RNI No. MAHBIL / 2009/ 35530
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४ , अंक ६५ ( २ )]
[पृष्ठे ५ , किंमत : रुपये २३.०० शुक्रवार, डिसेंबर १४ , २०१८ / अग्रहायण २३, शके १९ ४०
असाधारण क्रमांक १०८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६५. - मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम. १-५ दिनांक १३ डिसेंबर २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे , प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत , सचिव (विधि विधान ) , महाराष्ट्र शासन , विधि व न्याय विभाग.
सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६५ .
(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम. ) मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;
१८८८ चा ३ . आणि, ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी , मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका १९ ४९ चा ५९ . अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ यांमध्ये आणखी १९६५ चा सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्त्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि , म्हणून, त्यांनी दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई महा . ४० .
(१)
भाग चार-१०८-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग चार, डिसेंबर १४ , २०१८ / अग्रहायण २३ , शके १९ ४०
२०१८ चा महा.
महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा) अध्यादेश , २०१८ प्रख्यापित केला होता ;
अध्या . २० .
आणि ज्याअर्थी , उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी , भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे : -
प्रकरण एक
प्रारंभिक
संक्षिप्त नाव व १. (१) या अधिनियमास , मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, प्रारंभ.
नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( तिसरी सुधारणा) अधिनियम , २०१८ असे म्हणावे.
(२ ) तो , दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
प्रकरण दोन
मुंबई महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा
सन १८८८ चा २. मुंबई महानगरपालिका अधिनियम (यात यापुढे या प्रकरणात ज्याचा निर्देश " मुंबई महानगरपालिका १८८८ चा ३ .
अधिनियम " असा करण्यात आला आहे ) याच्या कलम ५ ब मध्ये,-
अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ब ची सुधारणा .
(क) पहिल्या परंतुकातील खंड ( दोन ) मध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी , " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ग) दुसऱ्या परंतुकानंतर , पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल: -
" परंतु तसेच , मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , २०१८ चा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (तिसरी सुधारणा ) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, महा . ६५ पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत , अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली " सहा महिन्यांची " मुदत " बारा महिन्यांची " मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. " .
सन १८८८ चा
३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३७ याच्या पोट-कलम ( २ अ ) मध्ये, -
अधिनियम क्रमांक
(क) पहिल्या परंतुकातील खंड ( दोन ) मध्ये , " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी , " बारा महिन्यांच्या " ३ याच्या कलम
३७ ची सुधारणा. हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ग) दुसऱ्या परंतुकानंतर , पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल : -
" परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , २०१८ चा नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( तिसरी सुधारणा) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी , महा. ६५ पहिल्या परंतुकाच्या खंड ( दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत , अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली " सहा महिन्यांची " मुदत " बारा महिन्यांची " मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. " .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, डिसेंबर १४ , २०१८ / अग्रहायण २३ , शके १ ९ ४०
प्रकरण तीन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा
१९ ४९ चा
अधिनियम क्रमांक ४. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( यात यापुढे या प्रकरणात ज्याचा निर्देश " महाराष्ट्र महानगरपालिका सन १ ९ ४ ९ चा ५९ . अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ५ ब मध्ये,-
५९ याच्या कलम ५ब ची सुधारणा.
(क) पहिल्या परंतुकातील, खंड ( दोन) मध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ख ) दुसऱ्या परंतुकामध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल: -
२०१८ चा
महा . ६५ .
" परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( तिसरी सुधारणा) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या परंतुकाच्या खंड ( दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत , अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली " सहा महिन्यांची " मुदत " बारा महिन्यांची " मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. ".
५. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १ ९ याच्या पोट- कलम ( १ब ) मध्ये,-
सन १९ ४ ९ चा
अधिनियम क्रमांक
५९ याच्या कलम
१९ ची सुधारणा .
(क) पहिल्या परंतुकातील खंड ( दोन ) मध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी , " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ख ) दुसऱ्या परंतुकानंतर , " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी , " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ग ) दुसऱ्या परंतुकानंतर , पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल:-
२०१८ चा
महा. ६५ .
" परंतु तसेच , मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( तिसरी सुधारणा) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन ) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत , अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली " सहा महिन्यांची " मुदत " बारा महिन्यांची " मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल . " .
प्रकरण चार
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ याची सुधारणा
१९ ६५ चा
सन १ ९६५ चा
महाराष्ट्र महा
६. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( यात यापुढे या प्रकरणात . ४०. ज्याचा निर्देश " नगरपरिषदा अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ९अ मध्ये,-
अधिनियम क्रमांक
४० याच्या कलम ९अ ची सुधारणा.
