Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Extra No. 122 (24th December 2018) Maharashtra Act No. LXXIX of 2018

Published 24 December 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-12-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर २४, २०१८/पौष ३, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ६९] सोमवार, डिसेंबर २४, २०१८/पौष ३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १२२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे १-२ सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७९.--- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

. . . .

दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

–––––––––––––

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७९

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ यामध्ये आणखी

सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१९६२ चा महा. ५.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१, यामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:---

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१८ असे म्हणावे. (१) भाग चार---१२२---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंबर २४, २०१८/पौष ३, शके १९४० २ २. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलम १५८ मधील,---- १९६२ चा महा ५. (एक) पोट-कलम (१) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :--

सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ याच्या कलम १५८ ची सुधारणा.

१९५८ चा ६०.

" परंतु, जेव्हा राज्य शासन, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, च्या कलम ९ याच्या खंड (अ) अन्वये नियमाद्वारे किंवा आदेशाद्वारे, स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री, दान आणि फलोपभोग गहाण यासंबंधींच्या संलेखांवर, उक्त अधिनियमान्वये आकारणी योग्य शुल्क कमी करण्याचे किंवा सूट देण्याचे ठरवील, तेव्हा असे शुल्क कमी करणे किंवा सूट देणे हे, या पोट-कलमान्वये आकारावयाच्या जादा शुल्काच्या बाबतीत देखील लागू असेल. ";

(दोन) पोट-कलम (४) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :--

" परंतु, पुणे जिल्हा परिषद, याबाबतीत राज्य शासनाने केलेल्या नियमांनुसार त्या परिषदेस, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकारीतेतील क्षेत्रातून, पोट-कलम (३) अन्वये प्राप्त झालेल्या रकमेतून,---

(एक) पंचवीस टक्के इतकी रक्कम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकारितेत असलेल्या प्रत्येक पंचायतीच्या ग्रामनिधीस अंशदान म्हणून देईल, आणि

(दोन) पंचवीस टक्के इतकी रक्कम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील." .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR, SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR, SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 December 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-12-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-12-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.