महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ५१(३)] बुधवार, नोव्हेंबर १४, २०१८/कर्ातिक २३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ७८
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका.
जिल्हादंडाधिकारी, सिंधदुर्ग यांजकडून
संदर्भ.---सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विकाअ/१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
आदेश
क्रमांक गृह. ३६०१/१०/२०१७.-----विकाअ/पं.स./नाम/२०१७.------जिल्हादंडाधिकारी, जिल्हा सिंधुदुर्ग, ह्य आदेशाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यतील, मालवण या पंचायत समितीमधून नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत त्यापूर्वीच संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकारी यांची राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम.-----विशेष कार्यकारी अधिकारी, यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वत:चे नावही लिहिणे.
३. विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ नये.
४. या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १४, २०१८/कर्ातिक २३, शके १९४० ६. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्यूपूर्व " जबानी यासाठी उपस्थित राहू नये :-----अ.क्र. सदस्याचे नाव (१) (२)
अनुसूची पत्ता (३)
पंचायत समितीचे नाव (४) १ कोदे सोनाली राजेंद्र रा. कांदळगाव, ता. मालवण मालवण पंचायत समिती २ पाताडे अजिंक्य कृष्णा रा. सुकळगाव, ता. मालवण मालवण पंचायत समिती ३ आळवे विनोद विश्वनाथ रा. वराड, ता. मालवण
मालवण पंचायत समिती ४ गावडे कमलाकर वसंत रा. साळेल, ता. मालवण
मालवण पंचायत समिती सिंधुदुर्गनगरी, दिनांक १६ ऑक्टोबर २०१८.
डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग,