महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ६३] शुक्रवार, डिसेंबर ७, २०१८/अग्रहायण १६, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, नाशिक
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/अनर्हता/एसआर-०१/२०१८.----सुरगाणा नगरपंचायतीचे सदस्य पद धारण करण्यास खालीलप्रमाणे सदस्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ मधील कलम ३(१)(ब) नुसार व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ८ प्रमाणे सुरगाणा नगरपंचायतीचे सदस्य पद धारण करण्यास या आदेशाच्या तारखेपासून म्हणजे दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ पासून प्रपत्रात दर्शविलेले अ.क्र. १ ते ३ यांना अनर्ह घोषित करीत आहे व त्यांनी धारण केलेले सुरगाणा नगरपंचायत मधील सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत आहे :---
अ. क्र. सदस्याचे नाव
प्रभाग क्र.
पत्ता १ योगिता विजय पवार ९, अनुसूचित जमाती (महिला) रा. सुरगाणा, ता. सुरगाणा, जि. नाशिक.
२ रेशमा चंदर चौधरी १५, अनुसूचित जमाती (महिला) रा. सुरगाणा, ता. सुरगाणा, जि. नाशिक.
३ सुरेश काळू गवळी १६, अनुसूचित जमाती (पुरुष) रा. सुरगाणा, ता. सुरगाणा, जि. नाशिक.
राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८. (टीप.----सविस्तर निकालपत्र कार्यालयात उपलब्ध आहे.)
(१)
भाग एक-(म.उ.वि.)--७८-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.