Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I Cent. Ext. 69 (2-11-2018) माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आनंदराव देवकते यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव.

Published 02 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जून ५, २०१८/ज्येष्ठ १५, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ५६] शुक्रवार, नोव्हेंबर २, २०१८/कर्ातिक ११, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ६९

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ नोव्हेंबर २०१८

अधिसूचना

क्रमांक डीआयपी.२०१८/प्र.क्र.२३०/३०.----महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आनंदराव नारायणराव देवकते यांचे शुक्रवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सोलापूर येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण केली :---

" महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आनंदराव नारायणराव देवकते (वय ८५) यांचे शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर, २०१८ रोजी सोलापूर येथे निधन झाले. श्री. देवकते यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने राजकारणासोबतच सहकार आणि सामाजिक क्षेत्रात महवाचे योगदान देणारा नेता आपण गमावला आहे.

श्री. देवकते यांचा जन्म १६ मार्च १९३३ रोजी सोलापूर जिल्ह्यतील राजूर येथे झाला. गोवामुक्ती संग्रामात सहभाग घेणाया श्री. देवकते यांचा राजकीय प्रवास राजूरचे सरपंच ते राज्याचे मंत्री असा राहिला. १९७८ पासून सलग २५ वर्षे त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. १९९९ ते २००३ या दरम्यान राज्याचे दुग्धविकास मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. महानंदचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांची अतूट बांधिलकी निर्माण झाली होती. सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ राजकीय नेता हरपला आहे.

श्री. देवकते यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दु:ख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची ताकद कुटुंबियांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिनेश कुमार जैन, शासनाचे मुख्य सचिव.

भाग एक-(म.उ.वि.)--६९-१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.