महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १४४] शनिवार, नोव्हेंबर ३, २०१८/कर्ातिक १२, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४०८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम.
क्रमांक सीएलआर. १०१८/प्र. क्र. २७९/राउशु-३.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ मध्ये, आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम तात्काळ अंमलात आणण्यात यावेत आणि म्हणून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (१९४९ चा मुंबई २५) मधील कलम १४३ च्या पोट-कलम (३) च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीशिवाय हे नियम करण्यात यावेत, असे महाराष्ट्र शासनास वाटते.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमामधील कलम १४३ च्या पोट-कलम (२) च्या खंड (h1) च्या उपखंड (४) द्वारे प्रदान करण्यात आलेला अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ यात सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :-----
१. या नियमांना " महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ (दुसरी सुधारणा) नियम, २०१८ " असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ मधील नियम ३५ च्या उप नियम (१) ऐवजी खालील उप नियमाचा अंतर्भाव करण्यात यावा.
" (१) नमुना सीएल-३ धारण करणारा अनुज्ञप्तीधारक, सकाळी ८-०० ते रात्री १०-०० या कालावधी व्यतिरिक्त देशी मद्य विक्री करणार नाही. ".
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०१८/कर्ातिक १२, शके १९४० HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 3rd November 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA PROHIBITION ACT.
No.CLR.1018/C.R. 279/EXC-3.—Whereas, the Government of Maharashtra is satisfied that the following rules further to amend the Maharashtra Country Liquor Rules, 1973, should be brought into force at once, and therefore the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949).
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-clause (iv) of clause (h1) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Country Liquor Rules, 1973, as follows, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Country Liquor (Second Amendment) Rules, 2018.
2. In rule 35 of the Maharashtra Country Liquor Rules, 1973, for sub-rule (1), the following sub-rule shall be substituted, namely :—
"(1) A licencee holding licence in Form CL-III, shall not sell country liquor, except during the hours from 8-00 a.m. to 10-00 p.m.".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. H. WAGDE,
Joint Secretary to Government.