Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ext. 61 (23rd October 2018) ठाणे जिल्हा परिषदेला डिसेंबर 2017 रोजी निवडूण आलेल्या सदस्याची पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूका करण्याबाबत

Published 23 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २३, २०१८/कर्ातिक १, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ४४] मंगळवार, ऑक्टोबर २३, २०१८/कर्ातिक १, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ६१

प्राधिकृत प्रकाशन

पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून

वाचा.---- शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

आदेश

क्रमांक गृह/क-१/टे-३/जिप/विकाअ/कावि-३०९०३(५३)/२०१८.------उपोद्घातील शासन निर्णय अ.क्र. (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे खालील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या डिसेंबर, २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संबंधित निवडणूक विभागामधून निवडून आलेल्या सदस्यांची ठाणे जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित केल्यापासून " ५ " वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासन/जिल्हादंडाधिकारी ठाणे यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्र्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----

(एक) साक्षांकनाचे काम.----विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच उपोद्घातातील शासन निर्णयामधील परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायाकिंत प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे, मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामूळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून सांक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

४. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

५. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीसाठी अपात्र ठरेल. नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा.

(१)

भाग एक (को.वि.पु.)—६१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २३, २०१८/कर्ातिक १, शके १९४०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २३, २०१८/कर्ातिक १, शके १९४० ३ अनुसूची--(चालू) ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २३, २०१८/कर्ातिक १, शके १९४० अनुसूची--(समाप्त)

ठाणे, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.

राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.