Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ext. 82 (Nov. 20th 2018)

Published 20 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-20.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २०, २०१८/कर्ातिक २९, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ५४ट

मंगळवार, नोव्हेंबर २०, २०१८/कर्ातिक २९, शके १९४० पृष्ठे २, किंमत : रुपर्यै ११.००

असाधारण क्रमांक ८२

प्राधिकृत प्रकाशन

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त व्यक्तींची

विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक.

जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून

वाचा.---शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ. १११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

क्रमांक गृह/क-१/टे-३/गुणवंत कामगार विकाअ/कावि-१२५७९/२०१८.------ उपोद्घातातील शासन निर्णयान्वये अ. क्र. (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, श्री. राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे खालील नमूद केलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या ठाणे जिल्ह्यतील गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेल्या ०३ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती त्यांच्या वयाच्या ७० वषार्ंपयर्ंत चालू राहील व वयाच्या ७० वषार्ंनंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल. तसेच सदर व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्ह्यची नोंद आढळल्यास अथवा फौजदारी गुन्ह्यखाली शिक्षा झाली किंवा त्यांच्या विरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंदविण्यात आला किंवा कोणत्याही न्यायालयाने त्यास नादार (bankrupt) जाहीर केल्यास सदरची नियुक्ती संपुष्टात येईल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----

(एक) साक्षांकनाचे काम.----विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच उपोद्घातातील शासन निर्णयामधील परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायाकिंत प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन, (१) भाग एक--(को.वि.पु.) ८२--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २०, २०१८/कर्ातिक २९, शके १९४० अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाही.

४. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

५. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीसाठी अपात्र ठरेल. नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा.

अनुसूची

शासन आधारकार्ड अ.क्र. अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता

वर्ष निर्णयानुसार नंबर जिल्हा क्रमांक

(१) (२) (३) (४) (५)

(६)

2018 21 840333862587 GK1 श्री. रत्नपाल रुम नं. २०७, दुसरा मजला, परिजात को-ऑप. हौ. आत्माराम जाधव सोसा., कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.).

2018 21 646960196256 GK2 श्री. रविंद्र सतगुरू अपार्टमेंट, आय को-ऑप. हौ. सोसा.,

बाळकृष्ण महाडिक रुम नं. १६, जुना आग्रा रोड, रॉयल इन हॉटेल जवळ,

ठाणे (प.).

2018 21 589446292156 GK3 श्री. प्रताप बी/१०५, श्री सिद्धीविनायक को-ऑप. हौ. सोसा.,

रावजी तावडे लोकमान्य नगर नं. ४, ठाणे (प.).

ठाणे, दिनांक १२ नोव्हेंबर २०१८.

राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-20.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-20.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.