RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी मंगळवार , नोव्हेंबर २० , २०१८ / कार्तिक २ ९ , शके १९ ४०
वर्ष - ७ , अंक - १८ ]
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , पुणे
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (१) व (२) अन्वये नगर रचना योजना तयार करण्याबाबत उद्घोषणा (उद्देश)
जाहीर सूचना
क्रमांक विप-१/नरयो -२/०२-२०१८/प्र. क्र. ६३/१८०४ .-ज्याअर्थी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या , दिनांक २६ मार्च २०१८ रोजी झालेल्या सभेतील ठराव क्रमांक ३ (ड) नुसार पुणे महानगर क्षेत्रात हाती घेतलेल्या व हाती घ्यावयाच्या नगर रचना योजनांबाबतचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१) व (२) अन्वये नगर रचना योजना तयार करण्याचा उद्देश जाहीर करणे व त्यानुषंगिक होणाऱ्या इतर खर्चासाठी प्राधिकरणाचे अधिकार महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आलेले आहेत;
पुणे महानगर प्रदेशामधील वडाची वाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक २ , औताडे- हांडेवाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ३, होळकरवाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ४ व ५ तयार करण्यासाठी उद्घोषणा जाहीर करण्याचा ठराव क्रमांक ३ , दिनांक ३० जानेवारी २०१८ पारित करण्यात आलेला होता . सदर ठरावानुसार जाहीर सूचना उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार ३० ( तीस) दिवसांच्या आत महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेली नसल्याने वैधानिक कार्यवाही पूर्ण होत नसल्याने व्यपगत झालेली आहे;
सबब , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा ठराव क्रमांक १ , दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १९ ६६ च्या कलम ६० (१) मधील तरतुदीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत क्षेत्रापैकी नकाशात दर्शविलेल्या क्षेत्रासाठी खालील नमूद नगर रचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करीत आहे .
( १ ) वडाची वाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक २ ,
(२) औताडे- हांडेवाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ३ ,
(३) होळकरवाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ४ ,
(४) होळकरवाडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ५ .
त्यानुषंगाने सदरच्या नगर रचना योजना तयार करण्याबाबतचा उद्देश उक्त अधिनियमाचे कलम ६० (२) अन्वये या जाहीर सूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
(१)
एच-४२० , भाग एक- असा. ( पु. वि. पु. ) १८ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, २० नोव्हेंबर , २०१८ / कार्तिक २ ९ , शके १९४० महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० (३) मधील तरतुदींनुसार उद्देशाची नक्कल व उक्त नगर रचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र (गुलाबी रंगाच्या किनारीने) दर्शविलेल्या नकाशाची प्रत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन , तिसरा व चौथा मजला , औंध , पुणे -४११ ०६७ यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे . याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
किरण गित्ते , पुणे , १७ नोव्हेंबर २०१८ .
महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे .
BY METROPOLITAN COMMISSIONER AND CHIEF EXECUTIVE OFFICER , PUNE METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Public Notice
Declaration of Intention to prepare the Town Planning Scheme under Section 60 ( 1) and 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .
Notification
No. DP - 1 /TPS-2/02-2018 /C.R . 63/1804.-The Pune Metropolitan Region Development Authority vide its Resolution No. 3( d ) , dated 26th March 2018 has resolved to delegate the powers of declaration of intention and publication under Section 60 ( 1) and (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 and the expenditure to be incurred for the Draft Town Planning Schemes undertaken for preparation and that are proposed to be taken up for preparation in the Pune Metropolitan Region to the Metropolitan Commissioner and Chief Executive Officer, Pune Metropolitan Region Development Authority, Pune.
The Pune Metropolitan Region Development Authority vide its Resolution No.03 , dated 30th January 2018 had resolved and declared its intention to prepare the Vadachi Vadi Draft Town Planning Scheme No. 2. Autade - Handewadi Draft Town Planning Scheme No. 3 , Holkarwadi Draft Town Planning Scheme No. 4 and Holkarwadi Draft Town Planning Scheme No. 5 in accordance with the provisions of Section 60 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. It was necessary to publish the said notice within 30 ( thirty) days in the official Government Gazette from the date of its resolution . However, since this notice was not published within the prescribed time limit , the legal procedure was not complied with . Hence , the said notice has lapsed .
Now, the Pune Metropolitan Region Development Authority vide its Resolution No. 01 , dated 17th November 2018 has resolved its intention to prepare the following mentioned Town Planing Schemes in accordance with the provisions of Section 60 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.
(1) Vadachi Vadi Draft Town Planning Scheme No. 2 .
(2) Autade - Handewadi Draft Town Planning Scheme No. 3 .
(3) Holkarwadi Draft Town Planning Scheme No. 4.
(4) Holkarwadi Draft Town Planning Scheme No. 5 .
Accordingly vide this Public Notice hereby declares its intention to prepare the said Town Planning Schemes under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.
In accordance with the provisions of Section 60 (3) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , a copy of the declaration along with the plan showing the area to be included in the Town Planning Schemes (shown in PINK verge ) is kept open for inspection of the public in the office of the PuneMetropolitan Region Development Authority, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhavan , 3rd and 4th Floor, Aundh , Pune -411 067 during office hours on all working days.
KIRAN GITTE , Pune , 17th November 2018.
Metropolitan Commissioner and Chief Executive Officer, PuneMetropolitan Region DevelopmentAuthority, Pune.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .