Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ext. 72) (Dec. 7th 2018) अनुसूचित क्षेत्रातील गट-क संवर्गातील शिक्षक संवर्गाची पदे अनुसूचित जमातीचा उमेदवारांकडून भरावयाचे निर्देश.

Published 07 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक ५४(२)] शुक्रवार, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ७२

प्राधिकृत प्रकाशन

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

वरदान संकुल, ९ वा मजला, एम.आय.डी.सी. कार्यालयासमोर, वागळे इस्टेट, रोड नंबर १६, ठाणे (पश्चिम) ४०० ६०४.

जाहिरात

क्रमांक आस्था-२०१८/प्र.क्र. /का. १(३)/२८००

महाराष्ट्र शासन राजपत्र, क्र.-RBTC/१३०१३ (४)/Notification-१/४७४/२०१४, दिनांक ९ जून २०१४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून विविध विभागातील सुमारे १७ संवर्गाची पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील गट-क संवर्गातील शिक्षक संवर्गाची पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरावयाचे निर्देश प्राप्त आहेत.

सदर पदे भरण्यासाठी आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक आस्था-२०१६/प्र.क्र. ३८७/का. १५, दिनांक १ डिसेंबर, २०१८ मधील तरतुदीनुसार विशेष भरती प्रक्रिया राबवून शिक्षक संवर्गाची भरती करणेबाबत निर्देशीत आहे.

रोजंदारी/तासिक तवारील कर्मचायांच्या सेवा नियमित करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद यांचेकडे दाखल रिट याचिक क्रमांक WP/५८६७/२०१५ व इतर च्या अनुषंगाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाबाबत मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल अपील प्रकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ अखेरची अनुसूचित क्षेत्रातील उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक या तीन संवर्गाची रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदरची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मिनीस्ट्री ऑफ लॉ अॅण्ड जस्टीस, लेजिस्लेटीव्ह डिपार्टमेंट, नोटीफीकेशन, नवी दिल्ली यांनी दिनांक २ डिसेंबर १९८५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील नमूद असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या यादीमध्ये मा. राज्यपाल महोदयांच्या ९ जून २०१४ च्या अधिसूचनेतील अटी शतर्ींची पुर्तता करीत असलेल्या ठाणे विभागांतर्गत पालघर, ठाणे व पुणे या जिल्ह्यतील अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांकडून खालील तपशिलाप्रमाणे शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक संवगार्ंची पदे भरण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भाग दोन-----७२--१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० रिक्त पदांचा (सामाजिक व समांतर आरक्षणानुसार) तपशील दर्शविणारे विवरणपत्र

पदाच्या आरक्षणाचा तपशील अनुसूचित जमाती

पदनाम पद महिला अपंग मा.सै. खेळाडू अंशकालीन भुकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त सर्वसाधारण संख्या

कर्मचारी

१ प्रथमिक शिक्षक १९३ ५८ ११ ३० ११ १९ ४ ६ ५४ २ माध्यमिक शिक्षक ६३ १८ ३ १० ३ ७ १ १ २० ३ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक ६१ १८ ३ ९ ३ ६ १ २ १९ टीप.-- (१) वर नमूद केलेल्या समांतर आरक्षणात व पदसंख्येत बदल होऊ शकतो.

https:/maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात व पद भरती संबंधिच्या सविस्तर सूचना उपलब्ध असून दिनांक १२ डिसेंबर २०१८ ते दिनांक ६ जानेवारी २०१९ पयर्ंत पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करावेत. चलन स्वीकृतीचा दिनांक ७ जानेवारी २०१९ पयर्ंत राहील. सामाजिक, समांतर आरक्षण व भरती संबंधिच्या अटी व शर्ती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जासाठी व माहितीसाठी वरील संकेतस्थळ दिनांक १२ डिसेंबर २०१८ पासून सुरू होईल. तसेच परिक्षेचा दिनांक, वेळ व स्थळ यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ठाणे, दिनांक ७ डिसेंबर २०१८.

संजय मीणा (भा.प्र.से.), अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.