महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक २३] मंगळवार, ऑक्टोबर ३०, २०१८/कर्ातिक ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४३
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
संदर्भ : सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ/१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
आदेश
क्रमांक गृह ३६०१/४/२०१७ विकाअ/न.पं./नाम/२०१७.------ जिल्हादंडाधिकारी, जिल्हा सिंधुदुर्ग, ह्य आदेशाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यतील, देवगड जामसंडे या नगरपंचायमधून नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षाकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तिवात राहील. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत त्यापूर्वीच संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकारी यांची राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम.----विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित मोहोर उमटणे व तारखेस स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहीणे.
३. विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ३०, २०१८/कर्ातिक ८, शके १९४०५. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह '' विशेष कार्यकारी अधिकारी '' असा फलक लावावा. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर '' विशेष कार्यकारी अधिकारी '' असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.
६. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी '' ओळख परेड '' तसेच '' मृत्यूपूर्व जबानी '' यासाठी उपस्थित राहू नये.
अनुसूची
पत्ता
नगरपंचायतीचे नाव अनु- सदस्याचे नाव क्रमांक
(१) (२)
(३)
(४) १ श्रीमती प्रियांका प्रदिप साळसकर रा. देवगड, ता. देवगड देवगड जामसंडे सिंधुदुर्गनगरी, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.
डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग.