Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ex. 98 (October 13-2018).pmd वित्त विभाग अध्यादेश क्र. 22, वस्तू व सेवा कर

Published 13 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ५६ ] शनिवार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ९८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २२.--- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी

पृष्ठे १-१२ सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

वित्त विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ ऑक्टोबर २०१८.

MAHARASHTRA ORDINANCE No. XXII OF 2018.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA GOODS AND

SERVICES TAX ACT, 2017.

सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २२.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

२०१७ चा महा. ४३.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

(१)

भाग चार—९८–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०१८ असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) कलम १ तात्काळ अंमलात येईल.

(३) अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, उर्वरित कलम शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियत करील अशा दिनांकास अंमलात येतील आणि या अध्यादेशाच्या निरनिराळ्या तरतुदींसाठी निरनिराळे दिनांक नियत करता येतील आणि या अध्यादेशाच्या प्रारंभाबाबतच्या अशा कोणत्याही तरतुदीतील कोणत्याही निर्देशाचा अन्वयार्थ, ती तरतूद अंमलात येण्याबाबतचा तो निर्देश आहे, असा लावण्यात येईल.

२. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " २०१७ चा महा. ४३.

असा करण्यात आला आहे) याच्या कलम २ मध्ये,—

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २ ची सुधारणा.

(क) खंड (४) मध्ये, " अपील प्राधिकारी व अपील न्यायाधीकरण " या मजकुराऐवजी, " अपील प्राधिकारी, अपील न्यायाधीकरण आणि कलम १७१ च्या पोट-कलम (२) मध्ये र्िनदिष्ट केलेले प्राधिकरण " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) खंड (१६) मध्ये, " केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमाशुल्क मंडळ " या मजकुराऐवजी, " केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ग) खंड (१७) मध्ये, उप-खंड (ज) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :—

" (ज) पणगणकाच्या किंवा लायसनदार बुकीच्या माध्यमातून होणाया व्यवहारांसह एखाद्या रेस क्लबचे व्यवहार किंवा अशा क्लबमधील एखाद्या लायसनप्राप्त बुकीचे व्यवहार ; आणि " ;

(घ) खंड (१८) वगळण्यात येईल ;

(ङ) खंड (३५) मध्ये, " अथार्ंतर्गत असलेला " या मजकुराऐवजी, " कलम २ च्या पोट-कलम (१) च्या खंड (ख) मध्ये व्याख्या केलेला " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(च) खंड (६९) च्या उप-खंड (च) मध्ये, " अनुच्छेद ३७१ " या मजकुरानंतर, " आणि अनुच्छेद ३७१ ञ " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(छ) खंड (१०२) मध्ये, पुढील स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात येईल :—

" स्पष्टीकरण.— शंकानिरसनासाठी, याद्वारे असे स्पष्ट करण्यात येते की, " सेवा " या शब्दप्रयोगामध्ये, रोख्यांचे संव्यवहार सुलभ करणे किंवा त्याची व्यवस्था करणे यांचा समावेश होतो ; ".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ७ मध्ये, १ जुलै २०१७ पासून,—

(क) पोट-कलम (१) मध्ये,—

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ७ ची सुधारणा.

(एक) खंड (ख) मध्ये, " सेवा आयात करणे ; " या मजकुरानंतर, " आणि " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल आणि तो नेहमीकरिता समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(दोन) खंड (ग) मधील " कार्ये ; " या मजकुरानंतरचा " आणि " हा मजकूर वगळण्यात येईल आणि तो नेहमीकरिता वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(तीन) खंड (घ) वगळण्यात येईल आणि तो नेहमीकरिता वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० ३

(ख) पोट-कलम (१) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल आणि ते नेहमीकरिता समाविष्ट करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल :—

" (१क) पोट-कलम (१) च्या तरतुदींनुसार विवक्षित कार्ये किंवा व्यवहार हे पुरवठा ठरत असतील तेव्हा त्या कायार्ंना किंवा व्यवहारांना अनुसूची-दोन मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे एकतर वस्तूंचा पुरवठा किंवा सेवांचा पुरवठा म्हणून समजण्यात येईल. " ;

(ग) पोट-कलम (३) मध्ये, " पोट-कलमे (१) व (२) " या मजकुराऐवजी, " पोट-कलमे (१), (१क) व (२) " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ९ मध्ये, पोट-कलम (४) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :—

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ९ ची सुधारणा.

" (४) शासनास, परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे, ज्या व्यक्ती एखाद्या अनोंदणीकृत पुरवठादाराकडून प्राप्त झालेल्या वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या विर्िनदिष्ट प्रवर्गाच्या पुरवठयाच्या बाबतीत, वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या अशा पुरवठयाचा प्राप्तकर्ता म्हणून प्रत्यावर्ती आकारावर आधारित कर प्रदान करतील अशा नोंदणीकृत व्यक्तींचा वर्ग विर्िनदिष्ट करता येईल, आणि वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या अशा पुरवठयाच्या संबंधातील कर प्रदान करण्यासाठी जणू काही ती व्यक्ती पात्र आहे असे समजून अशा प्राप्तकत्र्याला या अधिनियमाच्या सर्व तरतुदी लागू होतील. ".

