महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ४, अंक ५०] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४० [पृष्ठे १९, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
जिल्हा परिषद, जळगाव
जाहिरनामा
क्रमांक साप्रवि/साप्रवि/वाप्रअ/आरआर/४२०/२०१८.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वर्ाषिक प्रशासन अहवाल) नियम, १९६४ मधील नियम ९ अन्वये, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव जाहीर करतात की, जळगाव जिल्हा परिषदेचा सन २०१७-२०१८ चा वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, ठराव क्रमांक १९५, दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला आहे.
जळगाव, दिनांक ५ डिसेंबर २०१८.
शिवाजी दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
भाग दोन (संकीर्ण)----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग
क्रमांक राजिप/अर्थ/लेखा/२०१८/३१५३२
अलिबाग, दिनांक ४ डिसेंबर २०१८.
अभय यावलकर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०अलिबाग, दिनांक ४ डिसेंबर २०१८.
अभय यावलकर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.
भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४० उरण नगरपरिषद, उरण, जिल्हा रायगड क्रमांक उनप/साप्रवि/सन २०१३-२०१४
सुधारित आदेश
क्रमांक उनप/बांवि/२६२६/२०१८-२०१९
नगरपरिषद क्षेत्रांतील अनधिकृत बांधकामे यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक जीईएन-१०९६/४५/प्र.क्र.१५/नवि-२७, दिनांक ४ मार्च १९९६ आणि मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील स्थायी निदेश क्र. ४१, क्र.नपप्रसं.-२००६/स्था.नि./अन.बां./प्र.क्र.१९९९/क-४२, दिनांक १३ डिसेंबर २००६ आणि नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक कडोंमप-१००६/प्र.क्र.१९२/२००६/नवि-२८, दिनांक २ मार्च २००९ अन्वये सवर्ंकष सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषदेने कार्यालयीन आदेश क्रमांक उनप/साप्रवि/५१७६/सन २००६-२००७, दिनांक ६ मार्च २००७ अन्वये क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षण अधिकारी यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.
२. दरम्यान महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मध्ये दिनांक १३ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झालेल्या सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १८९ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ व ५६ मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून सर्व अनधिकृत बांधकामे विषयक तक्रारींची पाहणी/शहानिशा करून उपरोक्त कलमान्वये त्वरित कारवाई करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी नेमण्यांबाबत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
३. नगरपरिषदेने यापूर्वी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकायांपैकी काही क्षेत्रीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत व पर्यवेक्षीय अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे व वरील सुधारणा विचारात घेऊन यापूर्वीचे क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षीय अधिकारी नियुक्तीबाबतचे सर्व आदेश रद्द करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १८९ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ चे पोट-कलम (८) मधील तरतुदींनुसार उरण नगरपरिषद हद्दीसाठी खालील प्रमाणे क्षेत्रीय अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत.
अ.क्र. क्षेत्रीय अधिकायांचे नाव नेमून दिलेला प्रभाग
पदनिर्देशित अधिकारी १. श्री. नरेंद्र रामजी उभारे, लिपिक, १ व २ श्री. अे. व्ही. कांबळे, नगरअभियंता, उरण नगरपरिषद.
स्थापत्य उरण नगरपरिषद.
२. श्री. संजय रामलाल परदेशी, लिपिक, ५ व ८ --"--
उरण नगरपरिषद.
३. श्री. वसंत वासुदेव कोळी, लिपिक, ३, ४ व ९ श्री. झेड्. आर. माने, उपअवेक्षक तथा पर्यवेक्षक, उरण नगरपरिषद.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी-क.
४. श्री. रमेश विठ्ठल सरवदे, लिपिक, ६ व ७ --"--
उरण नगरपरिषद.
४. वरीलप्रमाणे नियुक्त करणेत आलेल्या क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या प्रभागासाठी व पदनिर्देशित अधिकारी यांनी संपूर्ण उरण नगरपरिषद क्षेत्रासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक कडोंमप-१००६/प्र.क्र.१९२/२००६/नवि-२८, दिनांक २ मार्च २००९ मधील तरतुदी व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १८९ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३, ५४, ५५ व ५६ मधील तरतुदींप्रमाणे कार्यवाही करणेची आहे.
५. अनधिकृत बांधकामे याबाबत खालील नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही प्राधान्याने करावयाची आहे.
(१) आतापयर्ंत प्राप्त झालेल्या सर्व अनधिकृत बांधकाम विषयक तक्रारींची पाहणी करून उचित कार्यवाही करणे.
(२) नगररचना व नगरपालिका कायद्यांतील आवश्यक त्या परवानगीशिवाय केलेली बांधकामे, घेतलेल्या परवानगीशी सुसंगत नसलेली किंवा परवानगी देताना घातलेल्या अटींचा भंग करून केलेली बांधकामे, मंजूर तळपृष्ठ निर्देशांकापेक्षा (F.S.I.) जादा केलेली बांधकामे, घेतलेल्या परवानगीचा कालावधी संपल्यानंतर केलेली कामे, परवानगीच्या विरुद्ध जाऊन केलेली कामे जसे --जमिनीच्या वापरांत विना परवाना बदल वगैरे अशा प्रकारची बांधकामे अनधिकृत समजण्यात यावीत.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०(३) वरीलप्रमाणे आढळून येणाया अनधिकृत बांधकामांवर पुढीलप्रमाणे कारवाई करावी.
(अ) असे अनधिकृत बांधकाम त्वरीत थांबविण्यात यावे.
(ब) असे अनधिकृत बांधकाम विहीत कार्यपद्धती वापरून पाडण्यात यावे.
(क) असे अनधिकृत बांधकामास जबाबदार असणाया व्यक्तींवर खटला भरणे.
(ड) घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक बांधकामाबाबत लगतच्या इतर इमारतींस वायुवीजन, प्रकाश व सांडपाण्याचा निचरा इत्यादी मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवणारी बांधकामे किंवा परिसरास हानी पोहोचविण्यास जबाबदार असणाया व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करणे.
६. वरील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे श्री. अे. व्ही. कांबळे, नगरअभियंता स्थापत्य यांना प्रभाग क्रमांक १ व २ तसेच श्री. झेड्. आर. माने, उपअवेक्षक तथा पर्यवेक्षक स्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी-क यांना प्रभाग क्रमांक ३ व ४ क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पदनिर्देशित अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांचे कामकाजावर योग्य नियंत्रण ठेऊन उरण नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामे तसेच अनधिकृत बांधकाम विषयक तक्रारी प्राप्त होताच उपरोक्त कलमान्वये योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे.
७. अनधिकृत बांधकामांविरुद्ध कार्यवाही करण्यात कसूर केल्यास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १८९ चे पोट-कलम (१३) व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५६-क मधील तरतुदींनुसार दोषसिद्धी नंतर तीन महिन्यांपयर्ंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा किंवा रुपये २०,०००.०० पयर्ंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात याची सर्व क्षेत्रीय अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
हे आदेश तात्काळ अंमलात येत आहेत.
उरण, दिनांक ६ डिसेंबर २०१८.
अवधुत तावडे, मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नगररचना विभाग शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे ४२१ ३०१
सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)
जा.क्र.कडोंमपा/नरवि/५३०१
ज्याअर्थी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सेक्टर ३ ते ७ ची विकास योजना शासन नगरविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस/१२०८/२८८४/सीआर १३९/०९/(पार्ट-२)/नवि.१२, दिनांक ४ एप्रिल २०१२ रोजी सारभूत स्वरूपाचे फेरबदल (E.P.) वगळून मंजूर केली आहे. तसेच उक्त विकास योजनेमधील सारभूत स्वरूपाचे फेरबदल (E.P.) अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२१२/४५८/ प्र.क्र.१४८/१२/नवि-१२, दिनांक ४ ऑगस्ट २०१६ नुसार शासनाने मंजूर केलेले आहेत. (यापुढे "उक्त विकास योजना" असे उल्लेखिलेला) ;
आणि ज्याअर्थी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास योजनेतील सेक्टर क्रमांक ५ मधील आरक्षण क्रमांक १०१ 'प्राथमिक शाळा' (क्षेत्र ४,००० चौ.मी.) या आरक्षणाचे पश्चिमेकडील अंदाजे १,५०० चौ.मी. क्षेत्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उंच जलकुंभ उभारणेकरिता वापरणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये करावयाच्या फेरबदलाच्या कार्यवाहीस मा. सर्वसाधारण सभेने दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ रोजीचा ठराव क्रमांक ७६ अन्वये मंजुरी प्रदान केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, फेरबदलाचा तपशील दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा व इतर तपशील महापालिकेच्या सहायक संचालक नगररचना यांच्या कार्यालयात तसेच महापालिकेच्या 'ग' प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
आणि त्याअर्थी, प्रस्तावित फेरबदलाबाबत ज्या नागरिकांस हरकती/सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी लिखित स्वरूपात ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस (३०) दिवसांच्या आत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सादर करावी, जेणेकरून सदर फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीस सादर करण्यापूर्वी त्यावर विचार करण्यात येईल.
ठिकाण : कल्याण, दिनांक : ४ डिसेंबर २०१८.
गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०KALYAN-DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION, KALYAN
CORPORATION OFFICE, SHIVAJI CHOWK, KALYAN (WEST)
NOTICE
(As per Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
No. KDMC/T.P./5301
Whereas, the Government in Urban Development Department has sanctioned the Development plan for Sector 3 to 7 of Kalyan-Dombivli Municipal Corporation vide Notification No. TPS-1208/2884/CR-139/09/Part-2/UD-12, Dated the 4th April 2012 excluding the modifications of substantial nature (E.P. sites) and santioned the Excluded Part of the Sector 3 to 7 vide Notification No. TPS-1212/458/CR-148/12/UD-12, dated the 4th August 2016 (herein after referred to as "the said Development Plan") ;
And whereas, 1,500 sq.mtr. area on the western side of Reservation No. 101 'Primary School' (area 4,000 sq.mtr) in the said Development Plan is to be used for construction of Elevated Storage Reservoir of Water supply Department. Hon. General Body of Kalyan-Dombivli Municipal Corporation has passed the Resolution No. 76, dated the 19th October 2018 to initiate the process of modification as mentioned above under section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;
And whereas, the details of the proposed modification are displayed for Inspection of General Public at the office of Assistant Director, Town Planning Department and at the 'G' Ward Office of Kalyan-Dombivli Municipal Corporation, in Office Hours, on working days.
And therefore, hereby inform all citizens regarding suggestions/objections if any to proposed modification should be communicated in writing to Assistant Director, Town Planning Department, Kalyan-Dombivli Municipal Corporation within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.
GOVIND BODKE, Commissioner, Place : Kalyan, Date : 4th December 2018. Kalyan-Dombivli Municipal Corporation.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण शिवाजी चौक, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे ४२१ ३०१.
सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)
क्रमांक कडोंमपा/नरवि/५२९६
ज्याअर्थी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सेक्टर क्र. १ ची विकास योजना शासन नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस/१२९९/१९१०/सीआर ३४/२०००/नवि.१२, दिनांक ३ सप्टेंबर २००५ रोजी सारभूत स्वरूपाचे फेरबदल (E.P.) वगळून मंजूर केली आहे. तसेच उक्त विकास योजनेमधील सारभूत स्वरूपाचे फेरबदल (E.P.) अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२०७/६०४/ प्र.क्र.४९४/०८/नवि-१२, दिनांक १४ सप्टेंबर २००९ नुसार शासनाने मंजूर केलेले आहेत. (यापुढे " उक्त विकास योजना " असे उल्लेखिलेला) ;
आणि ज्याअर्थी, मौजे कल्याण स.नं. १, हि. नं. १, क्षेत्र ५२६२.११ चौ.मी. ही जमीन उक्त विकास योजनेत आ.क्र. २७ 'आर्ट गॅलरी व म्युझियम' या आरक्षणासाठी प्रस्तावित आहे ;
आणि ज्याअर्थी, सदर आरक्षणाने बाधीत जमिनीचा विकास बांधा, वापरा व हस्तांतरित करा या धर्तीवर करण्यास मा. महासभेने ठराव क्रमांक १२७ विषय क्रमांक १२, दिनांक २२ डिसेंबर २००३ अन्वये मंजुरी दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त भुखंडाच्या ३३ टक्के क्षेत्राच्या मर्यादेत (१,४७६.०० चौ.मी.) "आर्ट गॅलरी व म्युझियम" चे बांधकाम करून उर्वरित ५२ टक्के क्षेत्राच्या (२,८६६.७० चौ.मी.) मर्यादेत "वाणिज्य वापर" अनुज्ञेय करणेसाठी "आर्ट गॅलरी, म्युझियम व व्यापार संकूल" असे आरक्षणाचे नामाभिदान करणेकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदलाची कार्यवाही सुरू करणेसाठी मा. महासभेने दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ रोजीचा ठराव क्रमांक ७८, विषय क्रमांक १६ अन्वये मान्यता दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, सर्व अनुषंगिक फेरबदलाचा तपशिल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा व इतर तपशिल महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचना यांच्या कार्यालयात तसेच महापालिकेच्या 'क' प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध आहे.
आणि त्याअर्थी, प्रस्तावित फेरबदलाबाबत ज्या नागरिकांस हरकती/सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी लिखित स्वरूपात ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस (३०) दिवसांच्या आत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सादर करावी, जेणेकरून सदर फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीस सादर करण्यापूर्वी त्यावर विचार करण्यात येईल.
ठिकाण : कल्याण, दिनांक : ४ डिसेंबर २०१८.
गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०KALYAN-DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN
CORPORATION OFFICE, SHIVAJI CHOWK, KALYAN (WEST).
Notice
(As per the Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.)
No. KDMC/T.P./5296
Whereas, the Government in Urban Development Department has sanctioned the D e v e l o p m e n t p l a n o f S e c t o r 1 o f K a l y a n - D o m b i v a l i M u n i c i p a l C o r p o r a t i o n vide Notification No. TPS-1299/1910/C.R.-34/2000/UD-12, date 3rd September 2005 excluding the modifications of substantial nature (E.P. sites) and santioned the Excluded Part of Sector 1 vide notification No. TPS-1299/1910/C.R.-34/2000/UD-12, dated 14th September 2009. (herein after referred to as "the said Development Plan") ;
And whereas, the land admeasuring 5,262.11 Sq.Mtr. under S.No. 1, Hissa No. 1 of village Kalyan is proposed for Reservation No. 27 'Art Gallery and Musium' in sector 1 of the said Development Plan ;
And whereas, the Hon. General Body of Kalyan-Dombivali Municipal Corporation has passed the Resolution No. 127, Subject No. 12, dated 22nd December 2003 to develop the said reservation on the basis of Built Opetate and Transfer. Accordingly 33% of the above said plot (1,476.00 sq.mtr.) developed for the purpose of "Art Gallery and Musium" and to permit balance 52% area (2,866.70 sq.mtr.) for Commercial use, it is proposed to redesignate the reservation as "Art Gallery, Musium and Commercial Complex" Hon. General body of Kalyan-Dombivali Municipal Corporation has passed the resolution No. 78, dated 19th October 2018 to initiate the process of modification under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;
And whereas, the details of the said modification are displayed for the Inspection of General Public at the office of Assistant Director, Town Planning Department Kalyan-Dombivali Municipal Corporation and at the "C" Ward office in the office hours on working days.
And therefore, hereby inform all citizens regarding suggestions/objections if any to proposed modification should be communicated in writing to Assistant Director, Town Planning Department, Kalyan-Dombivali Municipal Corporation within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.
GOVIND BODKE, Commissioner, Place : Kalyan, Date : 4th December 2018. Kalyan-Dombivali Municipal Corporation.
भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०
Serial No. M-18214
Notice
Notice is hereby given that the certificate(s) for 180 Equity shares Nos. 2701023, 930205, 930206, 1516541, 1020929, 1020930, 1589908 having distinctive nos. 19727801, 54752881, 54752931, 62053391, 17144441, 17144461, 66211486 respectively of NOCIL LTD. has been lost or mislaid and the undersigned has applied to the company to issues duplicate Certificates for aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office at Mafatlal House, 3rd Floor, H. T. Parekh Marg, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020 within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).
Place : Mumbai,
SHWETA GAUTAM KEDIA.
Date : 1 December 2018.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०Serial No. M-18216
Notice
THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001 Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/mislaid and the holders of the said securities / applicants have applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of the Holders Kind of No. of Distinctive Numbers Securities and Securities
Face Value
Rajesh N Raipancholia & Equity shares of 5000 53365951–53370950 Nirmala N Raipancholia Re.1/-each
Place : Mumbai,
RAJESH N RAIPANCHOLIA & Date : 4 December 2018. NIRMALA N RAIPANCHOLIA.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०Serial No. M-18215
Notice
TATA STEEL LIMITED
Registered Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001, India.
Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Tata Steel Limited have lost and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of Holder Kind of No. of Distinctive Number(s) and Jt. holder, if any Securities and Securities
Face Value
(1)
(2)
(3)
(4) Martin EP Ordinary share Rs. 10 50 9444001-050 Martin EP Ordinary share Rs. 10 50 115171071-120 Martin EP Ordinary share Rs. 10 50 163299341-390 Martin EP Ordinary share Rs. 10 143 2412551790-932 Martin EP Ordinary share Rs. 10 10 8049061-070 Martin EP Ordinary share Rs. 10 50 17007001-050 Martin EP Ordinary share Rs. 10 30 33884571-600 Martin EP Ordinary share Rs. 10 50 67103251-300 Martin EP Ordinary share Rs. 10 50 96628701-750 Martin EP Ordinary share Rs. 10 10 95838391-400 Martin EP Ordinary share Rs. 10 50 165247311-360 Martin EP Ordinary share Rs. 10 50 191963001-050 Martin EP Ordinary share Rs. 10 50 195234021-070 Martin EP Ordinary share Rs. 10 10 331286321-330 Martin EP Ordinary share Rs. 10 1 331534094-094 Martin EP Ordinary share Rs. 10 1 331873225-225 Martin EP Ordinary share Rs. 10 50 232761421-470 Place : Thiruvananthapuram,
MARTIN EP Date : 24th November 2018.
Name of holder.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०Serial No. M-18217
Notice
BAYER CROPSCIENCE LIMITED
Registered Office : Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (W.) 400 607 Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost/mislaid and the holder of the said securities / applicants has applied to the company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of the Holder Kind of No. of Distinctive Numbers Securities and Securities
Face Value
(1)
(2) (3)
(4)
Kusum Kanoi Equity shares of 66 16446273–16446338
Rs.10/-Each
Place : Kolkata,
KUSUM KANOI.
Date : 8th December 2018.
भाग दोन (संकीर्ण)----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०
Serial No. M-18218
TATA STEEL LIMITED
Registered Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001.
Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the company has/ have been lost/mislaid and the holders of the said securities / applicants has / have applied to the Company to issue duplicate certificates.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of Holder Kind of No. of Distinctive Number Securities and Securities
Face Value
(1)
(2) (3)
(4)
Tushar Suresh Shah Equity 75 112653511/3560
Re.10/-Each 385861900/1924 Place : Mumbai,
TUSHAR SURESH SHAH.
Date : 26th October 2018.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०Serial No. M-18219
Public Notice
ORIENTAL AROMATICS LIMITED
Regd. Office of the Company : 133, Jehangir Building, 2nd Floor, M. G. Road, Fort, Mumbai-400001.
Notice is hereby given that the certificate for the mentioned securities of the company have been lost/misplaced and the hold of the said securities have applied to the company.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificate without further intimation.
Name of the Folio No. Kind of No. of Distinctive Nos. Certificate Nos.
Holder Securities and Securities
Face Value
Tushar Suresh S00852 Equity and 37 136023 to 136059 8024 Shah. Rs. 10.
Place : Mumbai.
Date :
भाग दोन (संकीर्ण)----३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४० MUMBAI PORT TRUST TRAFFIC DEPARTMENT, AUCTION SALE BRANCH
Notice of Sale
No. TM/SW/ 4-1/X/5936/2017-2018
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०जिल्हा परिषद, अमरावती
अधिसूचना
क्रमांक जिप/साप्रवि/नियोजन/१३६२६/२०१८.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम, १९६४ मधील नियम ९ व (सुधारणा) नियम १९८१ अन्वये मी, मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती या अधिसूचनेद्वारे जाहीर करतेे की, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ६, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ नुसार वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१७-१८ ला अंतिम मंजुरी प्रदान केल्यानंतर सदरहू तारखेस प्रसिद्ध करीत आहे.
अमरावती, दिनांक ६ डिसेंबर २०१८.
मनिषा खत्री (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका
अधिसूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल)
क्रमांक मिभा/मनपा/नर/५१४७/२०१८-१९.
ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर शहराची विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) नुसार (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधण्यात येत आहे) शासन अधिसूचना क्र. टीपीएस. १२९६/८४७/सीआर-१६२/९६/यूडी-१२, दिनांक १४ मे १९९७ अन्वये मंजूर करण्यात आलेली असून, ती अनुक्रमे दिनांक १५ जुलै १९९७ पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, वगळलेल्या भागाची विकास योजना "उक्त अधिनियमाचे" कलम ३१(१) नुसार, शासन अधिसूचना क्र. टीपीएस. १२९८/ ९४१/सीआर-८९/९८/यूडी-१२, दिनांक २५ ऑगस्ट २००० अन्वये मंजूर झाली असून, दिनांक १५ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. ६५, प्रकरण क्र. ६४, दिनांक ५ सप्टेंबर २०१८ (तहकूब सभा दिनांक ४ सप्टेंबर २०१८), अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ३७ नुसार मंजूर विकास योजनेमध्ये खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचे ठरविले आहे ;
मंजूर विकास योजनेत सुभाषचंद्र बोस मैदान ते मौजे भाइर्ंदर, स.क्र. (६२५) १५१ पयर्ंत दर्शविलेला ६०.०० मी. रुंद विकास योजना रस्त्याची खालीलप्रमाणे सुधारित करणे :----
(१) उपरोक्त नमूद विकास योजना रस्त्याची आखणी मौजे भाइर्ंदर, स.क्र. ६५०(२२६) पयर्ंत कायम ठेवणे.
(२) त्यापुढील मौजे भाइर्ंदर, स.क्र. ६५०(२२६) पासून उपरोक्त विकास योजना रस्त्याची स.क्र. ६३५(१५१) पयर्ंतची आखणी वगळण्यात येणे व सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविल्याप्रमाणे स.क्र. १९२(२२) पयर्ंत नव्याने आखणी प्रस्तावित करणे.
