Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV, Extra No. 115 (Dated 15th December 2018) दिवाणी प्रक्रिया संहिता (महा. सुधारणा्)अधि. २०१८ यामध्ये सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

Published 15 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर १५, २०१८/अग्रहायण २४, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ६६(३)] शनिवार, डिसेंबर १५, २०१८/अग्रहायण २४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ११५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-२ सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७२.--- दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ . . . . . . यामध्ये सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

–––––––––––––

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७२

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ यामध्ये सुधारणा करण्याकरिता

अधिनियम.

२०१८ चा महा. ६१.

ज्याअर्थी, यात पुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ यामध्ये सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) (सुधारणा) अधिनियम, २०१८ असे म्हणावे. (१) भाग चार---११५---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर १५, २०१८/अग्रहायण २४, शके १९४० २०१८ चा महा. ६१.

२. दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या कलम ३ मध्ये, खंड (१) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक २७ जून २०१८ पासून म्हणजे, उक्त अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल :---

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१ याच्या कलम ३ ची सुधारणा.

२०१८ चा महा. ६१.

"(१) कलम ९-क अन्वये विनिश्चित केलेल्या एखाद्या प्रारंभिक वादमुद्याची विचारार्ह बाब ही, दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ (यात यापुढे, या कलमात ज्याचा निर्देश "सुधारणा अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या प्रारंभाच्या दिनांकास प्रलंबित असेल त्या बाबतीत, उक्त वादमुद्दा, जणू काही उक्त कलम ९-क वगळण्यात आलेले नाही असे समजून, कलम ९-क खाली न्यायालयाकडून निर्णीत करण्यात येईल आणि तो निकालात काढण्यात येईल.".

व्यावृत्ती.

२०१८ चा महा. ६१.

३. या अधिनियमातील कोणतीही गोष्ट, दिनांक २७ जून २०१८ पासून म्हणजे, दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरू होणाया आणि हा अधिनियम, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास संपणाया कालावधीत एखाद्या दिवाणी न्यायालयाकडून देण्यात आलेल्या हुकूमनाम्यांवर परिणाम करणार नाही.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR, SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR, SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.