month's notice in writing.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SIDHHARTH KHARAT,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.