प्रस्तावित फेरआखणीनुसार नव्याने दर्शविलेला ६०.०० मी. रुंद रस्ता मौजे भाइर्ंदर, स.क्र. ३४२(७२२)अे, १ ते ३७७(७५५) पयर्ंत तसेच स.क्र. (६५१)२४, (६५०)२२६, (६४०)२२५, (६४१)२२४, (६४२)१९७, (६२२)१९९, (६३७)१९०, (७४९)१८९, (६३४)१८८, (७५०)१८७, (६३६), (७५१)१८७, (६३१)१८५, (६२२)१८१, (६२३)१८२, (६२५)१५१, (६१७)१४६, (७६३)१४७, (२६१)२४, (१९२)२२, या जागेतून जाणारा आहे. प्रस्तावित रस्त्याखालील जागा सी.आर.झेड. बाधीत क्षेत्रामधील आहे.
आणि त्याअर्थी, ज्या व्यक्तींना / संस्थांना / जमीनधारक / सोसायटीधारकांना सदर फेरबदलाबाबत सूचना / हरकती द्यावयाच्या असतील त्या लेखी स्वरूपात मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात व नगररचना विभाग, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिकेमध्ये ही सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० (तीस) दिवसांच्या मुदतीत आणून द्याव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाया सूचना / हरकतीचा विचार केला जाणार नाही.
प्रस्तावित फेरबदल जनतेच्या अवलोकनासाठी व माहितीसाठी, महानगरपालिका, मुख्य कार्यालयात व नगररचना विभागामध्ये कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे.
मिरा-भाइर्ंदर, दिनांक ७ डिसेंबर २०१८.
बालाजी खतगांवकर, आयुक्त, मिरा-भाइर्ंदर महानगरपालिका.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, २०१८/अग्रहायण २२-२८, शके १९४०MIRA-BHAYANDAR MUNICIPAL CORPORATION
NOTIFICATION
(Under section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966) Whereas, the Development Plan of Mira-Bhayandar Municipal Corporation has been sanctioned by the Government Under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Hereinafter referred to as the "Said Act"), vide Notification No. TPS. 1296/847/CR-162/96, UD-12, Dated the 14th May 1997 and came into force from the Dated 15th July 1997 ;
And whereas, excluded portion has been sanctioned U/s. 31(1) of "Said Act" by the Government vide Notification TPS. 1298/941/CR-89/98, UD-12, Dated the 25th August 2000 and came into force from the Dated 15th October 2000 ;
And whereas, Mira-Bhaiander Municipal Corporation has decided vide General Body Resolution No. 65, Chapter No. 64, dated the 5th September 2018 (Adjourned General Body Meeting date 4th September 2018) to make the modification in Sanctioned Development Plan U/s. 37 of "Said Act" as described below :—
The alignment shown in sanctioned development plan for 60.00 mt. wide road from Subhash Bose Ground to Bhainder S. No. 625(151) is proposed to be modified as below :—
(1) The alignment of abovesaid D.P. Road is kept as per the alignment of D.P. Road upto S. No. 650(226) of Bhainder.
(2) After that from S. No. 650(226) the alignment of abovesaid D.P. Road upto S. No. 625(151) is to deleted and newly proposed upto S. No. 192(22) as shown on plan attached herewith.
Proposed 60.00 mt. wide new D.P. Road is passing through the land from Village Bhainder bearing S. No. 342(722)A-1 to 377(755) also from S. No. (651)24, (650)226, (640)225, (641)224, (642)197, (622)199, (637)190, (749)189, (634)188, (750)187, (636), (751)187, (631)185, (622)181, (623)182, (625)151, (617)146, (763)147, (261)24, (192)22. The lands under said proposed D.P. Road are affected by CRZ.
And therefore, for the abovesaid modification, those who wants to submit their suggestions and objections, may submit in writing within one month from publications of Notification in Government Gazette, to the Mira-Bhainder Municipal Corporation. The suggestion / objection received after specified period will not be considered.
Proposed modification is kept open in the Head Office and Town Planning Department of Mira- Bhayandar Municipal Corporation during Official hours for the inspection of the public.
BALAJI KHATGAONKAR, Mira-Bhayandar,
Commissioner, date the 7th December 2018. Mira-Bhayandar Municipal Corporation.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.