महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक १५] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६-१२, २०१८/अग्रहायण १५-२१, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
आदेश
क्रमांक एनपीए-२८०३/१/२०१६/अध्यक्ष नि.२०१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा (अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेणे) अनुक्रमे (सुधारणा) नियम--२००९ व (सुधारणा) नियम--२००६ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१- अ(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नगरपंचायत कुडाळ साठी दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत :-- -
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव
निवड झालेले पद
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
शेरा (राखीव जागा) (१) (२) (३) (४) (५) १ नगरपंचायत कुडाळ श्री. तेली अोंकार सुधीर अध्यक्ष-नगरपंचायत, खुला
कुडाळ
२ ---""--- श्रीमती सायली सुरेश कुंभार ऊर्फ उपाध्यक्ष-नगरपंचायत, . .
सायली रामदास मांजरेकर कुडाळ
सिंधुदुर्गनगरी, दिनांक १९ नोव्हेंबर २०१८.
डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.