(क) पहिल्या परंतुकातील खंड ( दोन) मध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी , " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ख ) दुसऱ्या परंतुकामध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
भाग चार- १०८-२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, डिसेंबर १४ , २०१८ / अग्रहायण २३ , शके १ ९ ४०
(ग ) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल: -
" परंतु तसेच , मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, २०१८ चा नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( तिसरी सुधारणा) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी , महा. ६५ . पहिल्या परंतुकाच्या खंड ( दोन ) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली " सहा महिन्यांची " मुदत " बारा महिन्यांची " मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. " .
७. नगरपरिषदा अधिनियमाच्या कलम ५१-१ब मध्ये, -
(क) पहिल्या परंतुकातील खंड ( दोन) मध्ये, " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो , दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
सन १ ९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ५१-१ब ची सुधारणा.
(ख ) दुसऱ्या परंतुकामध्ये , " सहा महिन्यांच्या " या मजकुराऐवजी, " बारा महिन्यांच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;
(ग) दुसऱ्या परंतुकानंतर , पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल: -
" परंतु तसेच , मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , २०१८ चा नगर पंचायती व औद्योगिक नगरी ( तिसरी सुधारणा ) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, महा . ६५. पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत , अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली " सहा महिन्यांची " मुदत " बारा महिन्यांची " मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. " .
प्रकरण पाच
संकीर्ण
विवक्षित ८. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व २०१८ चा
महा . ६५ .
निवडणुकांबाबतची व्यावृत्ती
१८८८ चा ३ .
१९ ४९ चा
१ ९ ६५ चा औद्योगिक नगरी (तिसरी सुधारणा ) अधिनियम , २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी अंमलात असल्याप्रमाणे, मुंबई . महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५ ब किंवा कलम ३७ चे पोट - कलम ( २ अ ) , महाराष्ट्र महानगरपालिका ५९ . अधिनियमाचे कलम ५ ब किंवा कलम १ ९ चे पोट - कलम ( १ब) , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ याचे कलम ९अ किंवा कलम ५१-१ब यांच्या तरतुदी लक्षात घेता, त्यांच्या परिणामी रिक्त झालेली पदे भरण्याकरिता अशा प्रारंभाच्या दिनांकापूर्वी , राज्य निवडणूक आयोगाने , ज्या निवडणुका घेतलेल्या असतील किंवा त्या घेण्याबद्दलचा कोणताही कार्यक्रम घोषित केलेला असेल अशा निवडणुकांवर या अधिनियमातील महा . ४० . कोणत्याही गोष्टींचा परिणाम होणार नाही .
विवक्षित ९ . या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी , कोणत्याही व्यक्तीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र अनर्हतेबाबतची प्राप्त केलेले असेल मात्र , असे प्रमाणपत्र दाखल केलेले नसेल अशा व्यक्तीने जर या अधिनियमाच्या प्रारंभाच्या व्यावृत्ती . दिनांकापासून पंधरा दिवसांच्या मुदतीच्या आत असे प्रमाणपत्र सादर केले तर, अशी कोणतीही व्यक्ती , प्रस्तुत नगरपालिका कायद्यांच्या तरतुदींअन्वये अनर्ह ठरली असल्याचे मानण्यात येणार नाही :
परंतु , या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने अशा व्यक्तीचे रिक्त पद भरण्यासाठी आधीच निवडणूक घेतली असेल किंवा अशी निवडणूक घेण्यासाठी कार्यक्रम घोषित केला असेल त्याबाबतीत , या कलमाच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
अडचणी दूर
१८८८ चा ३ .
१०. (१ ) या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिका अधिनियम , महाराष्ट्र करण्याचा
१ ९४ ९ चा ५९ .
१ ९ ६५ चा
महा. ४० .
महानगरपालिका अधिनियम किंवा , यथास्थिति , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , अधिकार . १ ९ ६५ यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप , राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे , ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी , त्याला आवश्यक किंवा इष्ट ५ महाराष्ट्रशासन राजपत्र, असाधारण भाग चार , डिसेंबर १४ , २०१८ /अग्रहायण २३ , शके १९ ४०
वाटतील असे, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या उक्त अधिनियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे कोणतेही निदेश देता येतील :
परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही .
(२) पोट-कलम ( १ ) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश , तो काढल्यानंतर , शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.
२०१८ चा
सन २०१८ चा ११. ( १ ) मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती महा. व औद्योगिक नगरी ( सुधारणा) अध्यादेश , २०१८ हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.
अध्या . २० .
महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २० याचे निरसन व व्यावृत्ती.
१८८८ चा ३ .
(२ ) असे निरसन झाले असले तरी , उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिका ९ चा अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी १९ ४
५९ . अधिनियम, १९ ६५ यांच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही (काढलेली १ ९ ६५ चा कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह ) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या, उक्त महा . ४०. अधिनियमांच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा , यथास्थिती, काढलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD .