महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ६२] बुधवार, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७७
प्राधिकृत प्रकाशन
राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ४ डिसेंबर २०१८
आदेश
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७.
क्रमांक राउआ(का व नि)-२/जीसटी/पीडब्ल्यूआर/कलमे/२०१७-१८/प्रशा.८.-----महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधण्यात येईल) च्या कलम २ च्या खंड (९१) सह कलम ५ च्या पोट-कलमे (१) आणि (३) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, याद्वारे सर्व राज्यकर अधिकायांची समुचित अधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे आणि याला जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (ख) मध्ये, दिलेल्या कलमांसाठी आणि उक्त अनुसूचीच्या स्तंभ (ग) मध्ये नमूद केलेल्या महाराष्ट्र वस्तू व सेवाकर नियम, २०१७ अन्वये तयार करण्यात आलेल्या अनेकविध नियमांसाठी, उक्त अधिनियमांद्वारे राज्यकर आयुक्तांना प्रदान करण्यात आलेले अधिकार व सोपविलेली कर्तव्ये, वापरण्यासाठी व पार पाडण्यासाठी प्रदान करीत आहेत; म्हणजेच :----
अनुसूची
अनु.क्र. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ खालील महाराष्ट्र वस्तू व सेवाकर नियम, २०१७ खालील आयुक्तांना असलेले अधिकार व कर्तव्ये आयुक्तांना असलेले अधिकार व कर्तव्ये
(ख)
(ग) (१) नियम १३८ख चे उप-नियम (१) आणि (३). (क) (१) कलम ६८ चे पोट-कलम (३) (२) कलम १२९ ची पोट-कलमे (३) आणि पोट-कलम (६)
चे परंतुक.
(३) कलम १३० ची पोट-कलमे (६) आणि (७) (२) नियम १३८ग चा उप-नियम (१). २. सदर आदेशान्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार व कर्तव्ये हे,---
(क) त्यांच्या कार्यक्षेत्रात यासंदर्भात ज्या करारनिविष्ट अटी व शर्ती असतील त्यांना अधीन राहून वापरावयाचे आहेत; (ख) आयुक्तांद्वारे किंवा यासाठी त्याने ज्या अधिकायांना शक्ती प्रदान केलेल्या आहेत त्यांच्याकडून दिलेल्या प्राधिकारानुसार वापरावयाचे आहेत;
(ग) राज्यकर आयुक्त वेळोवेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित करतील त्यांना अधीन राहून वापरावयाचे आहेत.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण १४, शके १९४० COMMISSIONER OF STATE TAX, MAHARASHTRA STATE GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated the 4th December 2018Order
MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX ACT, 2017.
No. D.C. (A&R)-2/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8.–– In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (3) of section 5 read with clause (91) of section 2 of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah.XLIII of 2017) (hereinafter referred to as the "said Act"), the Commissioner of StateTax, Maharashtra State is hereby pleased to delegate the powers and duties conferred or imposed upon the Commissioner and assign the functions and duties as proper officer, to all the State Tax Officers, for carrying out the purposes under various sections under the said Act, given in column(b)of the Schedule appended here to and various rules made under the Maharashtra Goods and Services Tax Rules, 2017 mentioned in column(c) of the said Schedule, namely:—
Schedule
Sr. No. Powers and duties of the Commissioner under Powers and duties of the Commissioner the Maharashtra Goods and under the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017.
Services Tax Rules, 2017.
(a)
(b)
(c)
(1) Sub-section (3) of section 68.
(1) Sub-rules (1) and (3) of rule 138B.
(2) Sub-section (3) and proviso to sub-section (2) Sub-rule (1) of rule 138C.
(6) of section 129.
(3) Sub-sections (6) and (7) of section 130.
2. The powers and duties assigned or delegated under this order shall be exercised,–– (a) within their jurisdiction subject to conditions and restrictions as may be stipulated in this behalf;
(b) on an authorization given by the Commissioner or the Officer empowered by him to this effect;
(c) subject to such conditions and restrictions as the Commissioner may impose from time to time.
RAJIV JALOTA,
Commissioner of State Tax, Maharashtra State, Mumbai.