५. मुख्य अधिनियमाच्या कलम १० मध्ये,—

(क) पोट-कलम (१) मधील,—

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १० ची सुधारणा.

(एक) " तिच्याकडून देय असलेल्या कराऐवजी, विहित करण्यात येईल अशा दराने परिगणित केलेली, परंतु पुढील मर्यादांपेक्षा अधिक नसेल अशी रक्कम " या मजकुराऐवजी, " कलम ९ च्या पोट-कलम (१) अन्वये तिच्याकडून देय असलेल्या कराऐवजी, विहित करण्यात येईल अशा दराने परिगणित केलेली, परंतु पुढील मर्यादांपेक्षा अधिक नसेल अशी कराची रक्कम " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) परंतुकामधील, " एक कोटी रुपयांपेक्षा " या मजकुराऐवजी, " एक कोटी पन्नास लाख रुपयांपेक्षा " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(तीन) परंतुकानंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :—

" परंतु आणखी असे की, खंड (क) किंवा खंड (ख) किंवा खंड (ग) अन्वये कर भरण्याचा पर्याय निवडणाया व्यक्तीस, मागील वित्तीय वर्षामधील राज्यातील उलाढालीच्या दहा टक्के किंवा पाच लाख रुपये, यांपैकी जी जास्त असेल, इतक्या रकमेपेक्षा अधिक नसलेल्या मूल्याच्या सेवांचा (अनुसूची दोनच्या परिच्छेद ६ याच्या खंड (ख) मध्ये र्िनदिष्ट करण्यात आले असेल ते खेरीज करून अन्य) पुरवठा करता येईल. " ;

(ख) पोट-कलम (२) मधील, खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :—

" (क) पोट-कलम (१) मध्ये तरतूद करण्यात आली असेल ते खेरीज करून, सेवांचा पुरवठा करणारी नसेल ; ".

६. मुख्य अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (२) च्या खंड (क) मध्ये, " च्या पोट-कलम (१) " हा मजकूर वगळण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १२ ची सुधारणा.

७. मुख्य अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (२) मध्ये " च्या पोट-कलम (२) " हा मजकूर ज्या दोन ठिकाणी आला आहे त्या दोन्ही ठिकाणी तो वगळण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १३ ची सुधारणा.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४०

८. मुख्य अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (२) मध्ये,----

(क) खंड (ख) मधील, स्पष्टीकरणाऐवजी, पुढील स्पष्टीकरण दाखल करण्यात येईल :-----

'' स्पष्टीकरण.----- या खंडाच्या प्रयोजनार्थ,

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १६ ची सुधारणा.

(एक) पुरवठादाराने वस्तूंची वाहतूक करण्यापूर्वी किंवा त्यांच्या वाहतुकीच्यावेळी एकतर त्या वस्तूंच्या मालकी हक्कासंबंधीच्या दस्तऐवजांचे हस्तांतरण करून किंवा अन्यथा, नोंदणीकृत व्यक्तीच्या- -मग ती अभिकर्ता म्हणून किंवा अन्य रीतीने कार्य करीत असो--निदेशावरून एखाद्या प्राप्तकत्र्याला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला त्या वस्तूंची पोचवणी केली असेल त्याबाबतीत,

(दोन) पुरवठादाराने, नोंदणीकृत व्यक्तीच्या निदेशावरून आणि तिच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला सेवा पुरविल्या असतील त्याबाबतीत,

अशा नोंदणीकृत व्यक्तीला त्या वस्तू किंवा, यथास्थिति, सेवा प्राप्त झाल्या आहेत, असे मानण्यात येईल. " ;

(ख) खंड (ग) मधील, '' कलम ४१ " या मजकुराऐवजी, '' कलम ४१ किंवा कलम ४३क " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

९. मुख्य अधिनियमाच्या कलम १७ मध्ये,------

(क) पोट-कलम (३) मध्ये, पुढील स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात येईल :-----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १७ ची सुधारणा.

'' स्पष्टीकरण.---- या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ '' करमाफ पुरवठयाचे मूल्य " या शब्दप्रयोगात, अनुसूची तीनच्या ५ व्या परिच्छेदात विर्िनदिष्ट केलेले असतील ते व्यवहार खेरीज करून, त्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेल्या इतर व्यवहारांच्या किंवा संव्यवहारांच्या मूल्याचा समावेश होणार नाही.";

(ख) पोट-कलम (५) मधील, खंड (क) आणि (ख) यांऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येतील :--

'' (क) (चालकासह) तेरा व्यक्तींपेक्षा अधिक नाही इतकी मान्य आसन क्षमता असणारी, व्यक्तींच्या वाहतुकीची मोटार वाहने मात्र, याचा वापर पुढील बाबतीत करपात्र पुरवठयासाठी केला असेल त्या व्यतिरिक्त,----

(क) अशा मोटार वाहनांचा आणखी पुरवठा करण्यासाठी ; किंवा

(ख) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी ; किंवा

(ग) अशी मोटार वाहने चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ;

(कक) जलयाने आणि विमाने मात्र, अशी जलयाने किंवा विमाने याचा वापर पुढील बाबतीत केला असेल त्या व्यतिरिक्त,----

(एक) पुढील करपात्र पुरवठयांसाठी म्हणजे :----

(क) असा जलयानांचा किंवा विमानांचा आणखी पुरवठा करण्यासाठी ; किंवा

(ख) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी ; किंवा

(ग) अशा जलयानांच्या नौवहनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ; किंवा

(घ) अशा विमानांचे, हवाई उड्डाण करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ;

(दोन) वस्तूंच्या वाहतुकीसाठी ;

(कख) खंड (क) किंवा खंड (कक) मध्ये र्िनदिष्ट केलेली मोटार वाहने, जलयाने किंवा विमाने यांच्याशी संबंधित असतील तेथवर सर्वसाधारण विमा, संधारणे, दुरुस्ती व देखभाल सेवा :

परंतु, अशा सेवांच्या संबंधातील निविष्टी कराची जमा रक्कम पुढील बाबतीत उपलब्ध असेल म्हणजे :-----

(एक) खंड (क) किंवा खंड (कक) मध्ये र्िनदिष्ट केलेली मोटार वाहने, जलयाने किंवा विमाने, त्यांत विर्िनदिष्ट केलेल्या प्रयोजनांसाठीच वापरली असतील त्याबाबतीत ;

(दोन) जेथे करपात्र व्यक्तीस प्राप्त सेवा--महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० ५ (एक) अशी मोटार वाहने, जलयाने किंवा विमाने यांच्या र्िनमितीत ; किंवा

(दोन) तिने विमा उतरवलेली अशी मोटारवाहने, जलयाने किंवा विमाने यांच्या संबंधातील सर्वसाधारण विमा सेवांचा पुरवठा याबाबत ;

(ख) पुढील वस्तूंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा :----

(एक) अन्न व पेये, बा खाद्यपेय व्यवस्था, सौंदर्योपचार, आरोग्य सेवा, सौंदर्यप्रसाधने आणि सुघटन शल्य चिकित्सा (प्लॅस्टिक सर्जरी), खंड (क) किंवा खंड (कक) मध्ये र्िनदिष्ट केलेली मोटार वाहने, जलयाने किंवा विमाने, त्यांत विर्िनदिष्ट केलेल्या प्रयोजनांसाठी वापरली असतील तेव्हा ते खेरीज करून ती भाडेपटयाने देणे, भाडयाने देणे किंवा किरायाणे देणे, आयर्ुविमा आणि आरोग्य विमा :

परंतु, एखाद्या नोंदणीकृत व्यक्तीने अशा वस्तूंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा आवक पुरवठा हा, एकाच प्रवर्गातील वस्तूंचा किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा जावक करपात्र पुरवठा करण्यासाठी किंवा करपात्र संयुक्त किंवा मिश्र घटकांच्या पुरवठयासाठी वापरला असेल त्याबाबतीत अशा वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या संबंधातील निविष्टी कराची जमा रक्कम उपलब्ध असेल ;

(दोन) क्लब, आरोग्य व स्वास्थ्य केंद्राचे सदस्यत्व ; आणि

(तीन) रजा किंवा स्वग्राम प्रवास सवलत यांसारख्या सुटीवर असलेल्या कर्मचायांना देण्यात येणारे प्रवासाचे लाभ :

परंतु, अशा वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या संबंधातील निविष्ट कराची जमा रक्कम ही, जेथे त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये एखाद्या नियोक्त्याने आपल्या कर्मचारी वर्गाला ते लाभ देणे त्याच्यावर बंधनकारक असेल तेथे उपलब्ध असेल. " .

१०. मुख्य अधिनियमाच्या कलम २० च्या स्पष्टीकरणामधील, खंड (ग) मध्ये, '' नोंद ८४ अन्वये " या मजकुराऐवजी, '' नोंदी ८४ आणि ९२क अन्वये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

११. मुख्य अधिनियमाच्या कलम २२ मध्ये,----

(क) पोट-कलम (१) मधील, परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २० ची सुधारणा. सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २२ ची सुधारणा.

'' परंतु आणखी असे की, शासनास, विशेष प्रवर्गातील राज्याच्या विनंतीवरून आणि परिषदेच्या शिफारशीवरून, पहिल्या परंतुकामध्ये र्िनदिष्ट केलेली एकूण दहा लाखांच्या उलाढालीची अशी रक्कम ही वीस लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल इतकी अधिसूचित करण्यात येईल अशा शर्ती व मर्यादांच्या अधिनतेने, वाढविता येईल . " ;

(ख) स्पष्टीकरणाच्या खंड (तीन) मध्ये, '' संविधानाच्या " या मजकुराच्या अगोदर, '' जम्मू व काश्मीर राज्य आणि अरूणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम व उत्तराखंड राज्ये खेरीजकरून " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

१२. मुख्य अधिनियमाच्या कलम २४ मधील, खंड (दहा) मध्ये, '' प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वाणिज्य प्रचालक '' या मजकुराअगोदर, '' ज्याने कलम ५२ अन्वये मूळ स्रोतातून कर गोळा करणे आवश्यक आहे असा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २४ ची सुधारणा.

१३. मुख्य अधिनियमाच्या कलम २५ मध्ये,-----

(क) पोट-कलम (१) मधील, परंतुकानंतर आणि स्पष्टीकरणाच्या अगोदर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २५ ची सुधारणा.

२००५ चा २८.

'' परंतु आणखी असे की, विशेष र्आथिक क्षेत्रामध्ये, विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम, २००५ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे युनिट असणाया व्यक्तीस किंवा विशेष र्आथिक क्षेत्राचा विकासक म्हणून असणाया व्यक्तीस, त्याच राज्यात विशेष र्आथिक क्षेत्राबाहेर स्थित असणाया त्याच्या धंद्याच्या ठिकाणापासून वेगळे युनिट असल्यास, स्वतंत्र नोंदणीकरिता अर्ज करावा लागेल . '' ;

भाग चार—९८–२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० (ख) पोट-कलम (२) मधील परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :----

'' परंतु, राज्यात धंद्याची बहुविध ठिकाणे असणाया व्यक्तीस, धंद्याच्या अशा प्रत्येक ठिकाणाकरिता, विहित करण्यात येईल अशा शतर्ींना अधीन राहून, स्वतंत्र नोंदणी मंजूर करण्यात येईल . '' .

१४. मुख्य अधिनियमाच्या कलम २९ मध्ये ,-----

(क) समास टीपेमधील '' रद्द करणे '' या मजकुरानंतर '' किंवा निलंबित करणे '' हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

सन् २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २९ ची सुधारणा.

(ख) पोट-कलम (१) मधील, खंड (ग) नंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :----

'' परंतु, नोंदणीकृत व्यक्तीने दाखल केलेली नोंदणी रद्द करण्याच्या संबंधातील कार्यवाही प्रलंबित असताना, विहित करण्यात येईल अशा कालावधीसाठी आणि अशा रीतीने, नोंदणी निलंबित करण्यात येईल . '' ;

(ग) पोट-कलम (२) मध्ये, परंतुकानंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :—

" परंतु आणखी असे की, नोंदणी रद्द करण्यासंबंधीची कार्यवाही प्रलंबित असताना, समुचित अधिकायास, विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा कालावधीसाठी ती नोंदणी निलंबित करता येईल.".

१५. मुख्य अधिनियमाच्या कलम ३४ मधील,---

(क) पोट-कलम (१) मध्ये,---

(एक) " जेथे कराचे बीजक देण्यात येते " या मजकुराऐवजी, " जेथे कराची एक किंवा अधिक सन् २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३४ ची सुधारणा. बीजके देण्यात येतात " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) " नोंदणीकृत व्यक्तीला, याबाबतीत विहित केल्याप्रमाणे अशा तपशिलांचा अंतर्भाव असलेले जमापत्र प्राप्तकत्र्यास देता येईल " या मजकुराऐवजी, " नोंदणीकृत व्यक्तीस विहित करण्यात येईल अशा तपशिलाचा अंतर्भाव असलेली वित्तीय वर्षात केलेल्या पुरवठयांची एक किंवा अधिक जमापत्रे प्राप्तकत्र्याला देता येतील " हा मजकूर त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह दाखल करण्यात येईल ;

(ख) पोट-कलम (३) मध्ये,----

(एक) " जेथे कराचे बीजक देण्यात येते " या मजकुराऐवजी, " जेथे कराची एक किंवा अधिक बीजके देण्यात येतात " हा मजकूर त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह दाखल करण्यात येईल ;

(दोन) " नोंदणीकृत व्यक्तीला याबाबतीत विहित केल्याप्रमाणे अशा तपशिलांचा अंतर्भाव असलेले नावेपत्र प्राप्तकत्र्यास देता येईल " या मजकुराऐवजी, " नोंदणीकृत व्यक्तीस विहित करण्यात येईल अशा तपशिलांच्या अंतर्भाव असलेली, वित्तीय वर्षात केलेल्या पुरवठयांची एक किंवा अधिक नावेपत्रे प्राप्तकत्र्याला देता येतील " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

१६. मुख्य अधिनियमाच्या कलम ३५च्या पोट-कलम (५) मध्ये, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :------

सन् २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३५ ची सुधारणा.

" परंतु, या पोट-कलमात अंतभर्ूत असलेली कोणतीही गोष्ट, ज्यांची लेखापुस्तके भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षकाकडून किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायाद्यान्वये स्थानिक प्राधिकरणाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षा करण्याच्या अधीन असतील, अशा केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही विभागास लागू होणार नाही. ".

