महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ४६] गुरुवार, ऑक्टोबर २५, २०१८/कर्ातिक ३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ६५
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक गृह/एमएजी-३/विशेष कार्य अधिकारी नियुक्ती/४५८२९/२०१८.----ज्याअर्थी, या कार्यालयाकडील दिनांक १५ मार्च २०१८ व दिनांक २० एप्रिल २०१८ रोजीच्या पत्रान्वये विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामधील एकूण १५ व्यक्तींच्या यादीस शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील उपोद्घातातील अ.क्र.२ कडील पत्रान्वये मान्यता दिलेली आहे.
त्याअर्थी, शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील उपोद्घातातील अ.क्र.१ कडील निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रायगड सोबतच्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यींची खालील अटी व शतर्ींच्या अधिनतेने " üविशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे.
(१) सदरची नियुी सामान्यत: हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्ष अथवा पुढील आदेश होईपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही कोणतेही कारण न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात तात्काळ परत करण्याची जबाबदारी सर्वस्वी विशेष कार्यकारी अधिकारी यांची राहील.
(२) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबा कृती केल्यास किंवा त्याच्याविरुद्ध गुन्ह्यची नोंद आढळल्यास त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा, कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची नियुी मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.
(३) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना सोपविण्यात आलेल्या कामाबाबत कोणतेही मानधन/ वेतन/भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत.
(४) पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. तसेच साक्षांकन करताना विहित रबरी शिक्यासह सही करून सही खाली दिनांक नमूद करणे बंधनकारक राहील.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २५, २०१८/कर्ातिक ३, शके १९४०(६) पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीला त्याच्या घरावर/ दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह विशेष कार्यकारी अधिकारी असा फलक लावणे बंंधनकारक आहे. तथापि, विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढणे बंधनकारक आहे. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये.
(७) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी ओळख परेड तसेच मृत्यपूर्व जबानी यासाठी उपस्थित राहता येणार नाही.
(८) विशेष कार्यकारी अधिकारी यांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही.
(९) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचा नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अनुसूची
अ.क्र. उमेदवाराचे नाव (१) (२)
१ श्री. सचिन चाहू पाटील
२ श्रीम. स्वरा सचिन दुर्गे
३ श्री. सागर गौरव भोईर
४ श्री. दत्तात्रेय गोपाळ राजे
५ श्री. विश्वनाथ गणू पाटील
६ श्री. वसंत अनंता भगत
७ श्री. सुनिल चंद्रकांत पाटील
८ श्री. बिपीन प्रविण तरे
९ श्री. राकेश शंकरलाल शहा
१० श्री. आनंद बाबुराव सकपाळ
११ श्री. विनोद कृष्णा घरत
१२ श्रीम. संस्कृती सागर ओक
१३ श्री. प्रशांत नारायण म्हात्रे
१४ श्री. धनाजी रामभाऊ घरत
१५ श्री. दिनेश रामचंद्र म्हात्रे
अलिबाग,
पत्ता (३)
मु. अजिवली, पो. तळोजा, ता. पनवेल
मु. पाले खुर्द, पो. देविचापाडा, ता. पनवेल
मु. पाले खुर्द, पो. देविचापाडा, ता. पनवेल
मु. तळोजा मजकूर, पो. तळोजा, ता. पनवेल
मु. रोहिंजण, पो. तळोजा, ता. पनवेल
मु. रोहिंजण, पो. तळोजा, ता. पनवेल
मु. वाघविरा, पो. कुसुंबळे, ता. अलिबाग
रा. तन्मय एनक्लेव, जुनी पोस्ट गल्ली, पोस्ट ऑफिस जवळ, ता. अलिबाग.
रा. नेरळ, जुनी बाजारपेठ, ता. कर्जत, जि. रायगड
रा. नेरळ, गणेश नगर, ता. कर्जत, जि. रायगड
रा. खुटूकबांधण, पो. खारघर, ता. पनवेल.
रा. धामणकरवाडा, धनगरआळी, रोहा, ता. रोहा.
रा. वाशी, ता. पेण, जि.रायगड
रा. चंद्रलता कॉम्प्लेक्स, डॉ. महाजन हॉस्पीटल समोर, सी विंग-००२, चिंचपाडा, ता. पेण.
रा. वढाव, ता. पेण, जि. रायगड
डॉ. विजय सूर्यवंशी,
दिनांक ३० सप्टेंबर २०१८.
जिल्हादंडाधिकारी, रायगड.