RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ४, अंक २२] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग
गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, संकुल इमारत, १० मजला, नविन मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक. सेप्रनि. २०१५/प्र.क्र. ५००/सेवा-५.---- भारताचे संविधान याच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या बाबतीत काढण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा संलेख यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाया आरोग्य सेवा संचालनालयातील नेत्रचिकित्सा अधिकारी गट-क या पदावरील सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहेत :--
१. या नियमांना, आरोग्य सेवा संचालनालयातील नेत्रचिकित्सा अधिकारी, गट-क (सेवाप्रवेश) नियम, २०१७ असे म्हणावे.
२. या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,----
(क) " पदवी " याचा अर्थ, सांविधिक विद्यापीठाची पदवी, असा आहे ;
(ख) " संचालनालय " याचा अर्थ, आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, असा आहे ;
(ग) " शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र, असा आहे ;
(घ) " महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ " याचा अर्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, असा आहे ;
(ड) " विद्यापीठ " याचा अर्थ, विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ (१९५६ चा ३) याच्या कलम २ च्या खंड (च) अन्वये व्याख्या केल्याप्रमाणे विद्यपीठ, असा आहे ;
३. आरोग्य सेवा संचालनालयातील नेत्रचिकित्सा अधिकारी, गट-क या पदावरील नियुक्ती खालील उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल :----
(एक) खुल्या वर्गातील व्यक्तींच्या बाबतीत ज्याचे वय १९ वर्षापेक्षा कमी नाही व ३८ वर्षापेक्षा अधिक नाही आणि मागासवर्गीय व्यक्तींच्या बाबतीत ज्याचे वय ४३ वर्षापेक्षा अधिक नाही : आणि
(१)
भाग चार-अ---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० (दोन) ज्यांनी, कोणत्याही विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिलेली ऑप्टोमेट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल ऑप्टोमेट्री मधील पदवी धारण केलेली आहे.
४. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीचा, एक वर्ष परिविक्षा कालावधी राहील.
५. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार हिंदी व मराठी भाषा परीक्षा जर तिने त्या अगोदरच उर्तीर्ण केलेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळाली नसेल तर--उत्तीर्ण करणे आवश्यक असेल.
६. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन, यांनी वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करील.
७. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती, महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली केली जाण्यास पात्र असेल.
२. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनोहर ठोंबरे, शासनाचे सह सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४० ३PUBLIC HEALTH DEPARTMENT
Gokuldas Tejpal Hospital, Comound, Cimplex Building, 10th Floor, Mumbai 400 001, dated 31st October 2018
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. RTR 2015/C.R. 500/Ser-5.— In Exercise of the powers conferred by the provision to article 309 of Constitution of India, and in supersession of all the existing rules, orders or instruments issued in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of the Ophthalmic officer, Group-C, in the Directorate of Health Services, under the Public Health Department of the Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the Ophthalmic Officer, Group-C, in the Directorate of Health Services (Recruitment) Rules, 2017.
2. In these rules, unless the context requires/otherwise,—
(a) "Degree" means a drgree of a Statutory University ;
(b) "Directorate" means the Directorate of Health Services, Maharashtra State ;
(c) "Government" means the Government of Maharashtra ;
(d) "Maharashtra University of Health Sciesces" means the Maharashtra University of Health Sciences, Nashik ;
(e) "University" means a University as defined under clause (f) of section 2 of the University Grants Commission Act, 1956 (3 of 1956) ;
3. Appointment to the post of Ophthalmic Officer, Group-C in the Directorate of Health Services shall be made by nomination from amongst the candidates who,—
(i) are not less than nineteen years of age and not more than thirty eight years of age in case of persons belonging general category and not more than forty three years of age in case of persons belonging to Backward Class ; and
(ii) possess a degree in Optometry of Clinical Optometry recorgnized by any Unversity or the Maharashtra University of Health Sciences.
4. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be on probation for a period of one year.
5. A Person appointed to the post mentioned in rule 3 shall be required to pass the examinations in Marathi and Hindi according to the rules made in that behalf, unless he has already passed or has been exemoted from passing those examination.
6. A person appointed to the post mentioned in rule 3 shall possess a Certificate in Computer Opertions as prescribed by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra, from time to time.
7. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere in the State of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANOHAR THOMBARE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.