१७. मुख्य अधिनियमाच्या कलम ३९ मधील,---

(क) पोट-कलम (१) मध्ये,----

(एक) " अशा कॅलेंडर महिन्याच्या किंवा त्याच्या भागाच्या लगतनंतरच्या महिन्याच्या विसाव्या सन् २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३९ ची सुधारणा. दिवशी किंवा त्यापूर्वी " हा मजकूर वगळण्यात येईल ;

(दोन) " विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा रीतीने " या मजकुराऐवजी, " विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, अशा रीतीने आणि अशा कालावधीच्या आत " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० ७

(तीन) पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :— " परंतु, राज्य शासनास, परिषदेच्या शिफारशींवरून नोंदणीकृत व्यक्तींचे विवक्षित वर्ग अधिसूचित करता येतील. अशा नोंदणीकृत व्यक्ती त्यामध्ये विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा शर्ती व संरक्षक उपाययोजनांना अधीन राहून, प्रत्येक तिमाहीचे किंवा त्याच्या भागाचे विवरण सादर करतील. " ; (ख) पोट-कलम (७) मध्ये, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :---

" परंतु, राज्य शासनास परिषदेच्या शिफारशींवरून, नोंदणीकृत व्यक्तींचे विवक्षित वर्ग अधिसूचित करता येतील. अशा नोंदणीकृत व्यक्ती, त्यामध्ये विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा शतर्ींना व संरक्षक उपाययोजनांना अधीन राहून, ज्या दिनांकास त्या नोंदणीकृत व्यक्तींनी असे विवरण दाखल करणे आवश्यक आहे, त्या दिनांकास किंवा त्यापूर्वी विवरणाप्रमाणे देय असलेला कर किंवा त्याचा भाग शासनाकडे भरतील. " ;

(ग) पोट-कलम (९) मध्ये,----

(एक) " अशी वगळणूक किंवा चुकीचा मजकूर जेव्हा तिच्या निदर्शनास आला असेल त्या महिन्याच्या किंवा, यथास्थिति, तिमाहीच्या दाखल करावयाच्या विवरणात " या मजकुराऐवजी, " विहित करण्यात येईल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) परंतुकामधील, " वित्तीय वर्ष समाप्त झाल्यानंतरच्या " या मजकुराऐवजी, " असे तपशील ज्या वित्तीय वर्षाशी संबंधित आहेत, ते वित्तीय वर्ष समाप्त झाल्यानंतरच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

१८. मुख्य अधिनियमाच्या कलम ४३ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :—

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ यामध्ये कलम ४३क समाविष्ट करणे.

"४३क. (१) कलम १६ चे पोट-कलम (२), कलम ३७ किंवा कलम ३८ यामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, प्रत्येक नोंदणीकृत व्यक्ती, कलम ३९ चे पोट-कलम (१) अन्वये दाखल केलेल्या विवरणात, पुरवठादाराने दाखल केलेल्या पुरवठयाच्या तपशिलांची पडताळणी करील, ते विधिग्रा करील, त्यांत दुरुस्ती करील किंवा ते वगळील.

विवरण दाखल करण्याची कार्यपद्धती आणि उपयोगात आणलेली निविष्टी कराची जमा रक्कम.

(२) कलम ४१, कलम ४२ किंवा कलम ४३ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, प्राप्तकत्र्याकडून निविष्टी कराच्या जमा रकमेच्या उपयोगाची व त्याबाबतच्या पडताळणीची कार्यपद्धती विहित करण्यात येईल, त्याप्रमाणे असेल.

(३) प्राप्तकत्र्याद्वारे निविष्टी कराच्या जमा रकमेचा उपयोग करण्याच्या प्रयोजनासाठी पुरवठादाराने जावक पुरवठयांचे तपशील दाखल करण्याची सामाईक पोर्टलवरील कार्यपद्धती विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.

(४) पोट-कलम (३) अंतर्गत न पुरविलेल्या जावक पुरवठयाच्या संबंधातील निविष्टी कराच्या जमा रकमेचा उपयोग करून घेण्याची कार्यपद्धती विहित करण्यात येईल आणि अशा कार्यपद्धती मध्ये उक्त पोट- कलमान्वये पुरवठादारांनी सादर केलेल्या तपशिलांच्या आधारे, निविष्टी कराच्या जमा रकमेचा लाभ घेता येऊ शकेल, ते लाभ उपलब्ध निविष्टी कराच्या जमा रकमेच्या कमाल वीस टक्यांहून अधिक असणार नाही, याचा अंतर्भाव असेल.

(५) पोट-कलम (३) अन्वये पुरवठादाराने जावक पुरवठयामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या ज्या कराच्या रकमेसाठी तपशील सादर केले आहेत, ती कराची रक्कम अधिनियमाच्या तरतुदींअन्वये त्यास देय कर असल्याचे मानण्यात येईल.

(६) पोट-कलम (३) किंवा पोट-कलम (४) अन्वये ज्यासाठी तपशील दाखल केले आहेत, परंतु त्याचे विवरणपत्र सादर केलेले नाही अशा जावक पुरवठयाच्या बाबतीतील कर भरण्यासाठी किंवा, यथास्थिति, उपयोगात आणलेली निविष्टी कराची जमा रक्कम भरण्यासाठी पुरवठादार व प्राप्तकर्ता संयुक्तपणे व पृथकपणे पात्र असतील.

(७) पोट-कलम (६) च्या प्रयोजनार्थ, विहित करण्यात येईल अशा रीतीने वसुली करण्यात येईल आणि एक हजार रुपयांपेक्षा अधिक नाही अशा, वसूल न झालेल्या कराच्या रकमेसाठी किंवा चुकीने उपयोगात आणलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेसाठी अशा कार्यपद्धतीत तरतूद करता येईल.

भाग चार—९८–२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० (८) जावक पुरवठयाच्या संबंधातील कराच्या रकमेची कार्यपद्धती, सुरक्षितता आणि मर्यादा यांबाबतचे तपशील हे, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे,---

(एक) नोंदणी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत ;

(दोन) जिने कराचे प्रदान करण्यात कसूर केली असेल आणि जेथे अशी कसूर केलेली रक्कम प्रदान करण्याच्या नियत दिनांकापासून दोन महिन्यांपेक्षा अधिक असेल अशा कालावधीसाठी अशी कसूर करण्याचे चालू ठेवले असेल तेथे,

अशा नोंदणीकृत व्यक्तीला पोट-कलम (३) अन्वये सादर करता येतील.".

१९. मुख्य अधिनियमाच्या कलम ४८ च्या पोट-कलम (२) मध्ये, " कलम ४५ अन्वये विवरण दाखल करण्यासाठी " या मजकुरानंतर, " आणि अशी इतर कार्ये पार पाडण्यासाठी " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ४८ ची सुधारणा.

२०. मुख्य अधिनियमाच्या कलम ४९ मध्ये,---

(क) पोट-कलम (२) मध्ये, " कलम ४१ " या मजकुराऐवजी, " कलम ४१ किंवा कलम ४३क " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ४९ ची सुधारणा.

(ख) पोट-कलम (५) मध्ये,---

(एक) खंड (ग) मध्ये, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :---

" परंतु, जेथे केंद्रीय करासंबंधातील निविष्टी कराच्या जमा रकमेची शिल्लक रक्कम ही एकात्मिक कराच्या प्रदानासाठी उपलब्ध नसेल तेथेच फक्त राज्य कराच्या संबंधातील निविष्टी कराची जमा रक्कम ही, एकात्मिक कराच्या प्रदानासाठी वापरण्यात येईल ; " ;

(दोन) खंड (घ) मध्ये, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :---

" परंतु, जेथे केंद्रीय करासंबंधातील निविष्टी कराच्या जमा रकमेची शिल्लक रक्कम ही, एकात्मिक कराच्या प्रदानासाठी उपलब्ध नसेल तेथेच फक्त संघ राज्यक्षेत्र कराच्या संबंधातील निविष्टी कराची जमा रक्कम ही, एकात्मिक कराचे प्रदान करण्यासाठी वापरण्यात येईल ; ".

२१. मुख्य अधिनियमाच्या कलम ४९ नंतर, पुढील कलमे समाविष्ट करण्यात येतील :---

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ यामध्ये कलमे ४९क आणि ४९ख समाविष्ट करणे.

" ४९क. कलम ४९ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, एकात्मिक करासंबंधातील उपलब्ध निविष्टी कराची जमा रक्कम प्रथमत: अशा प्रदानासाठी पूर्णपणे वापरल्यानंतरच फक्त राज्य करासंबंधातील निविष्टी कराची जमा रक्कम ही, एकात्मिक कराच्या किंवा, यथास्थिति, राज्य कराच्या प्रदानासाठी वापरण्यात येईल.

विवक्षित शतर्ींच्या अधीन राहून निविष्टी कराच्या जमा रकमेचा वापर करणे.

निविष्टी कराच्या जमा रकमेच्या वापराचे क्रम.

४९ख. या प्रकरणात काहीही अंतभर्ूत असले तरी आणि कलम ४९ च्या पोट-कलम (५) च्या खंड (ङ) आणि खंड (च) च्या तरतुदींच्या अधीन राहून, राज्य शासनास, परिषदेच्या शिफारशीवरून, अशा कोणत्याही कराच्या प्रदानासाठी एकात्मिक कर, केंद्रीय कर, राज्य कर किंवा, यथास्थिती, संघ राज्यक्षेत्र कर यासंबंधातील निविष्टी कराच्या जमा रकमेच्या वापराचा क्रम आणि त्याची रीत विहित करता येईल.".

२२. मुख्य अधिनियमाच्या कलम ५२ मध्ये, पोट-कलम (९) मधील, " कलम ३७ " या मजकुराऐवजी, " कलम ३७ किंवा कलम ३९ " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५२ ची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० ९

२३. मुख्य अधिनियमाच्या कलम ५४ मध्ये,----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५४ ची सुधारणा.

