Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सोलापूर व सातारा जिल्हा परिषदेचा सन 2017-2018 चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्धीबाबतची अधिसूचना.

Published 18 October 2018

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक- अ - पुणे विभागीय पुरवणी

[ पृष्ठ १ वर्ष- ७ , अंक १८ ] गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १८ २४ , २०१८ / आश्विन २६ ते कार्तिक २ , शके १९४०

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक जिपसो/साप्रवि-१/सनिक/ कार्या-१३/२२९/ २ ९ १०/२०१८.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ (४) खाली शासनाने वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणेसंबंधीचे सुधारित नियम, १ ९ ८१ तयार केले आहे . त्याला अनुसरून मा . उपसचिव , ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संगणक/१० ९ ५/सीआर-२ ९ ५४/५७ , मुंबई, दिनांक २४ जानेवारी १ ९९ ५ च्या परिपत्रकास अनुसरून संगणकाद्वारे तयार करण्यात आलेल्या सुधारित तक्त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने सन २०१७-१८ चा वार्षिक प्रशासन अहवाल तयार केला आहे . दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने प्रस्तुतचा ठराव क्रमांक १६६ अन्वये मंजुरी दिलेली आहे .

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम १ ९ ६४ मधील नियम क्रमांक ९ अन्वये सदरहू अहवाल प्रसिद्ध केलेचे माहितीसाठी जाहीर करीत आहोत.

डॉ. राजेंद्र भारूड,

भा.प्र.से,

मुख्य कार्यकारी अधिकारी , सोलापूर , ९ ऑक्टोबर २०१८ .

जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा सोलापूर .

अधिसूचना

क्रमांक नियो-१ /कावि/वाप्रअ/१६८/२०१८. - महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ च्या कलम १४२ चे आधारे महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण विकास विभागाकडील क्रमांक झेडपीआर- ४७६३-४०४८६-पी , दिनांक ४ सप्टेंबर १ ९ ६४ ने ठरवून दिलेल्या व पुन्हा क्रमांक झेडपीआर-४७६६-३२३९ ३- पी, दिनांक ३ नोव्हेंबर १ ९ ६६ ने सुधारणा करून दिलेल्या तसेच महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक एएआर-१०७९ ( ६७६) -२६ , दिनांक १२ नोव्हेंबर १ ९ ८१ ने पुन्हा सुधारून ठरवून दिलेल्या नियमानुसार सातारा जिल्हा परिषदेचा सन २०१७-२०१८ सालचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून प्रसिद्ध करणेत येत आहे .

सन २०१७-२०१८ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल नियमाप्रमाणे तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला होता . त्यास जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक १ ९ ५ अन्वये मान्यता दिलेली आहे . महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम १ ९ ६४ च्या नियम ९ अन्वये सदर अहवाल प्रसिद्ध झाला असे या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येत आहे .

डॉ. कैलास बा . शिंदे ,

मुख्य कार्यकारी अधिकारी , सातारा , १२ ऑक्टोबर २०१८.

सातारा जिल्हा परिषद , जिल्हा सातारा .

एच-३८१ , भाग एक-अ (पु.वि.पु. )- १८

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE -411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.