(क) पोट-कलम (८) च्या खंड (क) मध्ये, " शुन्याधारित पुरवठयावर " आणि " असा शुन्याधारित पुरवठा " या मजकुराऐवजी, अनुक्रमे " निर्यातीवर " आणि " अशा निर्याती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) स्पष्टीकरणाच्या, खंड (२) मध्ये,----

(एक) उप-खंड (ग) च्या बाब (एक) मध्ये, " विनिमययोग्य विदेशी चलनामध्ये " या मजकुरानंतर, " किंवा जेथे भारतीय रिझव्र्ह बँकेकडून परवानगी दिली असेल तेथे भारतीय रुपयांमध्ये, " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (ङ) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :----

" (ङ) पोट-कलम (३) च्या पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये न वापरलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेच्या परताव्याच्या बाबतीत, ज्या कालावधीत असा परताव्यासाठीचा दावा उद्भवेल त्या कालावधीचे कलम ३९ अन्वये विवरण सादर करण्याचा नियत दिनांक ; ".

२४. मुख्य अधिनियमाच्या कलम ७९ मध्ये, पोट-कलम (४) नंतर, पुढील स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ७९ ची सुधारणा.

" स्पष्टीकरण.---- या कलमाच्या प्रयोजनार्थ, व्यक्ती यामध्ये, कलम २५ च्या पोट-कलम (४) किंवा, यथास्थिति, पोट-कलम (५) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे " भिन्न व्यक्ती " यांचा समावेश होतो.".

२५. मुख्य अधिनियमाच्या कलम १०७ याच्या पोट-कलम (६) च्या खंड (ख) मध्ये, " विवादग्रस्त कराच्या " या मजकुरानंतर, " , पंचवीस कोटी रुपये या कमाल रकमेस अधीन राहून, " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १०७ ची सुधारणा.

२६. मुख्य अधिनियमाच्या कलम ११२ मधील, पोट-कलम (८) च्या खंड (ख) मध्ये, " विवादास्पद कराच्या " या मजकुरानंतर, " पंचवीस कोटी रुपये या कमाल रकमेस अधीन राहून, " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ११२ ची सुधारणा.

२७. मुख्य अधिनियमाच्या कलम १२९ च्या पोट-कलम (६) मध्ये आणि परंतुकामध्ये, " सात दिवस " या मजकुराऐवजी, " चौदा दिवस " असा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १२९ ची सुधारणा.

२८. मुख्य अधिनियमाच्या कलम १४३ मध्ये, पोट-कलम (१) च्या खंड (ख) मधील, परंतुकानंतर, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :----

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १४३ ची सुधारणा.

" परंतु आणखी असे की, आयुक्तास, पुरेसे कारण दाखवून देण्यात आल्यावर एक वर्षाचा आणि तीन वषार्ंचा कालावधी अनुक्रमे एक वर्षापेक्षा किंवा दोन वषार्ंपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी आणखी वाढविता येईल. ".

२९. मुख्य अधिनियमाच्या अनुसूची एक मधील परिच्छेद ४ मध्ये, " करपात्र व्यक्तीने " या मजकुराऐवजी, " व्यक्तीने " असा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या अनुसूची एक ची सुधारणा.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४०

३०. मुख्य अधिनियमाच्या अनुसूची दोनच्या शीर्षकामध्ये, " व्यवहार " या मजकुराऐवजी, " कार्ये किंवा व्यवहार " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, १ जुलै २०१७ पासून नेहमीच समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या अनुसूची दोन ची सुधारणा.

३१. मुख्य अधिनियमाच्या अनुसूची तीन मध्ये,----

(एक) परिच्छेद ६ नंतर, पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येतील :----

" ७. भारतामध्ये वस्तू न आणता, भारताबाहेरील एखाद्या ठिकाणाहून भारताबाहेरील दुसया ठिकाणी होणारा वस्तूंचा पुरवठा.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ याच्या अनुसूची तीन ची सुधारणा.

८. (क) अंतर्देशीय वापराकरिता वटवणी देण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला वखारीतील वस्तूंचा केला जाणारा पुरवठा ;

(ख) भारताबाहेर स्थित असलेल्या मूळ बंदराहून वस्तूंची पाठवणी करण्यात आल्यानंतर परंतु, अंतर्देशीय वापराकरिता वटवणी करण्यापूर्वी, वस्तूंच्या मालकीहक्कांसंबंधीच्या दस्तऐवजाचे पृष्ठांकन करून त्याद्वारे, मालप्रेषितीकडून इतर कोणत्याही व्यक्तीला होणारा वस्तूंचा पुरवठा." ;

(दोन) विद्यमान स्पष्टीकरणाला स्पष्टीकरण १ असा नवीन क्रमांक देण्यात येईल आणि अशा प्रकारे नवीन क्रमांक देण्यात आलेल्या स्पष्टीकरण १ नंतर, पुढील स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात येईल :---

" स्पष्टीकरण-२.---- परिच्छेद ८ च्या प्रयोजनांसाठी, " वखारीतील वस्तू " या शब्दप्रयोगास, १९६२ चा ५२.

सीमाशुल्क अधिनियम, १९६२ मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल.".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४० ११

निवेदन

महाराष्ट्र शासनाने वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या राज्यांतर्गत पुरवठयावर कराची आकारणी व तो कर गोळा करण्याची तरतूद करण्याच्या हेतूने, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) अधिनियमित केला आहे.

२. त्या अधिनियमात विद्यमान करदात्यांचे नवीन वस्तू व सेवा कर पद्धतीत सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी विवक्षित तरतुदी केल्या आहेत. तथापि, नवीन कर पद्धतीस काही समस्यांचा सामना करावा लागला होता. करदात्यांना विशेषत: लघु व मध्यम उद्योजकांना आलेल्या अडचणींपैकी प्रमुख अडचण म्हणजे वस्तू व सेवा करविषयक कायद्यांन्वये विवरण दाखल करण्याची व कर प्रदान करण्याची प्रक्रिया ही होती. या संदर्भात, प्रस्तावित नवीन विवरण दाखल करण्याच्या पद्धतीमध्ये, कागदी प्रक्रिया कमीत कमी करण्याबरोबरच, लहान करदात्यांसाठी तिमाही विवरण दाखल करण्यांचे व कर प्रदान करण्याचे अभिप्रेत केले आहे. नवीन विवरण दाखल करण्याच्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच, वरील अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे ;

३. प्रस्तावित महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०१८ यामध्ये, इतर गोष्टींबरोबर पुढील तरतुदी केल्या आहेत :-----

(एक) पुरवठयाची व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी अधिनियमाच्या कलम ७ ची सुधारणा करणे ;

(दोन) अनोंदणीकृत पुरवठादारांकडून वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या विवक्षित विर्िनदिष्ट प्रवर्गातील पुरवठा प्राप्त करण्याच्या बाबतीत, प्रत्यावर्ती आकाराच्या आधारावर कर प्रदान करण्याकरिता नोंदणीकृत व्यक्तींचे प्रवर्ग अधिसूचित करण्याबाबत राज्य शासनाला अधिकार प्रदान करण्यासाठी, अधिनियमाच्या कलम ९ची सुधारणा करणे ;

(तीन) आपसमेळ कर आकारणीची मर्यादा एक कोटी रुपयांवरुन एक कोटी पन्नास लाख रुपयांपयर्ंत वाढविता यावी यासाठी अधिनियमाच्या कलम १० ची सुधारणा करणे ;

(चार) निविष्टी कराच्या जमा रकमेची व्याप्ती विर्िनदिष्ट करण्यासाठी, अधिनियमाच्या कलम १७ ची सुधारणा करणे ;

(पाच) विशेष प्रवर्गातील राज्यांमधील नोंदणीची सूट मर्यादा ही, दहा लाख रुपयांवरुन वीस लाख रुपयांइतकी वाढविण्याच्या तरतुदीच्या अनुशंगाने अधिनियमाच्या कलम २२ ची सुधारणा करणे ;

(सहा) एकाच राज्यात स्थित असलेल्या धंद्याच्या विविध ठिकाणांसाठी बहुविध नोंदणी प्राप्त करण्याचा पर्याय देण्याकरिता करदात्याला सोयीस्कर व्हावे, आणि विशेष र्आथिक क्षेत्र युनिट किंवा विकासक यांच्या स्वतंत्र नोंदणीची तरतूद करता यावी यांसाठी अधिनियमाच्या कलम २५ची सुधारणा करणे ;

(सात) नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू असताना, नोंदणी तात्पुरती निलंबित करण्याची तरतूद समाविष्ट करता यावी म्हणून अधिनियमाच्या कलम २९ ची सुधारणा करणे ;

(आठ) विवरण दाखल करण्याच्या नवीन पद्धतीची आणि निविष्ट कराची जमा रक्कम वापरण्याची तरतूद करता यावी म्हणून, नवीन कलम ४३क समाविष्ट करणे ;

(नऊ) अपील दाखल करण्यासाठी देय असलेल्या पूर्व ठेवीची रक्कम पंचवीस कोटी रुपये इतकी असेल, अशी तरतूद करता यावी यासाठी अपिलाशी सबंधित, अधिनियमाच्या कलम १०७ च्या पोट- कलम (६) ची सुधारणा करणे ;

(दहा) मार्गस्थ असताना वस्तूंच्या स्थानबद्धतेशी किंवा ताब्यात घेण्याशी आणि त्यांच्या वाहतुकीशी संबंधित कालावधीत सात दिवस ते चौदा दिवसांपयर्ंत वाढ करता यावी म्हणून अधिनियमाच्या कलम १२९ ची सुधारणा करणे ;

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०१८/आशि्वन २१, शके १९४०

४. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; आणि म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,

चे. विद्यासागर राव,

दिनांक १३ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

यु. पी. एस. मदान,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.